व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

JW.ORG वेबसाईट

वेगळ्या भाषेत माहिती मिळवा

वेगळ्या भाषेत माहिती मिळवा

तुम्ही नवीन भाषा शिकत असाल किंवा दुसरी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीला jw.org मधील माहिती सांगत असाल तर, तुम्हाला हव्या असलेल्या भाषेतील माहिती मिळवण्याकरता खाली सांगण्यात आलेल्या तीनपैकी एक पद्धत वापरा.

  • साईट वेगळ्या भाषेत ओपन करा

  • वेगळ्या भाषेत वेब पेज डिस्प्ले करा

  • वेगळ्या भाषेत प्रकाशन शोधा

साईट वेगळ्या भाषेत ओपन करा

jw.org वर उपलब्ध असलेल्या भाषांची यादी डिस्प्ले होण्यासाठी लँग्वेज पिकर यावर क्लिक करा.

यादीतील प्रत्येक भाषेच्या नावाआधी पुढील आयकन्स आहेत:

  • ही वेबसाईट किंवा तिचा काही भाग या भाषेत भाषांतरित करण्यात आला आहे. ही भाषा तुम्हाला साईट लँग्वेज ठेवायची असेल तर तिच्यावर क्लिक करा.

  • ही वेबसाईट या भाषेत भाषांतरित करण्यात आलेली नाही; पण डाऊनलोडसाठी प्रकाशने उपलब्ध आहेत. उपलब्ध असलेल्या प्रकाशनांची यादी पाहण्यासाठी भाषेवर क्लिक करा.

  • ही संकेत भाषा आहे.

    तुम्ही निवडलेल्या संकेत भाषेत jw.org या वेबसाईटचा काही भाग भाषांतरित करण्यात आलेला असेल तर ती तुमची साईट लँग्वेज होईल.

    तुम्ही निवडलेल्या संकेत भाषेत jw.org या वेबसाईटचा काही भाग भाषांतरित करण्यात आलेला नसेल तर त्या संकेत भाषेत उपलब्ध असलेल्या प्रकाशनांची एक यादी तुम्हाला दिसेल.

यादीत शेकडो भाषा असल्यामुळे, तुम्हाला हवी असलेली भाषा सोप्या रीतीने शोधण्याकरता पुढील फिचर्सचा उपयोग करा:

  • हवी असलेली भाषा निवडा: तुम्ही अलिकडेच निवडलेल्या चार भाषा यादीत सर्वात वर दिसतील.

  • भाषा टाईप करा: तुमच्या भाषेत किंवा तुम्हाला हव्या असलेल्या भाषेच्या नावाचे काही शब्द/अक्षर टाईप करा. जसे की, तुमची साईट भाषा इंग्लिश आहे आणि तुम्हाला जर्मन भाषेत साईट पाहायची आहे तर तुम्ही “German” किंवा “Deutsch” असे टाईप करू शकता. तुम्ही जसजसे एकेक अक्षर टाईप कराल तसतसे तुम्ही टाईप केलेल्या भाषेच्या नावांशी जुळणारी माहिती कमीकमी होत जाते.

वेगळ्या भाषेत वेब पेज डिस्प्ले करा

पद्धत १: रिड-इन ड्रॉपडाऊन लिस्ट असलेल्या पेजवर या पद्धतीचा उपयोग करा.

तुम्हाला जो लेख वाचायचा आहे किंवा कुणाला तरी दाखवायचा आहे त्या लेखापर्यंत नॅविगेट करा. मग, तो लेख तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत डिस्प्ले व्हावा म्हणून रिड-इन ड्रॉपडाऊन लिस्टमधून ती भाषा निवडा. (तुम्ही शोधत असलेली भाषा रिड-इन ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये नसल्यास, तो लेख त्या भाषेत अद्याप प्रकाशित झालेला नाही असे समजावे.)

टिप: रिड-इन ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये, भाषेच्या नावाच्या डाव्या बाजूला असलेले ऑडिओ आयकन असे सूचित करते, की तुम्ही निवडलेल्या भाषेत त्या लेखाचे ऑडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे.

रिड-इन ड्रॉपडाऊन लिस्टचा उपयोग करून तुम्ही वेगळ्या भाषेत एखादा लेख डिस्प्ले करता तेव्हा, फक्‍त तोच लेख त्या भाषेत डिस्प्ले होतो. बाकीची संपूर्ण साईट तुमच्या मूळ भाषेतच डिस्प्ले होईल.

पद्धत २: तुम्ही वाचत असलेल्या लेखात रिड-इन ड्रॉपडाऊन लिस्ट नसल्यास, तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत साईट पाहण्यासाठी लँग्वेज पिकरचा उपयोग करा. तुम्ही वाचत असलेला लेख तुम्ही निवडलेल्या भाषेत उपलब्ध असेल तर तो डिस्प्ले होईल. नाहीतर, तुम्ही निवडलेल्या भाषेतील होम पेज ओपन होईल.

वेगळ्या भाषेत प्रकाशन शोधा

प्रकाशने > खास लेख येथे जा. ड्रॉपडाऊन लिस्टमधून भाषा निवडा आणि सर्च बटणावर क्लिक करा.

सहजरीत्या एखादी भाषा निवडण्याकरता पुढील फिचर्सपैकी एकाचा उपयोग करा:

  • हवी असलेली भाषा निवडा: तुम्ही अलीकडेच निवडलेल्या चार भाषा यादीत सर्वात वर दिसतील.

  • भाषा टाईप करा: त्या भाषेच्या नावाची एक-दोन अक्षरे, तुमच्या भाषेत किंवा तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत टाईप करा. जसे की, तुमची साईट भाषा इंग्लिश आहे आणि तुम्हाला जर्मन भाषेत साईट पाहायची आहे तर तुम्ही “German” किंवा “Deutsch” असे टाईप करू शकता. तुम्ही जसजसे एकेक अक्षर टाईप कराल तसतसे तुम्ही टाईप केलेल्या भाषेच्या नावांशी जुळणारी माहिती कमीकमी होत जाते.

तुम्ही निवडलेल्या भाषेत अनेक प्रकाशने उपलब्ध असतील तर ‘खास लेख’ पेजवर तुम्हाला तुरळकच प्रकाशने दिसतील. तुम्ही निवडलेल्या भाषेत आणखी प्रकाशने पाहायची असतील तर, त्या भाषेत उपलब्ध प्रकाशनांची यादी असलेल्या ‘प्रकाशने’ पेजवर (जसे की, ‘पुस्तके’ व ‘माहितीपत्रके’ किंवा ‘नियतकालिके’) जा.

तुम्ही निवडलेल्या भाषेत ती प्रकाशने उपलब्ध नसल्यास, जी प्रकाशने उपलब्ध आहेत त्यांचे लिंक्स पेजवर दिसतील.