व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ

यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी काम करणारे मेंढपाळ

ज्यांच्याकडे अधिकार असतो त्यांच्यावर लोक सहसा भरवसा ठेवत नाहीत. आणि खरंतर त्यात त्या लोकांचीही काही चूक नसते. कारण आजपर्यंत अनेक लोकांनी स्वार्थासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. (मीख ७:३) पण आपल्या मंडळीतल्या वडिलांच्या बाबतीत असं नाही. त्यांना यहोवाच्या लोकांच्या भल्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर करायला शिकवलं जातं आणि यासाठी आपण खरंच किती आभारी आहोत!—एस्ते १०:३; मत्त २०:२५, २६.

आज जगात ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्यापेक्षा मंडळीतले वडील खूप वेगळे आहेत. त्यांचं यहोवावर आणि त्याच्या लोकांवर प्रेम असल्यामुळे ते मंडळीत देखरेख करायची जबाबदारी स्वीकारतात. (योह २१:१६; १पेत्र ५:१-३) ते येशूच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करतात. आणि प्रत्येक प्रचारकाला तो यहोवाच्या कुटुंबाचा भाग आहे याची खातरी करून देतात. तसंच यहोवाच्या जवळ राहायलासुद्धा ते भाऊबहिणींना मदत करतात. भाऊबहिणींना प्रोत्साहनाची गरज असते किंवा एखादा तातडीचा प्रसंग उद्‌भवतो, किंवा नैसर्गिक विपत्ती येते तेव्हा ते लगेच मदतीला धावून जातात. तुम्हालाही जर मदतीची गरज असेल तर तुमच्या मंडळीतल्या एखाद्या वडिलांशी बोलायला संकोच करू नका.—याक ५:१४.

मेंढरांची काळजी घेणारे मेंढपाळ,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • वडिलांनी पुरवलेल्या मदतीमुळे मारीयानाला कसा फायदा झाला?

  • वडिलांनी पुरवलेल्या मदतीमुळे एलियासला कसा फायदा झाला?

  • हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, वडील मंडळीत जे काम करतात त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?