व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

यहोवा मनाने खचलेल्यांना वाचवतो

यहोवा मनाने खचलेल्यांना वाचवतो

आपल्या प्रत्येकालाच कधी ना कधी निराश वाटतं. पण, आपण निराश आहोत याचा अर्थ आपला विश्‍वास कमजोर झाला आहे असं नाही. काही प्रसंगी तर यहोवालासुद्धा वाईट वाटलं आहे असं आपण बायबलमध्ये वाचतो. (उत्प ६:५, ६) पण आपल्याला सारखं सारखं किंवा नेहमीच निराश झाल्यासारखं वाटत असेल तर काय?

प्रार्थनेत यहोवाकडे मदत मागा. यहोवाला आपल्या भावनांची आणि आपल्या मानसिक आरोग्याची काळजी आहे. आपल्याला कधी आनंद होतो आणि कधी दुःख होतं हे त्याला माहीत असतं. आणि आपल्याला तसं का वाटतं हेसुद्धा तो समजू शकतो. (स्तो ७:९ख) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आपण जेव्हा दुःखी असतो किंवा नैराश्‍याचा सामना करत असतो, तेव्हासुद्धा यहोवा आपली काळजी करतो आणि तो आपल्याला मदत करू शकतो.—स्तो ३४:१८.

आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. आपल्या मनात नकारात्मक भावना असतात तेव्हा आपण आनंदी नसतो. शिवाय, यहोवाच्या उपासनेवरही त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून आपण आपल्या हृदयाचं म्हणजेच आपल्या व्यक्‍तिमत्त्वाचं रक्षण केलं पाहिजे.—नीत ४:२३.

आपले भाऊबहीण शांतीने कसे राहत आहेत—आजारी असतानाही  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • नैराश्‍याच्या समस्येवर मात करायला निक्कीने कोणती काही व्यावहारिक पावलं उचलली?

  • आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असं निक्कीला का वाटलं?—मत्त ९:१२

  • यहोवा आपल्याला मदत करेल असा भरवसा निक्कीला होता हे तिने कोणकोणत्या मार्गांनी दाखवलं?