“यहोवाच्या पक्षाचा कोण आहे?”
“आपला देव परमेश्वर याचे भय बाळग, त्याची सेवा कर, त्याला धरून राहा.”—अनु. १०:२०.
१, २. (क) यहोवाचा पक्ष घेणं सुज्ञतेचं का आहे? (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?
यहोवाचा पक्ष घेणं सुज्ञतेचं आहे, कारण त्याच्यासारखा शक्तिशाली, बुद्धिमान आणि प्रेमळ दुसरा कोणीच नाही! आपली नेहमी हीच इच्छा असते, की आपण त्याला एकनिष्ठ राहावं व त्याचा पक्ष घ्यावा. (स्तो. ९६:४-६) पण इतर असे काही देवाचे उपासक होते जे त्याचा पक्ष घेण्यात अपयशी ठरले.
२ या लेखात आपण अशा काही लोकांची उदाहरणं पाहणार आहोत ज्यांनी देवाचा पक्ष घेण्याचा दावा तर केला पण सोबतच त्याला न आवडणाऱ्या गोष्टीही केल्या. त्यांच्यापासून आपण काही महत्त्वाचे धडे शिकू शकतो. यामुळे आपल्याला यहोवाला एकनिष्ठ राहायला मदत होईल.
यहोवा आपलं हृदय पारखतो
३. यहोवाने काइनला मदत करण्याचा प्रयत्न का केला आणि त्याने त्याला काय म्हटलं?
३ काइनच्या उदाहरणाचा विचार करा. त्याने खोट्या दैवतांची उपासना केली नाही, पण तरीही यहोवाने त्याची उपासना स्वीकारली नाही. का? कारण त्याच्या मनातली दुष्ट प्रवृत्ती यहोवाने पाहिली होती. (१ योहा. ३:१२) त्यामुळे यहोवाने त्याला इशारा दिला होता: “जर तू बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय? आणि तू बरे करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे; आणि त्याची इच्छा तुझ्यावर होईल; परंतु तू त्यावर अधिकार कर.” (उत्प. ४:६, ७, पं.र.भा.) दुसऱ्या शब्दात यहोवा काइनला सांगत होता की ‘जर तू पश्चात्ताप केलास आणि माझा पक्ष निवडलास तर मी तुला स्वीकारेन.’
४. यहोवाचा पक्ष घेण्याची संधी समोर असतानाही काइनने काय केलं?
४ काइनने जर आपली विचारसरणी बदलली असती तर यहोवाने त्याची उपासना स्वीकारली असती. पण काइनने देवाचं ऐकलं नाही. त्याच्या चुकीच्या विचारांमुळे आणि स्वार्थी इच्छेमुळे त्याने चुकीची कृत्यं केली. (याको. १:१४, १५) लहान असताना कदाचित काइनने कधीच असा विचार केला नसेल की तो कधी यहोवाचा विरोध करेल. पण नंतर त्याने देवाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्याविरुद्ध बंड केलं आणि स्वतःच्या भावाला ठार मारलं!
५. आपण कोणत्या प्रकारच्या विचारसरणीमुळे यहोवाची स्वीकृती गमावून बसू शकतो?
५ काइनसारखंच कदाचित एक ख्रिस्ती व्यक्ती आज यहोवाची उपासना करण्याचा दावा करत असेल, पण सोबतच देवाला न आवडणाऱ्या गोष्टीही करत असेल. (यहू. ११) ती कदाचित प्रचाराला आणि सभांना नियमितपणे जात असेल. पण त्यासोबत ती मनात अनैतिक विचार, स्वार्थी इच्छा आणि द्वेषाची भावना बाळगत असेल. (१ योहा. २:१५-१७; ३:१५) अशा प्रकारच्या मनोवृत्तीमुळे पाप घडू शकतं. आपण काय विचार करतो किंवा कसं वागतो ते कदाचित इतरांना कळणार नाही, पण यहोवाला मात्र सर्व माहीत आहे. आपण पूर्णपणे त्याच्या पक्षाचे आहोत की नाही हे तो जाणतो.—यिर्मया १७:९, १० वाचा.
६. चुकीच्या इच्छांविरुद्ध लढताना यहोवा आपल्याला मदत कशी करतो?
