व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रार्थनेबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे?

प्रार्थनेबद्दल लोकांचं काय म्हणणं आहे?

“मी जेव्हा निराश असते, काय करावं ते सुचत नाही, तेव्हा मी देवाला प्रार्थना करते. आणि त्या वेळी मला असं वाटतं, की देव अगदी माझ्या जवळ आहे, माझा हात धरून तो मला योग्य दिशा दाखवत आहे.”—मरीया.

“माझी पत्नी १३ वर्षं कॅन्सरशी लढून शेवटी वारली. मला आठवतं त्या दुःखाच्या काळात मी रोज देवाला प्रार्थना करायचो. त्या वेळी मला जाणवायचं, की देव माझ्या प्रार्थना ऐकतोय आणि माझं मन खूप शांत व्हायचं.”—राहूल. *

“प्रार्थना ही देवाने मानवांना दिलेली एक सुंदर भेट आहे.”—अरुण.

मरीया, राहूल आणि अरुण यांच्यासारखंच अनेकांना असं वाटतं, की प्रार्थना ही देवाकडून आपल्याला मिळालेली एक खास भेट आहे. प्रार्थनेद्वारे आपण देवाशी बोलू शकतो, त्याचे आभार मानू शकतो आणि त्याच्याकडे मदत मागू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. प्रार्थनेबद्दल पवित्र शास्त्रात पुढे सांगितलेली गोष्ट खरी आहे यावर त्यांचा पूर्ण विश्‍वास आहे. त्यात म्हटलं आहे: “देवाच्या बाबतीत आपल्याला ही खातरी आहे, की त्याच्या इच्छेप्रमाणे असलेलं काहीही आपण मागितलं तरी तो आपलं ऐकतो.”—१ योहान ५:१४.

पण पवित्र शास्त्रात दिलेल्या या गोष्टीवर आज अनेक लोक विश्‍वास ठेवत नाहीत. जसं की, प्रार्थना करण्याबद्दल स्टीव म्हणतो: “मी १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या तीन मित्रांचा मृत्यू झाला. एकाचा कार ॲक्सिडेन्टमध्ये, तर दुसऱ्‍या दोघांचा समुद्रात बुडून.” त्या वेळी स्टीवने देवाला खूप प्रार्थना केली. त्याबद्दल तो म्हणतो: “‘हे सगळं का घडलं,’ असं मी देवाला विचारलं. पण मला त्याचं उत्तर मिळालं नाही. म्हणून मी विचार केला, ‘मग प्रार्थना तरी कशाला करायची?’” स्टीवसारखंच अनेकांना वाटतं, की देव जर उत्तर देत नसेल तर त्याला प्रार्थना करण्यात काय अर्थ आहे.

काहींना असंही वाटतं की देवाला तर सगळं माहीत आहे; आपल्या गरजा, आपल्या समस्या. मग पुन्हा प्रार्थनेत ते त्याला कशाला सांगायचं.

तर असेही काही जण आहेत ज्यांना वाटतं, की आपण केलेल्या चुकांमुळे देव आपल्या प्रार्थना ऐकत नाही. याबद्दल जेनी म्हणते: “मी ज्या चुका केल्या त्यांचा मला फार पस्तावा होतो. त्यामुळे मला स्वतःबद्दल खूप कमीपणा वाटतो. आणि म्हणून मी सतत स्वतःला सांगत असते, की देव माझ्या प्रार्थना ऐकेल एवढीसुद्धा माझी लायकी नाही.”

प्रार्थनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्याही मनात प्रार्थनेबद्दल काही प्रश्‍न किंवा शंका आहेत का? असतील, तर निराश होऊ नका. कारण पवित्र शास्त्रात, म्हणजे बायबलमध्ये तुमच्या शंका दूर होतील अशी माहिती दिली आहे. आणि त्या माहितीवर तुम्ही पूर्णपणे भरवसा ठेवू शकता. * बायबलमध्ये तुम्हाला पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं मिळतील:

  • देव खरंच आपल्या प्रार्थना ऐकतो का?

  • काही प्रार्थनांची उत्तरं आपल्याला का मिळत नाहीत?

  • प्रार्थना कशी करावी?

  • प्रार्थना केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

^ परि. 3 काही नावं बदलली आहेत.

^ परि. 9 बायबलमध्ये देवाच्या अनेक भक्‍तांच्या प्रार्थना दिल्या आहेत. त्यामध्ये येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनाही आहेत. बायबलच्या एका भागात, ज्याला सहसा जुना करार म्हटलं जातं, १५० पेक्षा जास्त प्रार्थना आहेत.