व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती जीवन

पालकांनो—तुमच्या मुलांना देवाची बुद्धी मिळवण्यासाठी मदत करा

पालकांनो—तुमच्या मुलांना देवाची बुद्धी मिळवण्यासाठी मदत करा

देवाकडून मिळणारी बुद्धी मिळवण्यासाठी आपल्या मुलांना मदत करण्याचा एक सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, सभांमधून शिकण्यासाठी त्यांना मदत करणं. सभेमध्ये आपली मुलं ऐकतात, पाहतात आणि उत्तरं देतात तेव्हा त्यांना यहोवाबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. आणि यहोवासोबत त्यांची मैत्री होते. (अनु ३१:१२, १३) तुम्ही जर पालक असाल, तर सभेतून आपल्या मुलांना जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून तुम्ही काय करू शकता?

  • आपल्या मुलांना सभेसाठी राज्य सभागृहात घेऊन जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.—स्तो २२:२२

  • सभेच्या आधी आणि नंतर भाऊबहिणींसोबत वेळ घालवा.—इब्री १०:२५

  • कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याजवळ सभेत अभ्यास केल्या जाणाऱ्‍या प्रकाशनांची इलेक्ट्रॉनिक किंवा छापील प्रत असल्याची खातरी करा

  • मुलांना स्वतःच्या शब्दांत उत्तर देण्यासाठी मदत करा.—मत्त २१:१५, १६

  • सभांबद्दल आणि सभेत शिकवल्या जाणाऱ्‍या गोष्टींबद्दल मुलांना प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारे बोला

  • मुलांना मंडळीतल्या वयस्कर लोकांसोबत बोलण्याचं आणि साफसफाईच्या कामात सहभाग घेण्याचं प्रोत्साहन द्या

मुलांना यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यासाठी मदत करायला खूप मेहनत लागते. आणि कधीकधी हे खूप कठीण जाऊ शकतं. पण लक्षात ठेवा की यहोवा तुम्हाला मदत करायला नेहमी तयार आहे.—यश ४०:२९.

आईवडिलांनो, यहोवावर आणि त्याच्या शक्‍तीवर विसंबून राहा,  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पालकांच्या बाबतीत काय होत होतं?

  • मुलांना वाढवताना पालकांनी यहोवाची मदत का घेतली पाहिजे?

  • व्हिडिओमध्ये दाखवलेले पालक आपल्या मुलीला वाढवण्यासाठी यहोवावर विसंबून होते असं का म्हणता येईल?