६ आपण जरी चुका करत असलो तरी यहोवा लगेच आपल्याशी नातं तोडून टाकत नाही. आपण जर चुकीच्या मार्गावर जात असू तर तो आपल्याला असं आर्जवतो: “मजकडे वळा म्हणजे मी तुम्हाकडे वळेन.” (मला. ३:७) आपल्यात कमतरता आहेत आणि आपण त्यांविरुद्ध संघर्ष करत आहोत हे त्याला माहीत आहे. पण जे वाईट आहे त्याला आपण नाकारावं आणि दृढ भूमिका घ्यावी अशी त्याची इच्छा आहे. (यश. ५५:७) आपण जर असं केलं तर तो आपली मदत करेल आणि चुकीच्या इच्छांविरुद्ध लढण्यासाठी लागणारी शक्ती पुरवेल असं वचन तो देतो.—उत्प. ४:७.
फसू नका
७. शलमोनने यहोवासोबत असलेली मैत्री कशी गमावली?
७ तरुण असताना शलमोनचा यहोवासोबत चांगला नातेसंबंध होता. यहोवाने त्याला खूप बुद्धी दिली आणि यरुशलेममध्ये सुंदर मंदिर बांधण्याची महत्त्वाची जबाबदारीही त्याच्यावर सोपवली होती. पण शलमोनने देवासोबतची मैत्री गमावली. (१ राजे ३:१२; ११:१, २) देवाचा असा नियम होता, की “राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन” बहकेल. (अनु. १७:१७) पण शलमोनने ही आज्ञा पाळली नाही आणि त्याने ७०० पत्नी आणि ३०० उपपत्नी केल्या. (१ राजे ११:३) त्यातल्या अनेक जणी खोट्या दैवतांच्या उपासक होत्या. अशा प्रकारे इस्राएली नसलेल्या स्त्रियांशी लग्न न करण्याबद्दल देवाची जी आज्ञा होती, तिचंही पालन करण्यात शलमोन अपयशी ठरला.—अनु. ७:३, ४.
८. शलमोनने कोणत्या वाईट गोष्टी केल्या?
८ हळूहळू शलमोनने यहोवाच्या आज्ञांचं पालन करणं सोडून दिलं. शेवटी त्याने अत्यंत वाईट गोष्ट केली. त्याने खोट्या दैवतांसाठी वेद्या उभारल्या जसं की अष्टोरेथ आणि कमोश या दैवतांसाठी. अशा वेद्या त्याने यरुशलेममधल्या यहोवाच्या मंदिरासमोर असणाऱ्या डोंगरावरही बनवल्या! (१ राजे ११:५-८; २ राजे २३:१३) आपण जर यहोवाच्या मंदिरात अर्पणं देत राहिलो, तर यहोवा आपल्या पापाकडे दुर्लक्ष करेल असा विचार करून शलमोन स्वतःला फसवत राहिला.
९. शलमोनने देवाच्या ताकिदीकडे दुर्लक्ष केल्यामुळे काय परिणाम झाले?
९ पण यहोवा पापाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. १ राजे ११:९-१३.
बायबल सांगतं की शलमोनचं मन यहोवापासून “फिरले.” म्हणून मग यहोवा त्याच्यावर रागावला. पण त्याने शलमोनची मदत करण्याचा प्रयत्नही केला. त्याने त्याला दोनदा दर्शन दिलं आणि “अन्य देवांच्या नादी लागू नको” अशी खास ताकीदही दिली. पण शलमोनने त्याकडे दुर्लक्ष केलं. याचा परिणाम असा झाला, की तो देवाची स्वीकृती आणि पाठिंबा गमावून बसला. यहोवाने त्याच्या वंशजांना संपूर्ण इस्राएल राष्ट्रावर राज्य करण्याची परवानगी दिली नाही. तसंच शेकडो वर्षांपर्यंत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.—१०. देवाशी असलेल्या आपल्या चांगल्या नातेसंबंधावर कशाचा परिणाम होऊ शकतो?
