व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो तुम्हाला समाधानी जीवन मिळू शकतं

तरुणांनो तुम्हाला समाधानी जीवन मिळू शकतं

“जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील.”​—स्तो. १६:११.

गीत क्रमांक: ४१, 

१, २. जीवनात बदल करणं शक्य आहे हे आपल्याला टोनीच्या उदाहरणावरून कसं स्पष्ट होतं?

टोनी आपल्या वडिलांविना वाढला. शाळेत असताना त्याला अभ्यासाची इतकी काही आवड नव्हती. खरंतर तो शाळा मध्येच सोडून द्यायचाही विचार करत होता. शनिवार-रविवार, टोनी मूव्हीज बघायचा किंवा आपल्या मित्रांसोबत वेळ घालवायचा. तसा तो हिंसक नव्हता किंवा त्याला ड्रग्सचं व्यसन नव्हतं. पण त्याच्या जीवनात कोणताच उद्देश नव्हता. देव अस्तित्वात आहे यावरही त्याला शंका होती. एक दिवस टोनीची भेट दोन साक्षीदारांशी झाली. त्याने त्यांना देवाबद्दल काही प्रश्‍न विचारले. त्या साक्षीदारांनी त्याला दोन माहितीपत्रकं वाचायला दिली. एक होतं जीवसृष्टीची सुरुवात​विचार करण्यासारखे पाच प्रश्‍न  आणि दुसरं होतं वॉझ लाइफ क्रिएटेड?

साक्षीदार जेव्हा टोनीला पुन्हा भेटले तेव्हा त्याची मनोवृत्ती पूर्णपणे बदलली होती. त्याने ती माहितीपत्रकं इतक्या वेळा वाचून काढली होती की त्या माहितीपत्रकांची पानं अक्षरशः दुमडलेल्या अवस्थेत होती. टोनीने म्हटलं: “एक देव असायलाच हवा.” त्याने बायबल अभ्यास सुरू केला आणि हळूहळू जीवनाबद्दल त्याचा दृष्टिकोन बदलला. बायबल अभ्यासाआधी त्याला शाळेची आवड नव्हती. पण नंतर तो सर्वात चांगल्या विद्यार्थ्यांपैकी एक बनला! शाळेच्या मुख्याध्यापकांनाही आश्‍चर्य वाटलं. ते टोनीला म्हणाले: “तुझ्या वागण्यात आणि अभ्यासात खूपच सुधारणा झालीये. यहोवाच्या साक्षीदारांसोबत राहिल्याने हा बदल झालाय का?” टोनीने हो म्हटलं आणि शिकत असलेल्या गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या. मग त्याने शाळा पूर्ण केली. आज तो पायनियर आणि सहायक सेवक म्हणून सेवा करत आहे. टोनीला आज प्रेमळ पित्याच्या रूपात यहोवा भेटला याचा त्याला खूप आनंद आहे!​—स्तो. ६८:५.

यहोवाची आज्ञा पाळा आणि यशस्वी व्हा

३. यहोवा तरुणांना कोणता सल्ला देतो?

टोनीच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की यहोवाला खरोखर तरुणांची काळजी आहे. तुम्ही यशस्वी व्हावं आणि तुम्हाला समाधानी जीवन लाभावं अशी त्याची इच्छा आहे. म्हणून तो तुम्हाला एक सल्ला लक्षात ठेवायला सांगतो. तो म्हणजे: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.” (उप. १२:१) असं करणं नेहमीच सोपं नसतं, पण हे अशक्यही नाही. देवाच्या मदतीने तुम्ही फक्‍त तरुण असतानाच नाही तर मोठं झाल्यावरही यशस्वी जीवन जगू शकता. हे चांगल्या रीतीने समजण्यासाठी आता आपण इस्राएली लोकांना वचनयुक्‍त देश काबीज करायला आणि दावीदला महाकाय गल्याथशी लढायला कोणत्या गोष्टीमुळे मदत मिळाली यावर चर्चा करू या.

