व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १७

“मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे”

“मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे”

“मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण माझ्या पित्यापासून ऐकलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत.”—योहा. १५:१५.

गीत ५ ख्रिस्ताचा आदर्श

सारांश *

१. एखाद्यासोबत तुम्ही घनिष्ठ मैत्री कशी करू शकता?

कोणासोबतही घनिष्ठ मैत्री करण्याचं पहिलं पाऊल म्हणजे त्याच्यासोबत वेळ घालवणं. तुम्ही एकमेकांशी बोलता, एकमेकांना आपले विचार आणि अनुभव सांगता तेव्हा तुमच्यात मैत्री होते. पण येशूसोबत जवळची मैत्री करणं आपल्याला काही अडथळ्यांमुळे कठीण जाऊ शकतं. ते अडथळे कोणते आहेत?

२. येशूसोबत घनिष्ठ मैत्री करण्याचा पहिला अडथळा कोणता आहे?

येशूसोबत घनिष्ठ मैत्री करण्याचा पहिला अडथळा म्हणजे आपण त्याला कधीच भेटलो नाही.  पहिल्या शतकातल्या बऱ्‍याच ख्रिश्‍चनांना याच अडथळ्याचा सामना करावा लागला. असं असलं तरी प्रेषित पेत्रने म्हटलं: “तुम्ही ख्रिस्ताला कधीच पाहिलेले नसूनही तुमचे त्याच्यावर प्रेम आहे. आता जरी तुम्हाला तो दिसत नसला, तरी तुम्ही त्याच्यावर विश्‍वास ठेवता.” (१ पेत्र १:८) तेव्हा, जरी आपण येशूला कधी भेटलो नसलो तरी आपण त्याचे चांगले मित्र बनू शकतो.

३. दुसरा अडथळा कोणता आहे?

दुसरा अडथळा म्हणजे आपण येशूसोबत बोलू शकत नाही.  कारण प्रार्थना करताना आपण यहोवाशी बोलतो. हे खरं आहे, की आपण येशूच्या नावाने प्रार्थना करतो पण आपण त्याच्याशी बोलत नाही. आणि आपण त्याला प्रार्थना करावी अशी त्याची इच्छाही नाही. पण का? कारण प्रार्थना हा उपासनेचा भाग आहे आणि आपण उपासना फक्‍त यहोवाचीच केली पाहिजे. (मत्त. ४:१०) असं असलं तरी आपण येशूवर प्रेम करू शकतो.

४. तिसरा अडथळा कोणता आहे आणि आपण या लेखात कशावर चर्चा करणार आहोत?

तिसरा अडथळा म्हणजे येशू स्वर्गात राहतो  आणि म्हणून आपण त्याच्यासोबत वेळ घालवू शकत नाही. पण तरीही आपण त्याच्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो. त्याच्यासोबतची आपली मैत्री घनिष्ठ करण्यासाठी आपण कोणत्या चार गोष्टी करू शकतो हे आता आपण पाहू या. पण सर्वातआधी आपण पाहू की ख्रिस्तासोबत घनिष्ठ मैत्री करणं का गरजेचं आहे.

आपण येशूचे मित्र बनणं गरजेचं का आहे?

५. येशूसोबत आपण मैत्री का केली पाहिजे? (“ येशूसोबत मैत्री केल्यामुळे आपण यहोवाचे मित्र बनतो” आणि “ येशूबद्दल योग्य दृष्टिकोन” या चौकटीसुद्धा पाहा.)