१० यहोवाचे स्तर समजून न घेणारे आणि त्यांचा अनादर करणारे मित्र जर आपण निवडले तर आपल्या विचारांवर त्यांचा प्रभाव पडू शकतो आणि यहोवाशी असलेला आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो. ते कदाचित मंडळीतले बंधुभगिनी असतील पण यहोवासोबत त्यांचा नातेसंबंध दृढ नसेल किंवा ते यहोवाची उपासना न करणारे आपले नातेवाईक, शेजारी, सोबत काम करणारे किंवा शाळेतले सोबती असू शकतील. यहोवाच्या स्तरांनुसार आचरण न करणाऱ्या लोकांसोबत जर आपण आपला वेळ घालवला तर त्यांचा प्रभाव देवाशी असलेल्या आपल्या चांगल्या नातेसंबंधावर होऊ शकतो.
११. मित्र निवडायला कोणत्या गोष्टी आपल्याला मदत करू शकतात?
११ १ करिंथकर १५:३३ वाचा. बऱ्याच लोकांमध्ये चांगले गुण असतात. यहोवाची उपासना न करणारे नेहमीच चुकीच्या गोष्टी करत असतील असं नाही. तुम्ही कदाचित अशा लोकांना ओळखत असाल. मग ती चांगली सोबत आहे असा याचा अर्थ होतो का? विचार करा: यहोवाशी असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर त्यांचा काय प्रभाव पडतो? ते देवाच्या जवळ जाण्यासाठी तुमची मदत करतात का? त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे? ते कशाबद्दल नेहमी बोलत असतात? ते सतत फॅशन, पैसा, कंप्युटर, टॅब, मोबाईल, मनोरंजनाची साधनं आणि अशा इतर गोष्टींबद्दल बोलत असतात का? ते नेहमी इतरांना नावं ठेवतात का? घाणेरडे विनोद सांगायची त्यांना सवय आहे का? येशूने म्हटलं: “अंतःकरणात जे भरलेलं असतं तेच तोंडातून बाहेर पडतं.” (मत्त. १२:३४) तुम्ही ज्यांच्यासोबत वेळ घालवता त्यांचा प्रभाव यहोवाशी असलेल्या तुमच्या नात्यावर होत असल्याचं जर तुम्हाला जाणवलं, तर लगेचच पाऊल उचला. त्यांच्यासोबत कमी वेळ घालवा. गरज वाटली तर मैत्रीही तोडून टाका.—नीति. १३:२०.
आपण यहोवाला एकनिष्ठ राहावं अशी त्याची इच्छा आहे
१२. (क) यहोवाने इजिप्तमधून इस्राएली लोकांना परत आणल्यानंतर काय सांगितलं? (ख) यहोवाने इस्राएली लोकांना एकनिष्ठ राहण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं?
१२ यहोवाने इजिप्तमधून इस्राएली लोकांची सुटका केल्यानंतर जे घडलं त्यावरूनही आपण खूपकाही निर्ग. १९:१६-१९) मग त्यांनी यहोवाचा आवाज ऐकला. एकनिष्ठ भक्ती हवी असणारा तो देव आहे असं त्याने म्हटलं. त्यांनी जर यहोवावर प्रेम केलं आणि मनापासून त्याच्या आज्ञा पाळल्या तर तो त्यांना एकनिष्ठ राहील असं वचन त्याने दिलं. (निर्गम २०:१-६ वाचा.) त्यांनी जर यहोवाचा पक्ष घेतला तर तो त्यांचा पक्ष घेईल असं तो इस्राएली लोकांना सांगत होता. तुम्ही जर त्या लोकांमध्ये असता तर यहोवाचे शब्द ऐकून तुम्हाला कसं वाटलं असतं? “जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू,” असं इस्राएली लोकांसारखं उत्तर तुम्हीही नक्की दिलं असतं. (निर्गम २४:३) पण लवकरच असं काही घडलं ज्यामुळे इस्राएली लोकांच्या एकनिष्ठतेची परीक्षा झाली. ती कोणती होती?
शिकू शकतो. सीनाय पर्वतासमोर जमलेल्या लोकांपुढे यहोवाने अद्भुत रीत्या स्वतःला प्रकट केलं. त्या वेळी त्यांनी दाट ढग, विजांचा गडगडाट, धूर आणि शिंगांसारखा नाद ऐकला. (१३. इस्राएली लोकांच्या एकनिष्ठेची परीक्षा कशी झाली?
