व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय २०-२१

“ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे”

“ज्या कोणाला तुमच्यामध्ये श्रेष्ठ व्हायचं असेल त्याने तुमचा सेवक झालं पाहिजे”

२०:२८

बाजारांत इतरांनी आपल्याला पाहावं आणि आदराने नमस्कार करावा अशी गर्विष्ठ शास्त्री व परूशी यांची इच्छा होती

गर्विष्ठ शास्त्री व परूशी यांना, इतरांना प्रभावित करण्याची इच्छा होती. तसंच लोकांनी त्यांना महत्त्व द्यावं असं त्यांना वाटायचं. (मत्त २३:५-७) पण येशू मात्र त्यांच्यापेक्षा वेगळा होता. मनुष्याचा पुत्र “सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी” आला होता. (मत्त २०:२८) देवाच्या सेवेतल्या ज्या कामांमुळे लोकांचं लक्ष आपल्याकडे जाईल आणि ते आपली स्तुती करतील अशीच कामं करण्यासाठी आपण जास्त उत्सुक असतो का? ही अशी कार्यं आहेत जी सहसा सर्वांच्या नजरेत येत नाहीत, तर फक्‍त यहोवाच्याच लक्षात येतात. आपण इतरांची सेवा करण्याद्वारे ख्रिस्तासारखी श्रेष्ठता अनुभवू शकतो. (मत्त ६:१-४) एक नम्र सेवक . . .

  • राज्य सभागृहाची साफसफाई आणि दुरुस्तीच्या कामात सहभाग घेतो

  • वृद्ध जणांना आणि इतरांना मदत करण्यात पुढाकार घेतो

  • राज्याच्या कामाला आर्थिक रीत्या मदत करण्यासाठी दान देतो