यहोवासोबत आपलं चांगलं नातं असावं  असं जर आपल्याला वाटतं तर आपण येशूसोबत मैत्री करणं गरजेचं आहे. असं आपण का म्हणू शकतो? हे समजण्यासाठी दोन कारणांकडे लक्ष द्या. पहिलं, येशूने आपल्या शिष्यांना म्हटलं: “तुम्ही माझ्यावर प्रेम केलं . . . म्हणून  तो तुमच्यावर प्रेम करतो. (योहा. १६:२७) त्याने असंसुद्धा म्हटलं: “माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही पित्याकडे येऊ शकत नाही.” (योहा. १४:६) येशूसोबत मैत्री केल्याशिवाय यहोवासोबत नातं घनिष्ठ करणं हे जणू दाराचा वापर न करता घरात प्रवेश करण्यासारखं आहे. येशूने स्वतःबद्दल सांगताना अशाच एका उदाहरणाचा वापर करून म्हटलं: “मेंढरांसाठी असलेलं दार मी आहे.” (योहा. १०:७) दुसरं कारण म्हणजे येशूने आपल्या पित्याच्या गुणांचं हुबेहूब अनुकरण केलं. त्याने आपल्या शिष्यांना म्हटलं: “ज्याने मला पाहिलं आहे, त्याने पित्यालाही पाहिलं आहे.” (योहा. १४:९) तेव्हा यहोवाला जाणून घेण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणजे येशूच्या जीवनाबद्दल अभ्यास करणं. आपण जितकं जास्त येशूबद्दल शिकत जाऊ, तितकं जास्त आपलं त्याच्यावरचं प्रेम वाढत जाईल. आणि येशूवरचं आपलं प्रेम वाढलं तर आपलं पित्यावरचंही प्रेम वाढत जाईल.

६. येशूसोबत आपण मैत्री करण्याचं आणखी एक कारण काय आहे? स्पष्ट करा.

आपल्या प्रार्थनांचं उत्तर मिळावं  यासाठी आपण येशूसोबत मैत्री करणं गरजेचं आहे. प्रार्थनेच्या शेवटी फक्‍त इतकंच म्हणणं पुरेसं नाही की ‘ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो.’ तर आपण ओळखलं पाहिजे की आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्यात यहोवा येशूचा कसा वापर करत आहे. येशूने त्याच्या प्रेषितांना म्हटलं: “माझ्या नावाने तुम्ही जी काही विनंती कराल ती मी पूर्ण करेन.”  (योहा. १४:१३) यहोवा जरी आपली प्रार्थना ऐकून त्याचं उत्तर देतो तरी त्याची इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार त्याने येशूला दिला आहे. (मत्त. २८:१८) यहोवा आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्याआधी पाहतो की आपण येशूने दिलेला सल्ला लागू केला आहे की नाही. उदाहरणार्थ, येशूने म्हटलं होतं: “जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करेल; पण, जर तुम्ही इतरांच्या चुकांची क्षमा केली नाही, तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही.” (मत्त. ६:१४, १५) तेव्हा, हे खूप महत्त्वाचं आहे की यहोवा आणि येशू ज्या प्रकारे लोकांशी प्रेमळपणे वागतात, त्याच प्रकारे आपणसुद्धा त्यांच्यासोबत वागलं पाहिजे!

७. येशूच्या खंडणी बलिदानाचे फायदे कोणाला अनुभवता येतील?

येशूसोबत ज्यांची घनिष्ठ मैत्री आहे फक्‍त त्यांनाच खंडणी बलिदानाचे फायदे  अनुभवता येतील. असं आपण का म्हणू शकतो? येशूने म्हटलं होतं की तो “आपल्या मित्रांसाठी आपला प्राण” देईल. (योहा. १५:१३) येशू पृथ्वीवर येण्याआधी जे विश्‍वासू लोक होऊन गेले, त्यांना त्याच्याबद्दल शिकून घ्यावं लागेल आणि त्याच्यासोबत मैत्री करावी लागेल. त्या विश्‍वासू लोकांपैकी काही म्हणजे अब्राहाम, सारा, मोशे आणि राहाब. पुनरुत्थान झाल्यानंतर अशा यहोवाच्या सेवकांनासुद्धा सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी येशूसोबत एक घनिष्ठ नातं जोडावं लागेल.—योहा. १७:३; प्रे. कार्ये २४:१५; इब्री ११:८-१२, २४-२६, ३१.

८-९. योहान १५:४, ५ या वचनांत सांगितल्याप्रमाणे येशूसोबत मैत्री असल्यामुळे आपल्याला काय करणं शक्य होतं आणि हे महत्त्वाचं का आहे?

