व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला आठवतं का?

तुम्हाला आठवतं का?

या वर्षाचे टेहळणी बुरूज  अंक तुम्ही लक्ष देऊन वाचले आहेत का? तर मग, पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का ते पाहा:

याकोब ५:११ मध्ये म्हटलं आहे, की “यहोवा दयाळू आणि खूप कृपाळू आहे.” यावरून आपल्याला कोणती खातरी मिळते?

यहोवा दयाळू असल्यामुळे आपल्याला माफ करायला नेहमी तयार असतो. इतकंच नाही, तर याकोब ५:११ यातून आपल्याला ही खातरी मिळते, की आपण त्रासात असतो तेव्हा तो आपल्याला प्रेमाने मदत करतो. आपणही तेच केलं पाहिजे.—टेहळणी बुरूज२१.०१, पृ. २१.

यहोवाने काहींना मस्तक असण्याचा अधिकार का दिला आहे?

यहोवाचं आपल्या कुटुंबावर प्रेम असल्यामुळे त्याने काहींना मस्तक असण्याचा अधिकार दिला आहे. ही खरंतर खूप चांगली व्यवस्था आहे. यामुळे यहोवाच्या कुटुंबात शांती आणि सुव्यवस्था टिकून राहते. कुटुंबातला प्रत्येक जण या व्यवस्थेचा आदर करतो तेव्हा कुटुंबात अंतिम निर्णय कोण घेणार आणि त्या निर्णयांप्रमाणे काम केलं जातं की नाही याची खातरी कोण करणार हे त्याला माहीत असतं.—टेहळणी बुरूज२१.०२, पृ. ३.

मेसेज पाठवणाऱ्‍या ॲप्सचा आपण विचारपूर्वक वापर का केला पाहिजे?

अशा ॲप्सचा वापर करताना कोणाशी मैत्री करावी आणि कोणाशी नाही हे आपण ठरवलं पाहिजे. पण एखाद्या ग्रुपमध्ये जर शंभरएक किंवा हजारएक लोक असतील, तर हे ठरवणं फार कठीण असतं. (१ तीम. ५:१३) शिवाय, यातून चुकीची माहिती पसरवण्याचा आणि व्यवसाय करण्यासाठी भाऊबहिणींचा उपयोग करण्याचा धोका असू शकतो.—टेहळणी बुरूज२१.०३, पृ. ३१.

देवाने येशूला इतक्या यातना आणि मरण का सोसू दिलं?

एक कारण म्हणजे, येशूने वधस्तंभावरचं मरण सोसल्यामुळे यहुद्यांना शापापासून मुक्‍ती मिळणार होती. (गलती. ३:१०, १३) दुसरं कारण म्हणजे, भविष्यात येशूला महायाजकाची भूमिका पार पाडायची होती. आणि त्याचंच प्रशिक्षण यहोवा त्याला देत होता. आणि तिसरं कारण म्हणजे, कठीणातली कठीण परीक्षा आली तरी मानव यहोवाला विश्‍वासू राहू शकतात हे सिद्ध व्हावं म्हणून देवाने येशूला इतक्या यातना आणि मरण सोसू दिलं. (ईयो. १:९-११)—टेहळणी बुरूज२१.०४, पृ. १६-१७.

सेवाकार्य करताना लोक घरी भेटत नसले तर तुम्ही काय करू शकता?

त्यासाठी लोक सहसा घरी असतात अशा वेळी तुम्ही प्रचारकार्य करू शकता. तसंच, तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करू शकता. इतकंच, नाही तर प्रचार करायच्या वेगवेगळ्या पद्धतीही तुम्ही वापरू शकता, जसं की, पत्र लिहून प्रचार करणं.—टेहळणी बुरूज२१.०५, पृ. १५-१६.

प्रेषित पौलने जेव्हा असं म्हटलं, की “नियमशास्त्राद्वारे मी नियमशास्त्राकरता मरण पावलो,” तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (गलती. २:१९)

मोशेच्या नियमशास्त्राने दाखवून दिलं, की मानव अपरिपूर्ण आहेत. तसंच, इस्राएली लोकांना ख्रिस्तापर्यंत नेण्याचं कामही नियमशास्त्राने केलं. (गलती. ३:१९, २४) नियमशास्त्रामुळे पौलने ख्रिस्तावर विश्‍वास ठेवला. आणि ख्रिस्तावर विश्‍वास ठेवल्यामुळे तो “नियमशास्त्राकरता मरण पावला” होता. नियमशास्त्राचा आता त्याच्यावर कोणताही अधिकार नव्हता.—टेहळणी बुरूज२१.०६, पृ. ३१.

धीर धरण्याच्या बाबतीत यहोवाचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे असं का म्हणता येईल?

यहोवा बऱ्‍याच गोष्टी सहन करत आला आहे. जसं की, त्याच्या नावाची बदनामी, त्याच्या अधिकाराचा विरोध, त्याच्या काही मुलांनी केलेलं बंड, सैतानाने केलेले खोटे आरोप, त्याच्या सेवकांना होणारा त्रास, त्याच्या मित्रांपासून झालेली ताटातूट, दुष्ट लोक करत असलेले अत्याचार, लोकांची अनैतिक लैंगिक कामं आणि पृथ्वीची होत असलेली नासाडी.—टेहळणी बुरूज२१.०७, पृ. ९-१२.

धीर धरण्याच्या बाबतीत योसेफने एक चांगलं उदाहरण कसं मांडलं?

योसेफचे भाऊ त्याच्याशी फार वाईट वागले. यामुळे पुढे त्याच्यावर खोटा आरोप लावण्यात आला आणि कित्येक वर्षांपर्यंत त्याला इजिप्तमध्ये तुरुंगात राहावं लागलं.—टेहळणी बुरूज२१.०८, पृ. १२.

हाग्गय २:६-९, २०-२२ या वचनांत राष्ट्रांना हलवण्याबद्दल जे म्हटलं आहे ते काय आहे?

देवाच्या राज्याचा संदेश ऐकून बरीच राष्ट्रं खवळली आहेत. पण त्याच वेळी बरेच लोक सत्यातही येत आहेत. लवकरच सर्व राष्ट्रांना शेवटचं एकदा हलवलं जाईल, म्हणजे त्यांचा कायमचा नाश केला जाईल.—टेहळणी बुरूज२१.०९, पृ. १५-१९.

आपण हार न मानता प्रचारकार्य का करत राहलं पाहिजे?

प्रचारकार्यात आपण जी मेहनत घेतो ती पाहून यहोवाला आनंद होतो. शिवाय, आपण हार न मानता प्रचारकार्य करत राहिलो, तर शेवटी आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळेल.—टेहळणी बुरूज२१.१०, पृ. २५-२६.

लेवीय १९ व्या अध्यायामुळे आपल्याला ‘सर्व वागणुकीत पवित्र राहायला’ कशी मदत होऊ शकते? (१ पेत्र १:१५)

हे शब्द बहुतेक लेवीय १९:२ मधून घेण्यात आले आहेत. लेवीय १९ व्या अध्यायात अशा कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत ज्या पाळल्यामुळे आपण आपल्या रोजच्या जीवनात १ पेत्र १:१५ मध्ये दिलेला सल्ला लागू करू शकतो.—टेहळणी बुरूज२१.१२, पृ. ३-४.