व्हिडिओ पाहण्यासाठी

टेहळणी बुरूज—दुसरे कोणतेच नियतकालिक याच्या तोडीचे नाही

टेहळणी बुरूज—दुसरे कोणतेच नियतकालिक याच्या तोडीचे नाही

जगातील इतर कोणत्याही मासिकाचा खप टेहळणी बुरूज नियतकालिकाइतका नाही. या नियतकालिकाच्या प्रत्येक अंकाच्या ४२ लाख पेक्षा अधिक प्रती छापल्या जातात. या नंतर सर्वाधिक खप असलेले अवेक! नियतकालिक आहे. त्याच्या प्रत्येक अंकाच्या ४१ लाख प्रती छापल्या जातात. यहोवाचे साक्षीदार ही दोन्ही नियतकालिके प्रकाशित करतात व २३६ देशांमध्ये त्यांचे वितरण करतात.

यांच्या तुलनेत इतर प्रकाशनांबद्दल काय म्हणता येईल? द असोसिएशन ऑफ मॅगझीन मिडियानुसार, अमेरिकेतील सर्वात जास्त पैसे दिलेले जाणारे मासिक ‘एएआरपी’ ही संस्था प्रकाशित करते. ही संस्था, ५० पेक्षा अधिक वर्षांच्या लोकांसाठी हे मासिक काढते. या मासिकाचा खप २२,४०,००० इतका आहे. जर्मनीतील एडीएसी मोटरवेल्ट नावाच्या मासिकाच्या जवळजवळ १४ लाख प्रती छापल्या जातात आणि चीनी भाषेतील गुशी व्हे (कथा) या मासिकाच्या ५,४०,००० प्रती छापल्या जातात.

वर्तमानपत्रांबद्दल सांगायचे तर, जपानी भाषेतील योमिऊरी शिंबुन हे वर्तमानपत्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या १० लाखांपेक्षा जास्त प्रती नियमित रीत्या छापल्या जातात.

साक्षीदारांची प्रकाशने फक्‍त छपाईतच नाही तर भाषांतरातही उच्चांक गाठतात. उदाहरणार्थ, टेहळणी बुरूज १९० भाषांमध्ये तर अवेक! ८० पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरीत केले जाते. यांच्या तुलनेत, रिडर्स डायजेस्ट २१ भाषांमध्ये प्रकाशित केले जाते आणि यातील मजकूर प्रत्येक देशांत वेगवेगळा असतो.

शिवाय, टेहळणी बुरूजअवेक! ही नियतकालिके ऐच्छिक अनुदानांवर प्रकाशित केली जातात. त्यांच्याबद्दलच्या कसल्याही जाहिराती दिल्या जात नाहीत. ती मोफत वाटली जातात. पण वर उल्लेखण्यात आलेल्या प्रकाशनांच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.

बायबल शिकवणींचा अर्थ समजावून सांगणे आणि खासकरून देवाच्या राज्याबद्दल त्यात काय म्हटले आहे त्याचे स्पष्टीकरण देणे हा टेहळणी बुरूज नियतकालिकाचा उद्देश आहे. १८७९ पासून नियमित रीत्या या नियतकालिकाचे प्रकाशन होत आहे. अवेक! नियतकालिकात, निसर्ग व विज्ञान यांसारख्या विषयांवर लेख असतात. निर्माणकर्त्यावर आपला विश्‍वास वाढवण्याकरता हे लेख लिहिले जातात. बायबलमधील तत्त्वांचा आपल्या जीवनात अवलंब केल्यास आपल्याला त्याचा फायदा कसा होऊ शकतो त्याबद्दलच्या व्यावहारिक गोष्टींवरही या नियतकालिकात जोर दिला जातो.