व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युक्रेनमधल्या नायझीनया अॅपशा या ठिकाणी २०१२ मध्ये झालेलं प्रांतीय अधिवेशन

भरपूर प्रमाणात कापणी!

भरपूर प्रमाणात कापणी!

येशूने भाकीत केलं होतं की त्याचे शिष्य या शेवटल्या दिवसांत मोठ्या प्रमाणात कापणी करतील. (मत्त. ९:३७; २४:१४) येशूने भाकीत केलेले हे शब्द युक्रेनमधल्या ट्रान्सकारपाथीए या ठिकाणी कशा प्रकारे एका उल्लेखनीय रीतीने खरे ठरले आहेत याचा विचार करा! त्या भागातल्या फक्‍त तीन गावांमध्येच ५० मंडळ्या आणि ५,४०० पेक्षा जास्त प्रचारक आहेत. * खरंच, या तीन गावाच्या लोकसंख्येत प्रत्येक चार लोकांपैकी एक यहोवाचा साक्षीदार आहे.

या क्षेत्रात कोणत्या प्रकारचे लोक राहतात? त्या गावातला बांधव वसिले म्हणतो: “इथले लोक बायबलचा आदर करतात, त्याच्या नजरेत न्याय व्यवस्थेला खूप महत्त्व आहे, त्यांचे कौटुंबिक बंध मजबूत असतात आणि ते प्रामाणिकपणे एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.” पुढे तो म्हणतो: “ते सहसा आपल्या विश्‍वासांशी लगेच सहमत होत नाहीत. पण, जेव्हा आम्ही बायबलमधून वचनं दाखवतो तेव्हा ते आमचं लक्षपूर्वक ऐकतात.”

लोकसंख्येच्या तुलनेत प्रचारकांची संख्या जास्त असलेल्या क्षेत्रात प्रचार करताना आपल्या बंधुभगिनींना काही वेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. उदाहरणार्थ, एका मंडळीमध्ये १३४ प्रचारक आहेत पण त्यांच्या क्षेत्रात फक्‍त ५० घरं आहेत. मग या प्रचारकांनी या परिस्थितीशी कशा प्रकारे जुळवून घेतलं?

जास्त गरज असलेल्या ठिकाणी प्रचार करण्यासाठी बरेच बंधूभगिनी स्वतःहून पुढे आले. ९० वर्षांचे एक वयस्कर बांधव, योनाश म्हणतात: आमच्या मंडळीच्या क्षेत्रात प्रत्येक दोन घरांमागे एक प्रचारक आहे. पुढे ते म्हणतात: “माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मी आता माझ्या गावात प्रचार करतो. पण, या आधी एकही साक्षीदार नसलेल्या ठिकाणी मी १६० कि.मी. प्रवास करून जायचो आणि त्या क्षेत्रात हंगेरियन भाषेत प्रचार करायचो.” इतर क्षेत्रात प्रचार करण्यासाठी प्रचारकांना बरेच त्याग करावे लागतात. योनाश पुढे सांगतात: “ट्रेन पकडण्यासाठी मी सकाळी ४ वाजता उठायचो आणि परतण्यासाठी संध्याकाळी ६ वाजता ट्रेन असायची, तोपर्यंत मी त्या गावात प्रचार करायचो. मी हे आठवड्यातून दोन-तीनदा करायचो.” आपली मेहनत व्यर्थ गेली आहे असं त्यांना वाटतं का? ते म्हणतात, “अशा प्रकारच्या सेवाकार्यात मला खूप आनंद मिळाला आहे. तसंच जिथे मंडळी नाही अशा ठिकाणी एका कुटुंबाला सत्य शिकवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप समाधानी आहे.”

या क्षेत्रात असलेल्या मंडळींमधून सर्वांनाच दूरच्या क्षेत्रात जाऊन प्रचार करणं शक्य नाही. म्हणून मग असे प्रचारक ज्यात वृद्ध प्रचारकांचाही समावेश होतो त्यांच्या मंडळीच्या क्षेत्रात असलेल्या प्रत्येकाला प्रचार करण्याचा प्रयत्न करतात. याचा परिणाम असा झाला, की २०१७ च्या वर्षात या तीन गावांनी मिळून स्मारकविधी पाळला आणि तिथे उपस्थित राहिलेल्यांची संख्या जवळजवळ प्रचारकांच्या संख्येहून दुप्पट म्हणजेच त्यांच्या एकंदर लोकसंख्येच्या अर्धी होती. यात काही शंका नाही की, “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात” करण्यासाठी आहे मग, आपण कुठेही सेवा करत असलो तरीही.—१ करिंथ. १५:५८.

^ परि. 2 त्या गावांची नावं ल्हायबोकी पोटिक, सेरीडनी वोड्याने आणि नायझीनया अॅपशा अशी आहेत.