व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत होतं का?

तुम्हाला माहीत होतं का?

प्राचीन काळात जहाजाने प्रवास कसा केला जायचा?

पौलच्या दिवसांत सहसा प्रवासी जहाजांची सोय नव्हती. यामुळे प्रवाशांना घेऊन जायला तयार असणाऱ्‍या आणि त्यांना ज्या दिशेने जायचं आहे त्या दिशेने जाणाऱ्‍या मालवाहू जहाजाविषयी इतरांकडे चौकशी करावी लागायची. (प्रे. कार्ये २१:२, ३) मग प्रवासी त्या जहाजाने प्रवास करायचे. जरी ते जहाज प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवत नसलं तरी प्रवासादरम्यान ते जिथे कुठे थांबायचं तिथून प्रवासी दुसऱ्‍या जहाजाने प्रवास करून इच्छित स्थळाच्या जवळ पोचायचा.​—प्रे. कार्ये २७:१-६.

समुद्राचा प्रवास हा वर्षातल्या काही विशिष्ट वेळीच केला जायचा. तसंच, जहाजांचा ठरावीक आराखडा नसायचा. खलाशी खराब वातावरणामुळे प्रवास करण्याचं टाळायचे. तसंच, काही अंधविश्‍वासू खलाशी अशुभ गोष्टींमुळे, जसं की कावळ्याचं दोरखंडावरुन ओरडणं किंवा समुद्रकिनारी एखादं जहाज फुटलेलं दिसलं तर खलाशी प्रवास करण्याचं टाळायचे. वारे अनुकूल असले तर खलाशी प्रवास करण्यासाठी निघायचे. मालवाहू जहाज प्रवाशाला घेऊन जायला तयार आहे असं जेव्हा त्याला कळायचं तेव्हा तो आपलं सामान घेऊन बंदरावर पोचायचा. तिथे तो जहाज निघण्याची घोषणा होईपर्यंत वाट पाहायचा.

इतिहासकार लायनल कॅसन म्हणतात: “प्रवाशांना स्वतःहून जहाज शोधण्याची गरज पडू नये म्हणून रोम शहरात प्रवाशांसाठी एक सोपी व्यवस्था करण्यात आली होती. तिथलं बंदर हे टायबर नदीच्या किनाऱ्‍यावर होतं. ऑस्टिया शहराच्या जवळपास एका मोठ्या चौकात अनेक कार्यालये होती. त्यांपैकी बरेचशी कार्यालये वेगवेगळ्या बंदरावर असलेल्या उद्दोजकांची होती. जसं की, नार्बन [आजचं फ्रान्स] या ठिकाणी उद्दोजकांचं एक कार्यालय होतं, कार्थेज [आजचं ट्यूनिसिया] या ठिकाणी तिथल्या उद्दोजकांचं कार्यालय होतं, . . . आणि अशी बरीचशी कार्यालये होती. प्रवासादरम्यान कोणती शहरं येतील याची चौकशी प्रवाशाला त्या कार्यालयात जाऊन करावी लागायची.”

जहाजाने प्रवास केल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचायचा पण त्यात खूप धोकेसुद्धा होते. मिशनरी दौऱ्‍यांवर असताना पौलने बऱ्‍याचदा जहाज फुटल्याचं अनुभवलं.​—२ करिंथ. ११:२५.