व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास करण्यासाठी एक टीप

तुम्हाला लागू करता येतील अशी बायबलमधली रत्नं शोधा

तुम्हाला लागू करता येतील अशी बायबलमधली रत्नं शोधा

बायबल वाचत असताना त्याबद्दलची इतर माहिती शोधून तुम्ही शास्त्रवचनांतली अनमोल रत्नं शोधू शकता. पण आपण हे आणखी चांगल्या प्रकारे कसं करू शकतो?

खोलवर संशोधन करा.  बायबल अहवाल वाचत असताना त्याबद्दलची बारीकसारीक माहिती शोधून काढा. जसं की, तो अहवाल कोणी लिहिलाय, कोणासाठी लिहिलाय आणि कधी लिहिलाय ते शोधा. तसंच, त्या वेळी परिस्थिती कशी होती, अहवालात लिहिलेल्या घटनेच्या आधी काय घडलं होतं, आणि नंतर काय झालं यांबद्दल माहिती घ्या.

अहवालातून काय शिकायला मिळतं ते पाहा.  तुम्ही हे पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर संशोधन करून शोधू शकता: ‘त्यात असलेल्या लोकांच्या भावना काय होत्या? त्यांनी कोणते गुण दाखवले? मी ते गुण कसे दाखवू शकतो किंवा कसे टाळू शकतो?’

शिकलेल्या गोष्टी लागू करा.  तुम्हाला शिकायला मिळालेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या सेवाकार्यात किंवा इतरांशी वागताना लागू करू शकता. असं केल्यामुळे तुम्ही देवाकडून मिळणारी बुद्धी दाखवत असता. कारण बायबल म्हणतं: “शहाणा या गोष्टींकडे लक्ष देईल.”​—स्तो. १०७:४३.

  • टीप: आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत ‘देवाच्या वचनातली अनमोल रत्नं’ या भागात बायबलच्या एखाद्या अहवालाबद्दल माहिती दिलेली असते. या माहितीमुळे अहवालातून शिकायला मिळालेल्या गोष्टी लागू करायला कशी मदत होते याकडे लक्ष द्या. या भागात स्वतःला विचारण्यासाठी काही प्रश्‍न दिलेले असतात. तसंच, यात मनन करण्यासाठी काही मुद्दे दिलेले असतात आणि विचार करण्यासाठी काही चित्रंही दिलेली असतात.