व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती

देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती

येशूने आपल्या शिष्यांना अशी प्रार्थना करायला शिकवलं: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्तय ६:९, १०) देवाचं सरकार किंवा राज्य काय आहे? ते कोणकोणत्या गोष्टी साध्य करेल? आपण त्याबद्दल प्रार्थना का केली पाहिजे?

येशू हा देवाच्या सरकारचा राजा आहे.

लूक १:३१-३३: “तू त्याचे नाव येशू ठेव. तो महान होईल आणि त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील आणि यहोवा त्याला त्याच्या पित्याचे अर्थात दावीदचे सिंहासन देईल, आणि राजा या नात्याने तो याकोबच्या घराण्यावर सदासर्वकाळ राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”

देवाचं सरकार हा येशूच्या प्रचाराचा मुख्य विषय होता.

मत्तय ९:३५: “येशू सभास्थानांत शिकवत, देवाच्या राज्याविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करत आणि सर्व प्रकारचे रोग व दुखणी बरी करत सर्व नगरांतून व गावांतून फिरला.”

देवाचं सरकार कधी स्थापित होणार हे ओळखण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना काही चिन्हं दिली.

मत्तय २४:७: “कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल, आणि ठिकठिकाणी दुष्काळ पडतील व भूकंप होतील.”

येशूचे शिष्य आज देवाच्या सरकाराबद्दल जगभरात लोकांना सांगत आहेत.

मत्तय २४:१४: “आणि सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.”