४, ५. इस्राएली लोकांनी कनान देश काबीज केला आणि दावीदने गल्याथला हरवलं यांवरून आपण कोणता मौल्यवान धडा शिकू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेली चित्रं पाहा.)

इस्राएली लोक जेव्हा वचनयुक्‍त देशात पाऊल ठेवणार होते तेव्हा यहोवाने त्यांना कोणती निर्देशनं दिली? त्याने त्यांना चांगले सैनिक बनायला सांगितलं का किंवा त्याने त्यांना युद्धासाठी प्रशिक्षण दिलं का? नाही! (अनु. २८:१, २) त्याने इस्राएली लोकांना त्याची आज्ञा पाळायला आणि त्याच्यावर भरवसा ठेवायला सांगितलं. (यहो. १:७-९) मानवी दृष्टिकोनाने हा सल्ला अर्थहीन वाटू शकला असता पण तो त्यांच्यासाठी सर्वात चांगला सल्ला होता. यहोवाने इस्राएली लोकांना एकापाठोपाठ एक कनानी लोकांवर विजय मिळवून दिला. (यहो. २४:११-१३) देवाला आज्ञाधारक राहायला विश्‍वास लागतो आणि हाच विश्‍वास नेहमी  यशाच्या मार्गावर नेतो. ही गोष्ट प्राचीन काळात खरी होती आणि आजही तितकीच खरी आहे.

गल्याथ एक शूर योद्धा होता. त्याची उंची जवळपास ९.५ फूट होती आणि त्याच्याकडे भयानक शस्त्रं होती. (१ शमु. १७:४-७) पण दावीदकडे फक्‍त एक गोफण होती आणि त्याचा देवावर भरवसा होता. देवावर विश्‍वास नसलेल्या एक व्यक्‍तीला वाटलं असतं की दावीद गल्याथसोबत लढायला जाऊन मूर्खपणा करत आहे! पण खरंतर गल्याथ मूर्ख होता.​—१ शमु. १७:४८-५१.

६. या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आधीच्या लेखात आपण अशा चार गोष्टींवर चर्चा केली ज्यांमुळे आपण आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. त्या म्हणजे, आपण आपली आध्यात्मिक गरज भागवली पाहिजे, देवावर प्रेम असणारे चांगले मित्र बनवले पाहिजेत, अर्थपूर्ण ध्येयं ठेवली पाहिजेत आणि देवाने दिलेल्या स्वातंत्र्याला मौल्यवान लेखलं पाहिजे. या लेखात आपण चर्चा करणार आहोत की या चांगल्या गोष्टी केल्यावर आपल्याला आणखी कसा फायदा होऊ शकतो. असं करण्यासाठी १६व्या स्तोत्रात दिलेल्या काही तत्त्वांवर आता आपण चर्चा करू या.

आपली आध्यात्मिक गरज भागवा

७. (क) एक आध्यात्मिक व्यक्‍ती कशी असते? (ख) दावीदचा “वाटा” काय होता आणि याबद्दल त्याला कसं वाटलं?

एका आध्यात्मिक मनोवृत्तीच्या व्यक्‍तीला देवावर विश्‍वास असतो आणि ती सर्व बाबतींत देवाचा दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करते. ती यहोवाला तिचं मार्गदर्शन करू देते आणि त्याची आज्ञा पाळण्याचा तिने निर्धार केलेला असतो. (१ करिंथ. २:१२, १३) दावीदही तसाच होता. त्याने गायलं “परमेश्‍वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा” आहे. (स्तो. १६:५) दावीदला मिळालेल्या ‘वाट्यासाठी’ म्हणजे देवासोबत असलेल्या त्याच्या घनिष्ठ नातेसंबंधासाठी तो कृतज्ञ होता. त्याने त्याचा आश्रय घेतला होता. (स्तो. १६:१) याचा परिणाम काय झाला? त्याने लिहिलं: “माझा आत्मा उल्लासतो.” यहोवासोबत असलेल्या त्याच्या जवळच्या नात्यामुळे त्याला जेवढा आनंद व्हायचा तेवढा आनंद त्याला क्वचितच आणखी कोणत्या गोष्टीमुळे झाला असेल!​—स्तोत्र १६:९, ११ वाचा.

