टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जुलै २०१३

“या गोष्टी केव्हा होतील, . . . हे आम्हास सांगा”

मत्तय २४ आणि २५ अध्यायांतील येशूच्या भविष्यवाणीतील घटना केव्हा घडतील याबद्दल आपली सुधारित समज काय आहे?

“पाहा, . . . मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”

येशूने दिलेल्या गहू आणि निदणाच्या दाखल्यात पेरणी, वाढ आणि कापणीच्या काळाचे वर्णन करण्यात आले आहे. कापणीच्या काळाबद्दल आपली सुधारित समज काय आहे?

मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवले जाते

येशूने पहिल्या शतकातील मंडळ्यांना आध्यात्मिक अन्‍न कसे पुरवले? आजही येशू त्याच पद्धतीचा वापर करत आहे का?

विश्‍वासू व बुद्धिमान दास कोण आहे?

या लेखात विश्‍वासू व बुद्धिमान दासाविषयी सुधारित स्पष्टीकरण देण्यात आले आहे. आपले आध्यात्मिक आरोग्य या दासावर कसे अवलंबून आहे ते जाणून घ्या.

नियमन मंडळाचे एक नवीन सदस्य

१ सप्टेंबर २०१२ पासून, मार्क सँडरसन हे यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून सेवा करू लागले.

जीवन कथा

यहोवाची इच्छा असेल तिथं सेवा करायला तयार

जीवनात अनेक अडथळे आले व नवनवीन बदलांशी जुळवून घ्यावे लागले तरी नेदरलँड्‌समधील एक दांपत्य यहोवावर विसंबून राहण्यास कसे शिकले त्याबद्दल वाचा.

“व्वा! काय सुरेख चित्र!”

चित्रे ही शिकवण्याच्या उद्देशाने, आपल्या विचारांना व भावनांना चालना देण्यासाठी तयार केली जातात. तुम्ही या सुरेख चित्रांचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता?