व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा

तुम्हाला कोणी त्रास देतं तेव्हा यहोवावर भरवसा ठेवा

काही लोक आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊ शकतात. ते आपल्याला मारहाण करू शकतात किंवा मानसिक त्रास देऊ शकतात. तसंच, आपण यहोवाची उपासना करू नये म्हणून ते आपल्याला घाबरवू शकतात. आणि यहोवासोबतचं आपलं नातं कमजोर करायचा प्रयत्न करू शकतात. तर मग अशा त्रास देणाऱ्‍या लोकांपासून तुम्ही स्वतःचं संरक्षण कसं करू शकता?

यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांनी त्याच्यावर भरवसा ठेवून त्रास देणाऱ्‍या लोकांचा यशस्वीपणे सामना केला आहे. (स्तो १८:१७) उदाहरणार्थ, एस्तेरने हामान नावाच्या एका दुष्ट माणसाचा कट उघड करण्यासाठी राजाला त्याबद्दल सांगितलं. (एस्ते ७:१-६) पण असं करण्याआधी तिने उपास केला आणि यहोवावर तिचा भरवसा आहे हे दाखवलं. (एस्ते ४:१४-१६) यहोवाने तिच्या कामांवर आशीर्वाद दिला आणि तिचं आणि त्याच्या लोकांचं संरक्षण केलं.

तरुणांनो, तुम्हालाही कोणी त्रास देत असेल तर यहोवाकडे मदत मागा. तसंच तुमच्या पालकांशी किंवा त्यांच्यासारख्या एखाद्या प्रौढ व्यक्‍तीशी या समस्येबद्दल बोला. यहोवाने जसं एस्तेरला मदत केली तशी तो तुम्हालाही मदत करेल याची खातरी ठेवा. पण त्रास देणाऱ्‍या लोकांचा सामना करण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकता?

माझे किशोरवयातले दिवस—शाळेत मुलं त्रास देतात तेव्हा?  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • चार्ली आणि फेरिनच्या उदाहरणातून मुलं काय शिकू शकतात?

  • चार्ली आणि फेरिनने जे म्हटलं त्यावरून, पालक आपल्या मुलांना त्रास देणाऱ्‍या लोकांचा सामना करण्यासाठी कशी मदत करू शकतात?