यहोवाचे साक्षीदार—आम्ही कोण आहोत?
आम्ही निरनिराळ्या वंशांचे व भाषा बोलणारे असलो तरीसुद्धा आमच्या सर्वांची समान ध्येयं असल्यामुळे आमच्यात एकी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही, बायबलचा लेखक व सर्व गोष्टींचा निर्माता असलेल्या यहोवा देवाचा आदर करू इच्छितो. येशू ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचा आम्ही होता होईल तितका प्रयत्न करतो व स्वतःला खरे ख्रिस्ती म्हणवून घेण्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्यातील प्रत्येक जण, लोकांना बायबल आणि देवाचं राज्य यांबद्दल शिकण्यास मदत करण्यात नियमितरीत्या वेळ खर्च करतो. आम्ही यहोवा देव आणि त्याचं राज्य यांबद्दलची लोकांना साक्ष देत असल्यामुळे किंवा बोलत असल्यामुळे आम्हाला यहोवाचे साक्षीदार म्हटलं जातं.
आमच्या साईटला भेट द्या. बायबलचं ऑनलाईन वाचन करा. आमच्याबद्दल आणि आमच्या विश्वासांबद्दल अधिक जाणून घ्या.