८. तुमचं जीवन खऱ्‍या अर्थाने समाधानी बनवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करू शकता?

पैशांवर आणि ऐशआरामावर लक्ष केंद्रित करणाऱ्‍यांना कधीच दावीदसारखा आनंद अनुभवता येणार नाही. (१ तीम. ६:९, १०) कॅनडामध्ये राहणारा एक बांधव म्हणतो: “खरं समाधान, आपण जीवनात काय मिळवलं यापासून नाही तर प्रत्येक उत्तम देणगी देणाऱ्‍या यहोवा देवाला तुम्ही काय दिलं यापासून मिळतं.” (याको. १:१७) जर तुम्ही यहोवावर असलेला तुमचा विश्‍वास वाढवला आणि त्याची सेवा केली तर तुम्हाला खऱ्‍या अर्थाने समाधानी आणि अर्थपूर्ण जीवन जगता येईल. म्हणून तुम्ही तुमचा विश्‍वास आणखी बळकट करण्यासाठी काय करू शकता? यासाठी तुम्हाला यहोवासोबत वेळ घालवावा लागेल. हे तुम्ही त्याचं वचन वाचून, त्याने बनवलेल्या सुंदर गोष्टींचं निरीक्षण करून, त्याच्या गुणांवर आणि त्याचं तुमच्यासाठी असलेल्या प्रेमावर मनन करून करू शकता.​—रोम. १:२०; ५:८.

९. देवाच्या वचनाने तुम्हाला आकार द्यावा यासाठी तुम्ही काय करू शकता?

कधीकधी देव एका प्रेमळ पित्याप्रमाणे आपल्याला सुधारतो. असं करण्याद्वारे तो आपल्याला प्रेम दाखवतो. दावीदला जेव्हा सुधारण्यात आलं तेव्हा त्याने त्याला मौल्यवान लेखलं आणि म्हटलं: “परमेश्‍वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो; माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते.” (स्तो. १६:७) दावीदने देवाच्या विचारांवर मनन केलं आणि तो देवासारखा विचार करू लागला. त्याने देवाच्या विचारांना स्वतःला आकार देऊ दिला, म्हणजेच स्वतःत बदल करू दिला. तुम्हीही जेव्हा असं करता तेव्हा देवावर असलेलं तुमचं प्रेम आणि त्याचं मन आनंदित करण्याची तुमची इच्छा वाढेल. आणि यामुळे तुम्ही एक प्रौढ व्यक्‍ती बनाल. क्रिस्टीन नावाची एक बहीण म्हणते की वाचलेल्या गोष्टींवर ती जेव्हा संशोधन आणि मनन करते तेव्हा यहोवाने त्या गोष्टी तिच्यासाठीच लिहिल्या आहेत असं तिला वाटतं!

१०. यशया २६:३ या वचनानुसार आध्यात्मिक मनोवृत्ती असल्यामुळे तुम्हाला कशी मदत होईल?

१० जेव्हा तुम्ही आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगता तेव्हा या जगाकडे आणि त्याचं भविष्यात जे होईल त्याकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहता. हे अद्‌भुत ज्ञान आणि समज यहोवा तुम्हाला देतो. पण का? कारण त्याची इच्छा आहे की तुमच्या जीवनात कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे तुम्ही जाणून घ्यावं. तसंच, तुम्ही चांगले निर्णय घ्यावेत आणि भविष्याकडे निर्भयपणे पाहावं असंही त्याला वाटतं. (यशया २६:३ वाचा.) अमेरिकेत राहणारा जॉशवा नावाचा बांधव म्हणतो, की जर तुम्ही यहोवासोबत एक घनिष्ठ नातं जोडलं तर कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे तुम्हाला अगदी स्पष्टपणे समजेल.

खरे मित्र बनवा

११. दावीदने आपले मित्र कसे निवडले?

