टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) मार्च २०१४

आपण स्वार्थत्यागी वृत्ती आणि स्वतःविषयी सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगू शकतो? आपण वृद्ध बंधुभगिनींची आणि नातेवाइकांची काळजी कशी घेऊ शकतो हे या अंकात जाणून घ्या.

सत्यात नसलेल्या नातेवाइकांच्या मनापर्यंत पोचणे

येशू आपल्या नातेवाइकांसोबत ज्या प्रकारे वागला त्यावरून आपण काय शिकू शकतो? दुसरा धर्म पाळणाऱ्या किंवा देवावर विश्वास न ठेवणाऱ्या नातेवाइकांना आपण आपल्या विश्वासांबद्दल कशा प्रकारे सांगू शकतो?

स्वार्थत्यागी मनोवृत्ती कशी टिकवून ठेवावी?

आपल्या सर्वांमध्ये असलेली स्वार्थीपणाची प्रवृत्ती, स्वार्थत्यागी मनोवृत्तीला सुरुंग लावू शकते. बायबलचा उपयोग करून या स्वार्थीपणाच्या प्रवृत्तीशी लढा कसा देता येईल हे या लेखात सांगितले आहे.

सकारात्मक दृष्टिकोन कसा टिकवून ठेवावा?

बऱ्याच लोकांना नकारात्मक भावनांशी का झगडावे लागते? आपण स्वतःविषयी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासाठी बायबलचा उपयोग कसा करू शकतो हे या लेखात सांगितले आहे.

कौटुंबिक उपासना—तुम्ही ती आणखी आनंददायक कशी बनवू शकता?

वेगवेगळ्या देशांत कौटुंबिक उपासना कशा प्रकारे चालवली जाते हे जाणून घ्या व तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करू शकता ते पाहा.

मंडळीतील वृद्ध बांधवांचा आदर करा

विश्वासू वृद्धजनांकडे यहोवा कोणत्या दृष्टीने पाहतो हे जाणून घ्या. वृद्ध आईवडिलांप्रती प्रौढ मुलांच्या कोणत्या जबाबदाऱ्या आहेत? ख्रिस्ती मंडळ्या कशा प्रकारे वृद्धांबद्दल आदर दाखवू शकतात?

वृद्धजनांची काळजी घेणे

“अनिष्ट” दिवस येण्याआधीच वृद्ध आईवडील आणि मुले काळजी घेण्यासंबंधी काही योजना करून व निर्णय घेऊन ठेवू शकतात. येणाऱ्या आव्हानांना ते कसे तोंड देऊ शकतात?

तुमचे बोलणे—‘होय आणि तरी नाही?’

खऱ्या ख्रिश्चनांनी नेहमी आपला शब्द पाळला पाहिजे. त्यांचे बोलणे कधीही ‘होय आणि तरी नाही’ असे असू नये. आपल्याला आपली योजना रद्द करावी लागणार असल्यास काय? प्रेषित पौलाच्या उदाहरणावरून शिका.