व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

काय बरोबर आणि काय चुकीचं: आपल्या सगळ्यांसमोर असलेला एक प्रश्‍न

काय बरोबर आणि काय चुकीचं: आपल्या सगळ्यांसमोर असलेला एक प्रश्‍न

तुम्ही आधी ज्या ठिकाणी कधीच गेला नाही, अशा ठिकाणी तुम्हाला प्रवास करायचा असेल, तर तुम्ही काय कराल?

  1. १. तुम्हाला वाटतं त्या दिशेने तुम्ही प्रवास करायला सुरुवात कराल.

  2. २. इतरांना माहीत आहे असा विचार करून त्यांच्या मागे चालाल.

  3. ३. किंवा तुम्ही जी.पी.एस. (GPS) पाहाल, नकाशा पाहाल किंवा एखाद्या भरवशाच्या मित्राला विचाराल.

आपण जर पहिले दोन मार्ग वापरले, तर आपण नक्की कुठेतरी पोचू. पण आपल्याला जिथे जायचंय तिथे कदाचित पोचणार नाही. पण आपण जर तिसरा मार्ग निवडला, तर आपण नक्कीच आपल्याला हवंय त्या ठिकाणी पोचू.

आपलं आयुष्यसुद्धा एका प्रवासासारखं आहे. आणि आयुष्याच्या प्रवासात आपल्याला आशा असते, की पुढे आपल्याला चांगलं भविष्य मिळावं. पण आपल्याला चांगलं भविष्य मिळेल की नाही हे एका खास गोष्टीवर अवलंबून असतं. ती म्हणजे निर्णय घेताना आपण कुठलं मार्गदर्शन स्वीकारू.

आपल्या बहुतेक निर्णयांचा कदाचित आपल्या जीवनावर फार कमी परिणाम होईल. पण काही निर्णयांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. या महत्त्वाच्या निर्णयांवरून आपल्याला कळतं, की बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल आपल्याला कसं वाटतं. थोडक्यात सांगायचं तर, आपली नैतिक मूल्यं काय आहेत. आपल्या निर्णयांचा आपल्यावर आणि आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यावर चांगला प्रभाव पडू शकतो किंवा वाईट. आणि हा प्रभाव कधीकधी खूप काळ राहू शकतो. यातले काही निर्णय पुढे दिलेल्या गोष्टींबद्दल असू शकतात:

  • लग्न आणि सेक्स

  • प्रामाणिकपणा, काम आणि पैसा

  • मुलांना कसं वाढवायचं

  • आणि इतरांशी कसं वागायचं

याबाबतीत तुम्ही जे निर्णय घेता त्यामुळे तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भविष्य चांगलं असेल याची खातरी तुम्ही कशी बाळगू शकता?

आपल्याला प्रत्येक वेळी स्वतःला एक प्रश्‍न विचारावा लागेल: बरोबर काय आणि चुकीचं काय या बाबतीत योग्य निर्णय घ्यायला कोणत्या गोष्टीमुळे मला मदत होऊ शकते?

बरोबर काय आणि चुकीचं काय याबद्दल आपण बायबलवर भरवसा का ठेवू शकतो आणि यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते हे आपल्याला या पत्रिकेतून समजेल.