व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव भविष्यात काय करेल?

देव भविष्यात काय करेल?

समस्येत असताना तुम्ही नक्कीच एका मित्राच्या मदतीची अपेक्षा कराल. पण काही लोक म्हणतात की देव आपला मित्र होऊ शकत नाही, कारण त्यांना वाटतं की तो त्यांना मदत करण्यासाठी काहीच करत नाही. खरंतर देवाने आपल्या सर्वांच्या फायद्यासाठी बरंच काही केलं आहे. एवढंच नाही, तर आज आपल्याला ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्या सोडवण्यासाठी तो काही न्‌ काही मार्ग नक्कीच काढणार आहे. देव काय करणार आहे?

सर्व दुष्टाईचा अंत

देव दुष्टाईचं मूळ कारण काढून टाकण्याद्वारे तिचा अंत करणार आहे. बायबल दुष्टाईचं मूळ कारण सांगतं: “सगळे जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहान ५:१९) तो ‘दुष्ट’ दुसरा तिसरा कोणी नसून दियाबल सैतान आहे. येशूने त्याला ‘जगाचा राजा’ म्हटलं. (योहान १२:३१) सैतानाचा या जगावर प्रभाव असल्यामुळे पृथ्वीवर इतकं दुःख आहे. हेच या सर्व दुःखांचं मूळ कारण आहे. मग देव काय करणार आहे?

यहोवा देव लवकरच आपल्या पुत्राद्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे कार्य करणार आहे. आणि येशू “ज्याच्याजवळ मृत्यू घडवून आणण्याची ताकद आहे त्याला, म्हणजेच सैतानाला” नाहीसं करणार आहे. (इब्री लोकांना २:१४; १ योहान ३:८) बायबल म्हणतं की आपला “फार कमी वेळ उरला आहे” हे सैतानाला माहीत आहे. (प्रकटीकरण १२:१२) तसंच देव सर्व दुष्टाईचा आणि दुष्ट लोकांचा नाश करणार आहे.​—स्तोत्र ३७:९; नीतिसूत्रे २:२२.

पृथ्वीला नंदनवन बनवेल

यहोवा पृथ्वीवरची सर्व दुष्टाई काढून टाकेल. त्यानंतर आपला निर्माणकर्ता मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा सर्वकाळच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलेल. तेव्हा कोणकोणत्या गोष्टी घडतील?

कायमची शांती आणि सुरक्षा असेल. “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”​—स्तोत्र ३७:११.

भरपूर प्रमाणात पौष्टिक अन्‍न-धान्य असेल. “भूमीत भरपूर पीक येवो, पर्वतांच्या शिखरांवर ते डोलो.”​—स्तोत्र ७२:१६.

सुंदर घरं आणि समाधान देणारं काम असेल. “ते घरे बांधून त्यात राहतील. द्राक्षाचे मळे लावून त्यांचे फळ खातील . . . माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील.”​—यशया ६५:२१, २२.

अशा परिस्थितीत राहण्याची तुमची इच्छा आहे का? लवकरच आपण सर्व अशा परिस्थितीत राहणार आहोत.

आजार आणि मृत्यू काढून टाकेल

आज सर्व जण आजारी पडतात आणि कालांतराने मरतात. पण लवकरच हे चित्र बदलणार आहे. यहोवा येशूच्या खंडणी बलिदानाचे फायदे आपल्यावर लागू करेल. यासाठी की जो येशूवर “विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.” (योहान ३:१६) यामुळे कोणकोणत्या गोष्टी घडतील?

आजारपण नसेल. “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तिथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.”​—यशया ३३:२४.

मृत्यू नसेल. “तो मृत्यु कायमचा नाहीसा करतो, प्रभु परमेश्‍वर सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुसतो.”​—यशया २५:८.

लोक सर्वकाळासाठी जगतील. “देवाचे कृपादान, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्याद्वारे सर्वकाळाचे जीवन हे आहे.”​—रोमकर ६:२३.

मरण पावलेले लोक जिवंत होतील. “नीतिमान आणि अनीतिमान अशा सर्व लोकांचं पुनरुत्थान होणार आहे.” (प्रेषितांची कार्ये २४:१५) देवाने एका भेटीचा, खंडणी बलिदानाचा प्रबंध केला आहे. येशूच्या खंडणी बलिदानामुळे मृत जण पुन्हा जिवंत होतील.

देव हे सर्वकाही कसं साध्य करेल?

एक परिपूर्ण सरकार स्थापन करेल

देव स्वर्गीय सरकारद्वारे मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा उद्देश पूर्ण करेल. या सरकारचा राजा ख्रिस्त येशू असेल. (स्तोत्र ११०:१, २) ते एक असं सरकार किंवा राज्य आहे, ज्याबद्दल येशूने त्याच्या अनुयायांना प्रार्थना करायला शिकवलं: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, . . . तुझं राज्य येवो.”​—मत्तय ६:९, १०.

देवाचं राज्य या पृथ्वीवर राज्य करेल आणि सर्व दुःखांचा अंत करेल. देवाचं राज्य हे मानवजातीच्या संपूर्ण इतिहासातलं सर्वोत्तम राज्य असेल! त्यामुळे येशूने त्याच्या पृथ्वीवरच्या सेवाकार्यादरम्यान ‘राज्याचा आनंदाचा संदेश’ सांगण्यासाठी खूप मेहनत घेतली. आणि शिष्यांनीही हेच करावं असं त्याने त्यांना सांगितलं.​—मत्तय ४:२३; २४:१४.

मानवजातीसाठी असलेल्या प्रेमामुळे यहोवा देवाने त्यांच्यासाठी या सर्व उल्लेखनीय गोष्टी करण्याचं वचन दिलं आहे. यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल आणखीन जाणून घ्यावंसं आणि त्याच्याशी एक घनिष्ठ नातं जोडावंसं वाटत नाही का? असं केल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल? पुढचा लेख याचं उत्तर देईल.

देव भविष्यात काय करेल? देव आजारपण आणि मृत्यू नाहीसा करेल, मानवजातीला त्याच्या राज्यात संघटित करेल आणि पृथ्वीला नंदनवन बनवेल