व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वेबसाईट वापरण्याबद्दल एक टीप

वेबसाईट वापरण्याबद्दल एक टीप

होम पेजवर येऊन गेलेले लेख कसे शोधायचे?

बरेच भाऊबहीण jw.org/mr च्या होम पेजवर असलेल्या लेखांचा सेवाकार्यात उपयोग करतात. या लेखांची लिंक इतरांना सहज पाठवता येते. शिवाय, सध्याच्या घडामोडींवरून बायबलच्या भविष्यवाण्या कशा पूर्ण होत आहेत, हेसुद्धा त्यात स्पष्ट केलेलं असतं. एक भावाने असं लिहिलं, की “सध्या आपण ज्या पद्धतीने सेवाकार्य करतोय, त्यासाठी होम पेजवर येणारे हे लेख अगदी योग्य आहेत असं मला वाटतं.”

पण हे लेख नेहमी बदलत राहतात. मग होम पेजवर येऊन गेलेले लेख कसे शोधता येतील?

  • jw.org/mr या वेबसाईटच्या होम पेजवर “आणखी पाहा” या लिंकवर क्लिक करा. ही लिंक तुम्हाला “अलीकडे होम पेजवर प्रकाशित झालेले” असं शीर्षक असलेल्या पेजवर घेऊन जाईल. तिथे तुम्हाला अलीकडेच येऊन गेलेले लेख सापडतील.

  • jw.org/mr वर “लायब्ररी” टॅबखाली “लेखमालिका” या लिंकवर क्लिक करा. ही लिंक तुम्हाला ज्या पेजवर घेऊन जाईल त्यावर “आणखी विषय” या लिंकवर क्लिक करा. किंवा मग JW Library® वर “लायब्ररी” या टॅबवर क्लिक करून “लेखमालिका” सिलेक्ट करा. आणि त्यामध्ये असलेल्या “आणखी विषय” या लिंकवर क्लिक करा. या विषयाखाली तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर अलीकडेच आलेले सगळे लेख पाहायला मिळतील. या विषयाखाली तुम्हाला वेबसाईटच्या होम पेजवर अलीकडेच आलेले सगळे लेख पाहायला मिळतील.