व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का?

देव तुमच्या प्रार्थना ऐकतो का?

‘देव खरंच माझ्या प्रार्थना ऐकत असेल का,’ असा प्रश्‍न कधी तुम्हाला पडला आहे का?

याविषयी बायबल काय म्हणतं?

  • देव नक्कीच तुमच्या प्रार्थना ऐकतो. बायबल असं आश्‍वासन देतं: ‘यहोवा त्याला प्रामाणिकपणे हाक मारणाऱ्‍या सर्वांच्या जवळ आहे. तो त्यांची मदतीची याचना ऐकून त्यांना सोडवतो.’—स्तोत्र १४५:१८, १९.

  • तुम्ही देवाला प्रार्थना करावी असं त्याला वाटतं. बायबल असं प्रोत्साहन देतं: “सगळ्या गोष्टींत देवाचे आभार मानून प्रार्थना आणि याचना करा आणि आपल्या विनंत्या देवाला कळवा.”—फिलिप्पैकर ४:६.

  • देवाला खरंच तुमची खूप काळजी आहे. तुम्ही कोणत्या चिंतांचा आणि समस्यांचा सामना करता, हे त्याला माहीत आहे. आणि तुम्हाला मदत करायची त्याची मनापासून इच्छा आहे. म्हणूनच बायबल म्हणतं: “आपल्या सगळ्या चिंता त्याच्यावर टाकून द्या, कारण त्याला तुमची काळजी आहे.”—१ पेत्र ५:७.