व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”

“लीन जन पृथ्वीचे वतन पावतील”

आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी अन्याय होताना पाहिलं असेल. तसंच दुष्कर्मी लोक चांगल्या व निरपराधी लोकांवर जुलूम करतात हेही पाहिलं असेल. पण अशी वेळ येईल का, जेव्हा अन्याय आणि दुष्टता राहणार नाही?

बायबलमधल्या स्तोत्र ३७ यात वर दिलेल्या प्रश्‍नाचं उत्तर देण्यात आलं आहे. शिवाय, आपल्यासाठी मार्गदर्शनही देण्यात आलं आहे. पुढे दिलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांबद्दल बायबल काय म्हणतं याकडे लक्ष द्या.

  • आपल्यावर जुलूम करणाऱ्‍यांशी आपण कसं वागलं पाहिजे?—वचन १,२.

  • दुष्ट लोकांचं काय होईल?—वचन १०.

  • नीतिमान लोकांचं काय भविष्य आहे?—वचन ११, २९.

  • आज आपण काय केलं पाहिजे?—वचन ३४.

आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या स्तोत्र ३७ मधल्या शब्दांवरून हे स्पष्टपणे दिसून येतं की “परमेश्‍वराची प्रतीक्षा” व “त्याच्या मार्गाचे अवलंबन” करणाऱ्‍यांचं भविष्य उज्ज्वल आहे. तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करण्यासाठी आणि तुम्हाला व तुमच्या प्रियजनांना उज्ज्वल भविष्य कसं मिळवता येईल हे शिकवण्यासाठी यहोवाचे साक्षीदार आनंदाने तुमची मदत करतील.