१३ देवाच्या शक्तीचं हे अद्भुत प्रदर्शन पाहून इस्राएली लोक खूप घाबरले. म्हणून मग त्यांच्यावतीने यहोवाशी बोलण्यासाठी मोशे सीनाय पर्वतावर गेला. (निर्गम २०:१८-२१) पण मग बरेच दिवस झाले आणि तो परत खाली छावणीत आला नाही. अरण्यात इस्राएली लोकांचं नेतृत्व करण्यासाठी कोणीच नव्हतं असं दिसतं. मग त्यांनी काय केलं? आपलं नेतृत्व करणाऱ्या मानवी नेत्यावर म्हणजेच मोशेवर ते कदाचित जास्तच अवलंबून राहिले होते. त्यांना चिंता वाटू लागली म्हणून मग अहरोनला ते म्हणाले: “आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनव; कारण आम्हाला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही.”—निर्ग. ३२:१, २.
१४. इस्राएली लोकांनी काय विचार करून स्वतःची फसवणूक करून घेतली आणि यावर यहोवाची काय प्रतिक्रिया होती?
१४ इस्राएली लोकांना हे माहीत होतं की मूर्तींची उपासना करणं अयोग्य आहे. (निर्ग. २०:३-५) पण तरीही सोन्याच्या वासराची उपासना करायला ते लगेच तयार झाले. असं करण्याद्वारे त्यांनी यहोवाची आज्ञा मोडली होती. पण अजूनही आपण यहोवाच्या पक्षाचे आहोत असा विचार करून ते स्वतःला फसवत होते. अहरोनने वासराच्या उपासनेला ‘यहोवासाठी उत्सव’ असं म्हटलं. मग यहोवाने काय केलं? त्याने मोशेला म्हटलं: “ते बिघडले आहेत; ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो मार्ग इतक्यातच सोडून ते बहकून गेले आहेत.” यहोवा इस्राएली लोकांवर इतका रागवला, की संपूर्ण राष्ट्राला नष्ट करण्याचा विचारही त्याच्या मनात आला.—निर्ग. ३२:५-१०.
१५, १६. आपण यहोवाच्या पक्षाचे आहोत हे मोशे आणि अहरोनने कसं दाखवून दिलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१५ पण यहोवा एक दयाळू परमेश्वर आहे. त्याने त्या राष्ट्राचा नाश केला नाही. याउलट त्याने इस्राएली लोकांना त्याचा पक्ष घेण्याची संधी दिली. (निर्ग. ३२:१४) मोशेने जेव्हा पाहिलं की इस्राएली लोक मूर्तीसमोर ओरडत आहेत, गीत गात आहेत, नाचत आहेत तेव्हा त्याने त्या सोन्याच्या वासराचा चुराडा केला आणि मोठ्याने त्यांना विचारलं: “परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे. तेव्हा लेवी वंशातले सर्व लोक त्याच्याजवळ जमा झाले.”—निर्ग. ३२:१७-२०, २६.
१६ अहरोनने जरी सोन्याचं वासरू बनवलं असलं तरी त्याने पश्चात्ताप केला आणि इतर लेव्यांसोबत यहोवाचा पक्ष घेतला. या एकनिष्ठ लोकांनी हे दाखवून दिलं, की ते पाप करणाऱ्या लोकांच्या पक्षाचे नाहीत. त्यांची निवड योग्यच होती कारण त्या दिवशी सोन्याच्या वासराची उपासना करणारे हजारो लोक मरण पावले. पण यहोवाचा पक्ष घेतलेले बचावले आणि त्यांना आशीर्वादित करण्याचं वचन यहोवाने दिलं.—निर्ग. ३२:२७-२९.
१७. पौलने सोन्याच्या वासराच्या अहवालाबद्दल जे म्हटलं त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं?
१७ आपल्याला यातून काय शिकायला मिळतं? १ करिंथ. १०:६, ७, ११, १२) पौलने सांगितल्याप्रमाणे यहोवाची उपासना करणारेदेखील वाईट कृत्यं करण्यात गुंतू शकतात. आपल्याला यहोवाची स्वीकृती आहे असंही त्यांना कदाचित वाटू शकतं. आपल्याला यहोवाचं मित्र बनून राहायचं आहे किंवा आपण यहोवाला एकनिष्ठ आहोत असा दावा जर एखादी व्यक्ती करत असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीला यहोवाची स्वीकृती आहे.—१ करिंथ. १०:१-५.
