व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्या संग्रहातून

जाहीर भाषणांमुळे आयर्लंड देशात राज्याची आनंदाची बातमी पसरली.

जाहीर भाषणांमुळे आयर्लंड देशात राज्याची आनंदाची बातमी पसरली.

बेलफास्ट शहर जवळ आल्यावर जहाजातले काही प्रवासी हिरव्यागार पर्वतांवर पडलेल्या कोवळ्या उन्हाच्या मनोरम दृश्‍याचा आनंद घेत होते. ही गोष्ट १९१० सालच्या मे महिन्याची आहे. त्या प्रवाशांमध्ये एक होते चार्ल्झ टेज रस्सल. इथे भेट देण्याची त्यांची ही पाचवी वेळ होती. बंधू रस्सल यांना दोन मोठी जहाजं बनत असताना दिसत होती. त्यातल्या एका जहाजाचं नाव होतं टायटॅनिक आणि दुसऱ्‍या जहाजाचं नाव होतं ऑलिंपिक. * जहाज बांधकाम बंदरच्या पलीकडे, बारा बायबल विद्यार्थी बंधू रस्सलची वाट पाहत होते.

राज्याची आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमेरिकेच्या बाहेर बरेच दौरे करावे लागतील, असं बंधू रस्सल यांनी जवळपास २० वर्षांआधी ठरवलं होतं. याची सुरुवात त्यांनी जुलै १८९१ मध्ये आयर्लंड देशापासून केली. त्यांच्या या पहिल्या दौऱ्‍यादरम्यान जहाज जेव्हा शिकागोच्या शहरात पोहचत होतं, तेव्हा त्यांनी क्वीन्झटाऊनच्या समुद्र किनाऱ्‍यावर सूर्यास्त पाहिला आणि त्यांना आपल्या आईवडिलांनी त्यांच्या गावाचं वर्णन केल्याची आठवण झाली असावी. बंधू रस्सल आणि त्यांच्या सोबत्यांनी नीटनेटक्या शहरातून आणि शहराच्या बाहेर असलेल्या गावांतून प्रवास करताना त्यांना जाणवलं की हे “क्षेत्र कापणी करण्यास तयार आहे”.

एकूण सात वेळा बंधू रस्सल यांनी आयर्लंडला भेट दिली होती. त्यांच्या पहिल्या भेटीमुळे बऱ्‍याच लोकांच्या मनात आस्था निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या नंतरच्या भेटीदरम्यान त्यांचं भाषण ऐकण्यासाठी कधी शेकडो तर कधी हजारो लोक यायचे. १९०३ च्या मे महिन्यात त्यांनी दुसरी भेट दिली. तेव्हा बेलफास्ट आणि डब्लिन या ठिकाणी जाहीर सभांच्या योजनेबद्दल स्थानिक बातमीपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्या आठवणीबद्दल सांगताना बंधू रस्सल म्हणाले, “शपथ-घेऊन दिलेलं वचन” हे भाषण “लोक अगदी लक्षपूर्वक ऐकत होते”. या भाषणात अब्राहामच्या विश्‍वासाबद्दल आणि भविष्यात मानवजातीसाठी असलेल्या आशीर्वादांबद्दल सांगण्यात आलं होतं.

लोकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे बंधू रस्सल यांनी आपल्या युरोपच्या तिसऱ्‍या दौऱ्‍यात पुन्हा आयर्लंडला भेट दिली. १९०८ च्या एप्रिल महिन्यात एका सकाळी ते बेलफास्ट बंदरावर पोहोचले, तेव्हा पाच बांधवांनी त्यांचं स्वागत केलं. “सैतानाचं साम्राज्य नष्ट केलं जाईल” या संध्याकाळी होणाऱ्‍या भाषणाची जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे भाषण ऐकण्यासाठी जवळ-जवळ “३०० ज्ञानी पुरुष जमले होते.” त्यांच्यातल्या एकाने बरेच आक्षेप घेतलं पण बंधू रस्सल यांनी शास्त्रवचनांचा कुशलतेने वापर करून त्याला शांत केलं. डब्लिनमध्ये असताना बंधू रस्सल यांना एका कट्टर विरोधकाचा सामना करावा लागला. त्याचं नाव होतं ओकोनॉर. तो वाय.एम.सी.ए (यंग मेन्स ख्रिश्‍चन असोसिएशन) या संघटनेचा सचिव होता. त्याने हजारपेक्षा जास्त प्रेक्षकांना बायबल विद्यार्थ्यांच्या विरोधात जाण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न केला. पण, नेमकं काय घडलं?

यासाठी त्या वेळी घडलेल्या घटनेची कल्पना आपण करू या. द आयरीश टाईम्स या बातमीपत्रात दिलेल्या जाहीर भाषणाची जाहिरात वाचून एक व्यक्‍ती तिथं उपस्थित राहण्याचं ठरवते. तिला बायबलचं सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे. सभागृहात प्रेक्षकांची खूप गर्दी आहे, खूप प्रयत्न केल्यानंतर तिला बसायला एक जागा मिळते. पिकलेले केस व दाढी असलेल्या आणि लांब काळा कोट घातलेल्या वक्त्याकडे तिचं पूर्ण लक्ष आहे. वक्‍ता भाषण देताना स्टेजवर चालतो आणि हावभाव करतो. तसंच, एका वचनावरून दुसऱ्‍या वचनावर तर्क करून पद्धतशीर रीत्या समजवतो. यामुळे त्या व्यक्‍तीला बायबलचं सत्य समजण्यासाठी मदत होते. मायक्रोफोन नसतानाही त्या वक्त्याचा आवाज सर्वांना ऐकू येतो आणि सर्वांचं लक्ष दीड तासापर्यंत तो पूर्णपणे वेधून ठेवतो. नंतर, प्रश्‍नोत्तराच्या भागामध्ये ओकोनॉर आणि त्याचे मित्र वक्त्याला आव्हान करतात पण तो कुशल रीतीने बायबलच्या आधारे त्यांना उत्तर देतो. उपस्थित असलेले प्रेक्षक टाळ्यांनी आपली स्वीकृती दर्शवतात. वातावरण शांत झाल्यावर ती आस्थेवाईक व्यक्‍ती बायबल विषयी आणखीन जाणून घेण्यासाठी बांधवांना भेटते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते, बऱ्‍याच जणांनी अशाच प्रकारे सत्य शिकलं.