आज आपल्याजवळ येशूसोबत प्रचाराचं आणि शिकवण्याचं आनंद देणारं काम करण्याची संधी आहे. पृथ्वीवर असताना येशूने लोकांना शिकवलं. आणि स्वर्गात गेल्यावरही तो मंडळीचं मस्तक या नात्याने प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामाचं नेतृत्व करत आहे. त्याच्याबद्दल आणि पित्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना शिकवण्यासाठी आपण जी मेहनत घेत आहोत, ती तो पाहतो आणि तिची कदर करतो. खरंतर, आपण यहोवा आणि येशू यांच्या मदतीनेच हे काम साध्य करू शकतो.—योहान १५:४, ५ वाचा.

बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं, की यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपलं येशूवर प्रेम असलं पाहिजे आणि आपण ते टिकवून ठेवलं पाहिजे. येशूसोबत मैत्री करण्यासाठी आपल्याला कोणत्या चार गोष्टी करता येतील त्यावर आता आपण चर्चा करू या.

आपण येशूचे मित्र कसे बनू शकतो?

येशूचे मित्र बनण्यासाठी (१) त्याला चांगल्या प्रकारे जाणून घ्या, (२) त्याच्यासारखा विचार आणि कार्य करा, (३) त्याच्या भावांना सहकार्य करा आणि (४) यहोवाच्या संघटनेने केलेल्या व्यवस्थेला पाठिंबा द्या (परिच्छेद १०-१४ पाहा) *

१०. येशूसोबत मैत्री करण्याचं पहिलं पाऊल कोणतं आहे?

१० () येशूला जाणून घ्या.  यासाठी आपण मत्तय, मार्क, लूक आणि योहान ही बायबलमधली पुस्तकं वाचू शकतो. या पुस्तकांतून आपल्याला कळतं की येशू लोकांशी खूप दयाळूपणे वागला. यांवर मनन केल्याने आपल्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होईल. उदाहरणार्थ, तो आपल्या शिष्यांशी कसा वागला यावर विचार करा. त्यांच्यावर अधिकार असूनसुद्धा त्याने कधीही त्यांना दासांसारखी वागणूक दिली नाही. उलट, तो त्यांच्याशी मित्रासारखा वागला आणि आपल्या मनातले विचार व भावना त्याने त्यांना सांगितल्या. (योहा. १५:१५) येशूने त्यांच्या दुःखात त्यांना साथ दिली आणि तो त्यांच्यासोबत रडला. (योहा. ११:३२-३६) त्याचा संदेश स्वीकारणाऱ्‍यांना तो आपला मित्र मानायचा, हे त्याच्या विरोधकांनीही कबूल केलं. (मत्त. ११:१९) येशू आपल्या शिष्यांशी जसा वागला तसंच आपणही दुसऱ्‍यांशी वागलो, तर त्यांच्यासोबत आपले संबंध सुधारतील, आपण जीवनात जास्त आनंदी होऊ आणि ख्रिस्ताबद्दल आपली कदर आणखी वाढेल.

११. येशूसोबत मैत्री करण्याचं दुसरं पाऊल कोणतं आहे आणि हे महत्त्वाचं का आहे?

११ () येशूप्रमाणे विचार करा आणि कार्य करा.  आपण जितक्या चांगल्या प्रकारे येशूचे विचार जाणून घेऊ आणि त्याच्यासारखाच विचार करू तितकीच आपली त्याच्यासोबतची मैत्री घनिष्ठ होईल. (१ करिंथ. २:१६) आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? एका उदाहरणावर विचार करा. त्याने स्वतःचा फायदा पाहण्याऐवजी दुसऱ्‍यांना मदत करण्याबद्दल जास्त विचार केला. (मत्त. २०:२८; रोम. १५:१-३) अशी विचारसरणी असल्यामुळे तो त्याग करायला आणि इतरांना क्षमा करायला तयार होता. लोक त्याच्याबद्दल वाईट बोलायचे तेव्हा तो लगेच नाराज व्हायचा नाही. (योहा. १:४६, ४७) तसंच, लोकांनी बऱ्‍याच काळाआधी केलेल्या चुका लक्षात ठेवून तो त्यांच्याशी वागत नव्हता. (१ तीम. १:१२-१४) येशूने म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असलं, तर यावरूनच सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) तेव्हा स्वतःला विचारा: ‘येशूचं अनुकरण करून मी माझ्या भाऊबहिणींसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी, माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करत आहे का?’

