व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम कसं विकसित कराल?

देवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम कसं विकसित कराल?

आज ख्रिस्ती जरी मोशेच्या नियमाच्या अधीन नसले तरी त्यात दिलेल्या तत्त्वांचं ते पालन करतात. कारण देवावर प्रेम करणं आणि शेजाऱ्‍यावर प्रेम करणं या दोन महत्त्वपूर्ण आज्ञा मोशेच्या नियमशास्त्राचा सार आहेत. (मत्त २२:३७-३९) देवाबद्दल आणि शेजाऱ्‍याबद्दल प्रेम आपल्यात जन्मतःच नसतं, ते आपल्याला विकसित करावं लागतं. हे आपण कसं करू शकतो? एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे दररोज बायबलचं वाचन करणं. आपण जेव्हा शास्त्रवचनांत दिलेल्या देवाच्या व्यक्‍तिमत्त्वाच्या विविध पैलूंचं परीक्षण करतो, तेव्हा आपल्याला “परमेश्‍वराचे मनोहर रूप” पाहायला मिळतं. (स्तो २७:४) यामुळे, देवासाठी आपलं प्रेम वाढतं आणि आपण त्याच्यासारखा विचार करू लागतो. तसंच आपल्याला त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी प्रेरणाही मिळते. इतरांसाठी निःस्वार्थ प्रेम दाखवण्याच्या आज्ञेचादेखील समावेश यात होतो. (योह १३:३४, ३५; १यो ५:३) बायबल वाचन आणखी आनंददायक बनवण्यासाठी पुढे तीन उपयुक्‍त सल्ले दिले आहेत:

  • तुमच्या कल्पनाशक्‍तीचा वापर करा. बायबलमधला अहवाल वाचताना तुम्ही स्वतः तिथे आहात असा विचार करा. तिथलं दृश्‍य, आवाज आणि सुगंध याची कल्पना करा. तसंच अहवालातल्या लोकांच्या काय भावना आहेत, याचीही कल्पना करा.

  • वाचण्याची पद्धत बदला. काही पर्याय म्हणजे: मोठ्याने वाचा किंवा बायबलचं ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकताना ती वचनं पाहा. सलग अध्यायांचं वाचन करण्याऐवजी बायबलमधल्या एखाद्या व्यक्‍तीबद्दल किंवा विषयाबद्दल वाचा. उदाहरणार्थ, येशूबद्दल वाचण्यासाठी अभ्यास मार्गदर्शिका यातला भाग ४ किंवा भाग १६ पाहा. दैनिक वचन ज्या अध्यायातून घेतलं आहे तो संपूर्ण वाचा. बायबलची पुस्तकं ज्या क्रमाने लिहिण्यात आली होती, त्या क्रमानुसार वाचा.

  • समजण्यासाठी वाचा. दिवसाला अनेक अध्याय वाचण्यापेक्षा, फक्‍त एक अध्याय वाचून तो समजून त्यावर मनन केलेलं कधीही उत्तम. वाचलेल्या अहवालातली परिस्थिती समजून घ्या. त्यातल्या बारीकसारीक माहितीचं परीक्षण करा. हिंदी न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन बायबलमध्ये असलेले नकाशे आणि संबंधित वचनं यांचा वापर करा. तुम्हाला न समजलेल्या मुद्द्‌यांपैकी एकावर तरी तुम्ही संशोधन करू शकता. तुम्ही जेवढा वेळ वाचनासाठी दिला होता, शक्य असल्यास तेवढाच वेळ तुम्ही त्यावर मनन करा.