१९०९ सालाच्या मे महिन्यात बंधू रस्सल यांनी बेलफास्टला चौथ्यांदा जाण्याचं ठरवलं. ते न्यूयॉर्क शहरातून निघाले तेव्हा त्यांनी बांधव हंटसिंगर यांना स्टेनोग्राफर म्हणून सोबत नेण्याचं ठरवलं. त्या दोघांनी मौरेटानिया या जहाजातून प्रवास केला. महासागरातून प्रवास करताना त्यांच्याकडे बराच फावला वेळ होता. त्यामुळे बंधू रस्सल यांनी बांधव हंटसिंगर यांच्याकडून टेहळणी बुरूजचे लेख टाईप करून घेतले. बेलफास्टमध्ये बंधू रस्सल याचं भाषण ऐकण्यासाठी ४५० स्थानिक लोक आले होते. तिथे इतकी गर्दी जमली होती की त्यातल्या १०० जणांना तर उभं राहावं लागलं होतं!

बंधू सी.टी. रस्सल ल्युसिटानिया जहाजात

सुरुवातीला सांगितलेल्या दौऱ्‍यामध्ये, म्हणजे बंधू रस्सल यांच्या पाचव्या दौऱ्‍यामध्येसुद्धा त्यांना विरोधकांचा सामना करावा लागला होता. डब्लिन इथे बंधू रस्सल यांनी जाहीर भाषण दिलं. या वेळी ओकोनॉरने त्यांच्यासोबत एका नामवंत विद्वानाला आणलं होतं. जाहीर भाषणानंतर त्या विद्वानाने प्रश्‍न विचारले आणि बंधू रस्सल यांनी त्या प्रश्‍नांची शास्रवचनांतून उत्तरं दिली. तिथं उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्या चर्चेचा आनंद घेतला. दुसऱ्‍या दिवशी प्रवाश्‍यांनी लिव्हरपूल या ठिकाणी जाण्यासाठी जलद गतीने जाणाऱ्‍या बोटीतून प्रवास केला आणि तिथून न्यूयॉर्कला जाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ल्युसिटानिया या जहाजातून प्रवास केला. *

२० मे १९१० साली द आयरीश टाईम्स या बातमीपत्रात जाहीर भाषणाची जाहिरात

१९११ मध्ये बंधू रस्सल यांनी सहाव्या आणि सातव्या दौऱ्‍यादरम्यानही जाहीर भाषणांचा समावेश केला आणि त्यांबद्दल आधी जाहिरातीही देण्यात आल्या. त्या वर्षी बेलफास्टमध्ये मार्च-एप्रिल दरम्यान २० बायबल विद्यार्थ्यांनी बंधू रस्सल यांच्या भाषणाची योजना केली. त्यासाठी २,००० लोक जमले होते. त्या भाषणाचा विषय होता “मरणानंतर काय होतं?” ओकोनॉर डब्लिनला पुन्हा एकदा उपस्थित राहिला. पण, या वेळी सोबत त्याने दुसऱ्‍या एका पाळकाला प्रश्‍न विचारायला आणलं होतं. बंधू रस्सल यांनी बायबलमधून त्या प्रश्‍नांची उत्तरं दिली. ती ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्‍त केला. त्याच वर्षी उन्हाळा संपल्यानंतर बंधू रस्सल यांनी इतर शहरातसुद्धा भाषणं दिली आणि तिथेदेखील बरेच जण उपस्थित राहिले होते. डब्लिनमध्ये पुन्हा एकदा सभा भरली तेव्हा ओकोनॉरने आणि त्याच्या सोबत आलेल्या १०० गुंडांनी सभेदरम्यान अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रेक्षकांनी निर्भयपणे वक्त्याची बाजू घेतली.

बंधू रस्सल हे जरी जाहीर भाषणं देण्यामध्ये पुढाकार घेत असले, तरी त्यांना एक गोष्ट माहीत होती. ती म्हणजे “हे काम कोणत्या एका माणसावर अवलंबून नाही” कारण “हे कार्य माणसाचे नव्हे तर देवाचे आहे.” भाषणांची जाहिरात केल्यामुळे जाहीर सभेसाठी मार्ग मोकळा झाला. यामुळे बायबलचं सत्य प्रभावीपणे सांगण्याची संधी मिळाली. याचा काय परिणाम झाला? जाहीर भाषणांद्वारे आनंदाची बातमी पसरवण्यात मदत झाली. आणि यामुळे आयर्लंडच्या बऱ्‍याच शहरांत मंडळ्यांची स्थापना झाली.—ब्रिटेनमधल्या आमच्या संग्रहातून.

^ परि. 3 दोन वर्षांच्या आत टायटॅनिक जहाज बुडाले.

^ परि. 9 १९१५ सालाच्या मे महिन्यात आयर्लंडच्या दक्षिण तटावर असलेल्या ल्युसिटानिया जहाजावर हल्ला केला आणि ते नष्ट करण्यात आलं.