व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यहुद्यांच्या मंदिराचे शिपाई नेमके कोण होते? आणि त्यांच्या जबाबदाऱ्‍या काय होत्या?

मंदिरात असलेले सर्वच लेवी याजक नव्हते. त्यांना इतर जबाबदाऱ्‍या होत्या, जसं की शिपाई म्हणून काम करणं. हे शिपाई मंदिराच्या अधिकाऱ्‍याच्या हाताखाली काम करायचे. त्यांच्या जबाबदाऱ्‍यांबद्दल यहुदी लेखक फायलो म्हणतात: “यांपैकी काही मंदिराच्या मुख्य दाराजवळ द्वारपाल म्हणून काम करायचे तर काही जण मंदिराच्या आत म्हणजे पवित्र स्थानासमोर पहारा द्यायचे. ज्यांना परवानगी नव्हती अशांनी जाणूनबुजून किंवा चुकून पवित्र स्थानात जाऊ नये याकडे ते लक्ष द्यायचे. इतर शिपाई मंदिराच्या परिसरात फेऱ्‍या मारायचे. मंदिराला पहारा देण्यासाठी त्यांना रात्रंदिवस आळीपाळीने काम करावं लागायचं.”

न्यायसभेकडून मिळालेल्या आदेशानुसार हे शिपाई काम करायला नेहमी तयार असायचे. रोमी सरकारने फक्‍त या यहुदी गटालाच हत्यारं बाळगण्याची परवानगी दिली होती.

योआकिम यारमियास नावाचे विद्वान स्पष्ट करतात, की शिपायांनी जेव्हा येशूला अटक केली तेव्हा येशूने त्यांना एक गोष्ट विचारली. ती म्हणजे तो मंदिरात शिकवत असताना त्यांनी त्याला अटक का केली नाही. (मत्त. २६:५५) हे शिपाई जर मंदिराचे पहारेकरी नसते तर येशूने त्यांना हा प्रश्‍न विचारलाच नसता. त्या विद्वानाचं असंही म्हणणं आहे की या आधीसुद्धा येशूला अटक करण्यासाठी आलेले लोक हेही मंदिरातले शिपाई असावेत. (योहा. ७:३२, ४५, ४६) याच्या काही काळानंतर न्यायसभेने मंदिराच्या अधिकाऱ्‍याला आणि काही शिपायांना सांगितलं की त्यांनी प्रेषितांना न्यायसभेसमोर हजर करावं. तसंच, प्रेषित पौलला मंदिराबाहेर ओढत आणणाराही मंदिरातला एक शिपाईच असावा.—प्रे. कार्ये ४:१-३; ५:१७-२७; २१:२७-३०.