१२. येशूसोबत मैत्री करण्याचं तिसरं पाऊल कोणतं आहे आणि हे आपण कसं उचलू शकतो?

१२ () ख्रिस्ताच्या भावांना सहकार्य करा.  येशूच्या अभिषिक्‍त भावांना केलेलं सहकार्य हे येशूलाच केल्यासारखं आहे असा तो विचार करतो. (मत्त. २५:३४-४०) अभिषिक्‍त भावांना सहकार्य करण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे, येशूने सांगितलेल्या प्रचाराच्या आणि शिष्य बनवण्याच्या कामात मनापासून सहभाग घेणं. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कार्ये १०:४२) ख्रिस्ताचे भाऊ ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ मदतीनेच जगभरात मोठ्या प्रमाणावर चाललेलं प्रचाराचं काम पूर्ण करू शकतात. (योहा. १०:१६) तुम्ही दुसऱ्‍या मेंढरांपैकी एक असाल तर प्रत्येक वेळी प्रचारकार्यात भाग घेताना, तुम्ही फक्‍त अभिषिक्‍त भावांवरच नाही तर येशूवरसुद्धा प्रेम असल्याचं दाखवत असता.

१३. लूक १६:९ यात दिलेला येशूचा सल्ला आपण कसा लागू करू शकतो?

१३ यहोवा आणि येशू जगभरात चाललेल्या राज्याच्या कामाचं मार्गदर्शन करत आहेत. त्या कामाला आपण आर्थिक रीत्या हातभार लावण्याद्वारे यहोवा आणि येशूसोबत मैत्री करतो. (लूक १६:९ वाचा.) जसं की, दूरदूर असलेल्या भागांत प्रचारकार्य करायला, राज्य सभागृहं आणि इतर इमारतींचं बांधकाम व दुरुस्तीचं काम करायला आपण आर्थिक हातभार लावू शकतो. तसंच, नैसर्गिक विपत्ती किंवा इतर संकटांमुळे ज्या भाऊबहिणींचं नुकसान झालं आहे, त्यांना मदत पुरवण्यासाठीही आपण दान देऊ शकतो. शिवाय, आपल्या मंडळीच्या खर्चांसाठी आणि अडचणीत असलेल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठीसुद्धा आपण दान देऊ शकतो. (नीति. १९:१७) या सर्व मार्गांनी आपण ख्रिस्ताच्या भावांना सहकार्य करू शकतो.

१४. इफिसकर ४:१५, १६ यांत सांगितल्याप्रमाणे येशूसोबत मैत्री करण्याचं चौथं पाऊल कोणतं आहे?

१४ () यहोवाच्या संघटनेने केलेल्या व्यवस्थेला पाठिंबा द्या.  आपल्यावर देखरेख करण्यासाठी ज्यांना नेमण्यात आलं आहे त्यांना आपण सहकार्य करतो तेव्हा मंडळीचं मस्तक, येशू याच्यासोबत आपली मैत्री घट्ट होते. (इफिसकर ४:१५, १६ वाचा.) उदाहरणार्थ, आता आपण सगळ्या राज्य सभागृहांचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी काही ठिकाणी दोन मंडळ्यांना एक करण्यात आलं आहे आणि त्यांच्या प्रचाराच्या क्षेत्रात फेरबदल करण्यात आले आहेत. या व्यवस्थेमुळे संघटनेला मिळालेल्या अनुदानाची बरीच बचत करणं शक्य झालं आहे. पण या बदलांमुळे काही प्रचारकांना नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावं लागलं आहे. या विश्‍वासू भाऊबहिणींनी कदाचित बरीच वर्षं एखाद्या मंडळीत सेवा केली असेल आणि त्यामुळे तिथल्या भाऊबहिणींसोबत त्यांचं खूप जवळचं नातं असेल. पण आता त्यांना एका नवीन मंडळीत जाऊन सेवा करायला सांगण्यात आलं असेल. येशूचे हे विश्‍वासू शिष्य या व्यवस्थेला मनापासून सहकार्य देत आहेत हे पाहून त्याला किती आनंद होत असेल!

