व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यासासाठी विषय

देवासोबत जवळचं नातं असणारे चांगले निर्णय घेतात

देवासोबत जवळचं नातं असणारे चांगले निर्णय घेतात

उत्पत्ती २५:२९-३४ वाचा आणि एसाव आणि याकोबने चांगले निर्णय घेतले का ते पाहा.

मागच्या-पुढच्या संदर्भात सखोल संशोधन करा. या घटनेच्या आधी काय झालं होतं? (उत्प. २५:२०-२८) आणि नंतर काय झालं?—उत्प. २७:१-४६.

बारीकसारीक माहितीचं संशोधन करा. त्या काळात प्रथमपुत्राचे हक्क आणि जबाबदाऱ्‍या काय होत्या?—उत्प. १८:१८, १९; नवे जग भाषांतर  शब्दार्थसूची, “प्रथमपुत्र; पहिला जन्मलेला.”

शिकलेल्या गोष्टींवर विचार करा आणि त्या लागू करा. प्रथमपुत्राचा हक्क एसावपेक्षा याकोबला जास्त महत्त्वाचा का वाटत होता? (इब्री १२:१६, १७; टेहळणी बुरूज०३ १०/१५ २८-२९) यहोवाला या दोन भावांबद्दल कसं वाटलं आणि का? (मला. १:२, ३) चांगले निर्णय घेण्यासाठी एसाव काय करू शकला असता?

  • स्वतःला विचारा, ‘माझ्या आठवड्याच्या कामकाजात मला कौटुंबिक उपासनेसारख्या आध्यात्मिक गोष्टींची कदर आहे हे मी कसं दाखवू शकतो?’