व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास करण्यासाठी एक टीप

अभ्यास करण्यासाठी एक टीप

अलीकडेच मिळालेल्या सुधारित समजांबद्दल माहिती असण्यासाठी आपण काय करू शकतो?

यहोवा आपल्याला टप्याटप्याने बायबलमधल्या गोष्टींची समज देतो आणि खासकरून आजच्या काळात तो बायबलमधल्या गोष्टींची समज आणखीन स्पष्ट करत आहे. त्यामुळे अशा काळात जगणं हा खरंच आपल्यासाठी एक बहुमान आहे. (दानी. १२:४) पण तरीसुद्धा बायबल सत्यांची अलीकडे जी सुधारित समज आपल्याला मिळाली आहे तिच्याबद्दल माहिती असणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. मग याबद्दल असलेली संपूर्ण माहिती आपल्याला कुठे मिळू शकते?

वॉचटावर पब्लिकेशन्स इंडेक्स  (Watch Tower Publications Index) या प्रकाशनात “बिलिफ्स क्लॅरिफाईड” (Beliefs Clarified) या शीर्षकाखाली, मिळालेल्या सुधारित समजांची यादी वर्षांच्या क्रमाने देण्यात आली आहे. तसंच वॉचटावर लायब्ररी किंवा वॉचटावर ऑनलाईन लायब्ररीच्या  सर्च बॉक्समध्ये “अंडरस्टॅडींग क्लॅरीफाईड” (“understanding clarified”) असं अवतरण चिन्हासहित टाईप करून तुम्ही ही यादी शोधू शकता.

यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक  या प्रकाशनातही विषयांच्या क्रमाने एक संक्षिप्त यादी देण्यात आली आहे. या प्रकाशनात “यहोवाचे साक्षीदार” हा विषय शोधा. मग “दृष्टिकोन आणि विश्‍वास” या उपशीर्षकाखाली “विश्‍वासांचे स्पष्टीकरण” हा विषय पाहा.

तर मग व्यक्‍तिगत अभ्यासाचा एक उपक्रम म्हणून अलीकडेच एखाद्या विषयाबद्दल मिळालेली सुधारित समज काय आहे आणि त्यासाठी शास्त्रवचनांचा काय आधार आहे हे का शोधू पाहू नये?