११ स्तोत्र १६:३ वाचा. चांगले मित्र कसे शोधायचे हे दावीदला माहीत होतं. यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना त्याने आपले मित्र म्हणून निवडलं आणि यामुळे त्याला खूप “संतोष” झाला. त्याने त्याच्या मित्रांना “पवित्र जन” म्हणून संबोधलं. कारण ते यहोवाचे शुद्ध नैतिक स्तर पाळ यचे. दुसऱ्‍या एका स्तोत्रकर्त्याला मित्र निवडण्याच्या बाबतीत तसंच वाटलं आणि म्हणून त्याने लिहिलं: “तुझे भय धरणाऱ्‍या सर्वांचा, तुझे विधि पाळणाऱ्‍यांचा, मी सोबती आहे.” (स्तो. ११९:६३) आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे तुम्हीही असे बरेचसे चांगले मित्र बनवू शकता जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याची आज्ञा पाळतात. आणि हे मित्र तुमच्या वयाचेच असायला हवेत हे गरजेचं नाही.

१२. दावीद आणि योनाथान चांगले मित्र का होते?

१२ दावीदने फक्‍त आपल्या वयाच्या लोकांशीच मैत्री केली नाही. तुम्ही दावीदच्या एखाद्या जवळच्या मित्राचं नाव सांगू शकाल का? तुम्हाला कदाचित योनाथानचं नाव आठवेल. बायबलमध्ये दावीद आणि योनाथान यांच्या मैत्रीबद्दल खूप सुंदर वर्णन केलं आहे. पण योनाथान दावीदपेक्षा जवळपास ३० वर्षं मोठा होता. मग ते इतके जिवलग मित्र कसे बनले? त्यांची मैत्री देवावर असलेल्या विश्‍वासावर आधारलेली होती. ते एकमेकांचा आदर करायचे आणि एकमेकांमध्ये असलेल्या गुणांना मौल्यवान लेखायचे. जसं की, देवाच्या शत्रूंसोबत लढताना त्यांनी दाखवलेलं धैर्य.​—१ शमु. १३:३; १४:१३; १७:४८-५०; १८:१.

१३. तुम्ही आणखीन मित्र कसे बनवू शकता? एक उदाहरण द्या.

१३ दावीद आणि योनाथान यांसारखं आपणही देवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांसोबत मैत्री केली तर आपल्यालाही ‘मोठा संतोष’ मिळू शकतो. किएरा बऱ्‍याच वर्षांपासून देवाची सेवा करत आहे. ती म्हणते: “मी जगभरातल्या वेगवेगळ्या पार्श्‍वभूमीच्या आणि संस्कृतीच्या अनेक लोकांशी मैत्री केली आहे.” जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की बायबल आणि पवित्र आत्मा यांद्वारे आपण जगभरातल्या उपासकांच्या कुटुंबाचा एक भाग बनतो.

अर्थपूर्ण ध्येयं ठेवा

१४. (क) तुम्ही आपल्या जीवनात अर्थपूर्ण ध्येयं कशी ठेवू शकता? (ख) काही तरुणांनी आपल्या ध्येयांबद्दल काय म्हटलं आहे?

१४ स्तोत्र १६:८ वाचा. देवाची सेवा करणं हे दावीदसाठी सर्वात महत्त्वाचं होतं. जर तुम्ही ध्येयं ठरवताना दावीदचं अनुकरण केलं आणि यहोवा तुमच्यासाठी काय इच्छितो याबद्दल नेहमी विचार केला, तर तुमचं जीवन समाधानी होईल. स्टीवन नावाचा बांधव म्हणतो: “ध्येय गाठण्याकडे वाटचाल केल्यावर, ते गाठल्यावर आणि जीवनात केलेल्या सुधारणांकडे मागे वळून पाहिल्यावर मला खूप समाधान मिळतं.” दुसऱ्‍या देशात सेवा करणारा जर्मनीतला एक तरुण बांधव म्हणतो: “म्हातारा झाल्यावर मागे वळून पाहताना माझ्यासमोर हे चित्र यायला नको की मी फक्‍त स्वतःसाठीच जगलो.” तुम्हालाही असंच वाटतं का? मग तुमच्या कौशल्यांचा आणि क्षमतांचा वापर देवाच्या गौरवासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी करा. (गलती. ६:१०) यहोवाच्या सेवेत ध्येयं ठेवा आणि ती ध्येयं गाठण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. तो तुमच्या प्रार्थनांचं नक्कीच उत्तर देईल ही खात्री तुम्ही बाळगू शकता!​—१ योहा. ३:२२; ५:१४, १५.