प्रेषित पौलने म्हटलं: “या गोष्टी आपल्यासाठी एक इशारा आहेत.” आपण कधीच त्यांच्यासारखं मूर्तीपूजक बनू नये. अशा अहवालांबद्दल समजावताना पौलने म्हटलं: “त्यांच्या बाबतीत घडलेल्या या गोष्टी आपल्यासाठी उदाहरण असून, आपण जे जगाच्या व्यवस्थेच्या शेवटी पोचलो आहोत त्या आपल्याला इशारा देण्यासाठी लिहिण्यात आल्या होत्या. त्यामुळे, आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.” (१८. यहोवापासून दूर जाण्याचा धोका का निर्माण होऊ शकतो? आणि त्याचे काय परिणाम होतील?
१८ अपेक्षेप्रमाणे मोशे सीनाय पर्वतावरून खाली आला नाही तेव्हा इस्राएली लोकांना चिंता वाटू लागली. त्याचप्रमाणे या जगाचा अंत अपेक्षेप्रमाणे लवकर येत नाही हे पाहून आपणही कदाचित चिंता करू लागू. यहोवाने ज्या सुंदर भविष्याचं अभिवचन दिलं आहे. ते पूर्ण व्हायला अजून खूप वेळ आहे किंवा ते खरं होणं कदाचित अशक्य आहे असं आपल्याला वाटू लागेल. आणि यहोवाच्या इच्छेपेक्षा आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करू. आपण जर सावध राहिलो नाही तर यहोवापासून दूर जाण्याचा आपल्याला धोका आहे आणि यामुळे कदाचित आपण कधी विचारही केला नव्हता अशा चुकीच्या गोष्टी करायला लागू.
१९. आपण नेहमी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि का?
१९ आपण मनापासून यहोवाची आज्ञा पाळावी आणि फक्त त्याचीच उपासना करावी अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (निर्ग. २०:५) पण अशी अपेक्षा तो का करतो? कारण त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आपण जर यहोवाच्या इच्छेप्रमाणे वागलो नाही तर सैतानाच्या इच्छेप्रमाणे वागायला लागू आणि यामुळे आपलं खूप नुकसान होईल. पौलने म्हटलं: “तुम्ही यहोवाच्या प्याल्यातून आणि दुरात्म्यांच्याही प्याल्यातून पिऊ शकत नाही; तुम्ही ‘यहोवाच्या मेजावरून’ आणि दुरात्म्यांच्याही मेजावरून जेवू शकत नाही.”—१ करिंथ. १०:२१.
यहोवाला जडून राहा!
२०. आपण चुकीचं पाऊल उचललं तरी यहोवा आपल्याला मदत कशी करू शकतो?
२० काइन, शलमोन आणि इस्राएली लोक या सर्वांकडे पश्चात्ताप करून आपलं वर्तन बदलण्याची संधी होती. (प्रे. कार्ये ३:१९) एक गोष्ट तर स्पष्ट आहे, की लोकांच्या चुकीमुळे यहोवा त्यांच्याकडे लक्ष देण्याचं थांबवत नाही. त्याने अहरोनला कशा प्रकारे क्षमा केली याचा विचार करा. आजही चुकीच्या गोष्टींपासून आपलं रक्षण व्हावं म्हणून तो आपल्याला प्रेमळपणे सूचना देत असतो. यासाठी तो बायबल, प्रकाशनं आणि ख्रिस्ती बंधुभगिनींचा वापर करतो. आपण जर यहोवाच्या सूचनांकडे लक्ष दिलं, तर तो आपल्यावर दया करेल याची खात्री आपण बाळगू शकतो.
२१. आपल्या एकनिष्ठेची जेव्हा परीक्षा होते तेव्हा आपण काय केलं पाहिजे?
२१ यहोवा दाखवत असलेल्या अपार कृपेचा एक उद्देश आहे. (२ करिंथ. ६:१) यामुळे आपल्याला “देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार” करण्याची संधी मिळते. (तीत २:११-१४ वाचा.) या जगात आपल्यावर बऱ्याचदा अशी परिस्थिती येईल ज्यात यहोवाबद्दल आपल्या एकनिष्ठेची परीक्षा होईल. पण पूर्णपणे यहोवाच्या पक्षात राहण्याचा निर्धार करा आणि नेहमी आपला देव यहोवा याचे भय बाळगा, त्याची सेवा करा आणि “त्याला धरून राहा.”—अनु. १०:२०.