टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जानेवारी २०१४

यहोवा सर्वकालचा राजा आहे हे या अंकात सांगण्यात आले आहे. शिवाय, या अंकामुळे मशीहाच्या राज्याबद्दल आणि त्या राज्याने काय साध्य केले आहे त्याबद्दल आपली कदर वाढेल.

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—पश्‍चिम आफ्रिकेमध्ये

युरोप सोडून पश्‍चिम आफ्रिकेला येण्याचा निर्णय घेण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे काही जणांना प्रेरणा मिळाली? नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्यांना कोणते अनुभव आले?

सर्वकालचा राजा यहोवा याची उपासना करा

यहोवा कशा प्रकारे एका प्रेमळ पित्याप्रमाणे वागला आहे आणि तो कशा प्रकारे राज्य करत आहे त्याबद्दल जाणून घेतल्यामुळे तुम्ही त्याच्या आणखी जवळ जाऊ शकता.

राज्य शासनाची १०० वर्षे पूर्ण—याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडतो?

देवाच्या राज्य शासनाचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो? मशीही राजा कशा प्रकारे आपल्या प्रजेची सुधारणा करतो, त्यांना प्रशिक्षित करतो आणि संघटित करतो हे जाणून घ्या.

तरुण वयात सुज्ञ निर्णय घ्या

बरेच समर्पित तरुण-तरुणी इतरांना आनंदाने मदत करत आहेत. असे करताना त्यांना अतिशय आनंददायक अनुभव मिळत आहेत. यहोवाच्या सेवेत तुम्ही जास्त सहभाग घेऊन आनंद कसा मिळवू शकता?

अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा

वयस्क ख्रिस्ती बांधवांसमोर सेवा वाढवण्याच्या कोणत्या खास संधी आहेत?

“तुझे राज्य येवो”—पण केव्हा?

या पृथ्वीवर देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे म्हणून देवाचा नेमलेला राजा लवकरच कारवाई करेल याची खात्री आपण का बाळगू शकतो?

लहानपणी घेतलेला एक निर्णय

अमेरिकेतील ओहायो राज्यातील कलंबस येथे राहणाऱ्या एका लहान मुलाने कंबोडियन भाषा शिकायचे का ठरवले? या निर्णयाने त्याच्या पुढील जीवनाला कशा प्रकारे आकार दिला?