१५. तुम्ही कोणती ध्येयं ठेवू शकता? (“ काही व्यावहारिक ध्येयं” ही चौकट पाहा.)

१५ तुम्ही कोणती काही ध्येयं ठेवू शकता? तुम्ही सभांमध्ये स्वतःच्या शब्दांत उत्तरं देण्याचा प्रयत्न करू शकता किंवा पायनियरींग किंवा बेथेलमध्ये सेवा करण्याचं ध्येय ठेवू शकता. तसंच जास्तीत जास्त लोकांना आनंदाचा संदेश सांगता यावा म्हणून तुम्ही एक नवीन भाषा शिकून घेण्याचाही प्रयत्न करू शकता. बाराक नावाचा तरुण बांधव पूर्ण वेळेची सेवा करतो. तो म्हणतो: “रोज सकाळी उठल्यावर मला या विचाराने खरंच खूप बरं वाटतं, की मी माझी सर्व शक्‍ती यहोवासाठी खर्च करतोय आणि असं मला इतर कोणत्याही कामामुळे वाटू शकलं नसतं.”

देवाने दिलेल्या स्वातंत्र्याची कदर बाळगा

१६. यहोवाच्या नियमांबद्दल आणि तत्त्वांबद्दल दावीदला कसं वाटलं आणि का?

१६ स्तोत्र १६:२,  वाचा. आपण जसं मागच्या लेखात शिकलो की देवाच्या नियमांनुसार आणि तत्त्वांनुसार जगल्यामुळे आपल्याला खरं स्वातंत्र्य मिळतं. आपण बऱ्‍याची आवड धरायला आणि वाइटाचा द्वेष करायला शिकतो. (आमो. ५:१५) मूळ भाषेत स्तोत्रकर्ता दावीदला म्हणायचं होतं, की यहोवा त्याच्यासाठी सर्व चांगुलपणाचा स्रोत आहे. दावीदने देवाचं अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि तो देवाला आवडणाऱ्‍या गोष्टींवर प्रेम करायला शिकला. पण त्यासोबतच तो देवाच्या दृष्टीत वाईट असणाऱ्‍या गोष्टींचा द्वेष करायलाही शिकला. जसं की मूर्तिपूजा. मूर्तिपूजेमुळे मानवांचा अपमान होतो आणि यहोवाला जो गौरव मिळायला हवा तो एखाद्या व्यक्‍तीला किंवा गोष्टीला मिळतो.​—यश. २:८, ९; प्रकटी. ४:११.

१७, १८. (क) खोट्या उपासनेच्या वाईट परिणामांबद्दल दावीदने काय म्हटलं? (ख) कोणत्या गोष्टीमुळे लोकांना “पुष्कळ दुःखे” भोगावे लागतात?

१७ बायबल काळात, खोट्या धर्मांत अनेकदा लैंगिक अनैतिकतेचा समावेश असायचा. (होशे. ४:१३, १४) बऱ्‍याच लोकांना खोटी उपासना आवडायची कारण त्यात अनैतिकता खपवून घेतली जायची. पण अशा उपासनेमुळे ते आनंदी होते का? मुळीच नाही! दावीदने अशा खोट्या देवांच्या उपासकांबद्दल म्हटलं की “त्यांना पुष्कळ दुःखे” होतात. त्या लोकांनी तर खोट्या देवांसाठी आपल्या मुलांचासुद्धा बळी दिला होता! (यश. ५७:५) यहोवाला त्यांच्या क्रूरपणाचा द्वेष होता. (यिर्म. ७:३१) जर तुम्ही त्या काळात असता तर तुमचे आईवडील यहोवाचे उपासक आहेत यासाठी तुम्ही नक्कीच कृतज्ञ असता!