येशूसोबत कायमची मैत्री

१५. भविष्यात आपली येशूसोबतची मैत्री आणखी घनिष्ठ कशी होईल?

१५ ज्यांना पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करण्यात आलं आहे, त्यांना देवाच्या राज्याचे सहराजे म्हणून सर्वकाळासाठी येशूसोबत राहण्याची आशा आहे. ते प्रत्यक्ष येशूसोबत असतील; म्हणजेच ते त्याला पाहतील, त्याच्याशी बोलतील आणि त्याच्यासोबत वेळ घालवतील. (योहा. १४:२, ३) ज्यांना पृथ्वीवर राहण्याची आशा आहे त्यांच्यावरही येशू प्रेम करेल आणि त्यांच्याकडे लक्ष देईल. जरी येशूला ते पाहू शकत नसले तरी त्याच्यासोबतचं त्यांचं नातं दिवसेंदिवस घनिष्ठ होत जाईल आणि यहोवा व येशूने दिलेल्या जीवनाचा ते सर्वकाळ आनंद घेतील!—यश. ९:६, ७.

१६. येशूसोबत मैत्री केल्यामुळे आपल्याला कोणते आशीर्वाद मिळतात?

१६ येशूचं आमंत्रण स्वीकारून आपण त्याचे मित्र बनतो तेव्हा आपल्याला बरेच आशीर्वाद मिळतात. जसं की, त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्याला मदत करत आहे हे आज आपल्याला जाणवतं. तसंच, आपल्याला सर्वकाळ जगण्याची आशा मिळाली आहे. आणि येशूसोबत मैत्री केल्यामुळे आपल्याला जो सर्वात मोठा आशीर्वाद मिळेल तो म्हणजे त्याच्या पित्यासोबत, यहोवासोबत एक वैयक्‍तिक नातं. येशूचे मित्र म्हटलं जाणं हा आपल्यासाठी खरंच किती मोठा बहुमान आहे!

गीत २५ ख्रिस्ताच्या शिष्यांचे ओळखचिन्ह

^ परि. 5 प्रेषितांनी काही वर्षं येशूसोबत काम केलं आणि वेळ घालावला म्हणून ते त्याचे खूप चांगले मित्र बनले. येशूची इच्छा आहे की आपणसुद्धा त्याचे मित्र बनावं. पण तसं करण्यासाठी आपल्यासमोर असे काही अडथळे आहेत जे प्रेषितांसमोर नव्हते. या लेखात आपण त्या अडथळ्यांबद्दल चर्चा करू या. तसंच, आपण अशा काही सल्ल्यांबद्दलही चर्चा करू या ज्यामुळे आपल्याला येशूसोबत मैत्री करता येईल आणि ती टिकवून ठेवता येईल.

^ परि. 55 चित्रांचं वर्णन: (१) कौटुंबिक उपासना करताना आपण येशूच्या जीवनाबद्दल आणि त्याच्या सेवाकार्याबद्दल अभ्यास करू शकतो. (२) मंडळीत आपल्या भाऊबहिणींसोबत शांती टिकवून ठेवण्यासाठी भरपूर मेहनत घेऊ शकतो. (३) सेवाकार्यात भाग घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करून आपण ख्रिस्ताच्या भावांना सहकार्य करू शकतो. (४) मंडळ्या जेव्हा एक करण्यात येतात तेव्हा वडिलांनी घेतलेल्या निर्णयांना आपण पाठिंबा देऊ शकतो.