१८ आज बरेचसे खोटे धर्म लैंगिक अनैतिकता व समलैंगिकता चालवून घेतात. अनैतिक जीवन जगल्यामुळे लोकांना वाटू शकतं की ते स्वतंत्र आहेत. पण वस्तुस्थिती ही आहे की “त्यांना पुष्कळ दुःखे” होतात. (१ करिंथ. ६:१८, १९) आणि हे तुमच्याही लक्षात आलं असेल. म्हणून तरुणांनो, आपल्या स्वर्गात राहणाऱ्‍या पित्याचं ऐका! देवाची आज्ञा पाळल्याने तुमचं भलं होतं याची पक्की खात्री करून घ्या. अनैतिकतेमुळे कोणते वाईट परिणाम होतात याचा विचार करा. यामुळे होणारं नुकसान, क्षणिक सुखापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. (गलती. ६:८) आधी उल्लेख करण्यात आलेला जॉशवा म्हणतो: “आपल्या स्वातंत्र्याचा आपण मनाप्रमाणे वापर करू शकतो, पण त्याचा गैरवापर केल्याने आपल्याला आनंद होत नाही.”

१९, २०. यहोवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या आणि त्याची आज्ञा पाळणाऱ्‍या तरुणांना कोणते आशीर्वाद मिळतील?

१९ येशूने म्हटलं: “शिकवलेल्या गोष्टींचं जर तुम्ही पालन करत राहिला, तर तुम्ही खऱ्‍या अर्थाने माझे शिष्य ठराल, आणि तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्‍त करेल.” (योहा. ८:३१, ३२) आपण खोटा धर्म, अजाणपणा आणि अंधविश्‍वास यांपासून मुक्‍त झालं आहोत. आणि यासाठी आपण यहोवाचे खरंच खूप आभारी आहोत. भविष्यात “देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य” मिळण्याची आपण वाट पाहत आहोत. (रोम. ८:२१) ख्रिस्ती शिकवणींचं पालन केल्याने तुम्ही आजही या स्वातंत्र्याचा काही प्रमाणात आनंद लुटू शकता. यामुळे तुम्हाला सत्य फक्‍त जाणून घेतल्यानेच नाही तर त्यांनुसार जगल्यानेही ‘ते समजेल.’

२० तरुणांनो, देवाने दिलेल्या स्वातंत्र्याची कदर बाळगा. त्याचा सुज्ञपणे वापर करा. यामुळे तुम्ही चांगल्या भविष्यासाठी आज पाया घालत असाल. एका तरुण बांधवाने म्हटलं: “तुम्ही तरुणपणी आपल्या स्वातंत्र्याचा सुज्ञपणे वापर केल्यामुळे पुढे मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला खूप मदत होते. मग ते निर्णय नोकरी निवडण्याबाबतीत, लग्न करण्याबाबतीत किंवा काही काळासाठी अविवाहित राहण्याबाबतीत असो.”

२१. तुम्ही “खरे जीवन” कसं मिळवू शकता?

२१ या जुन्या व्यवस्थेत लोक ज्याला चांगलं जीवन म्हणतात ते कमी काळाचंच आहे. उद्या काय होणार हे कोणत्याही मानवाला माहीत नाही. (याको. ४:१३, १४) त्यामुळे असा मार्ग निवडा ज्यामुळे तुम्हाला “खरे जीवन” म्हणजे अनंतकाळाचं जीवन मिळेल. (१ तीम. ६:१९) यहोवा कोणालाही त्याची सेवा करण्याची बळजबरी करत नाही. हा निर्णय त्याने सर्वस्व प्रत्येकावर सोपवला आहे. तेव्हा, यहोवाला आपला “वाटा” बनवा आणि त्याने दिलेल्या सर्व ‘उत्तम पदार्थांची’ कदर बाळगा. (स्तो. १०३:५) आणि असा पक्का विश्‍वास असू द्या की तो तुम्हाला “पूर्णानंद” आणि नेहमी “सौख्ये” देईल!​—स्तो. १६:११.