टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जून २०१९

या अंकात ५ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०१९ पर्यंत अभ्यासले जाणारे लेख दिले आहेत

“कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा”

सैतान लोकांना फसवण्यात तरबेज आहे. तो आपल्यावर कशा प्रकारे प्रभाव टाकण्याचा आणि आपल्याला यहोवाच्या विरोधात करण्याचा प्रयत्न करतो?

देवाच्या ज्ञानाच्या विरोधात असलेले तर्कवितर्क उलथून टाका!

आपली पार्श्‍वभूमी, संस्कृती आणि आपलं शिक्षण यांचा आपल्या विचारांवर प्रभाव पडतो. आपल्या मनात “भक्कम बुरुजांसारख्या” असलेल्या गोष्टी आपण कशा उलथून टाकू शकतो?

तणावात असताना यहोवावर विसंबून राहा

अती प्रमाणात किंवा दीर्घकाळापर्यंत असलेल्या तणावामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक रीत्या त्रास होऊ शकतो. यहोवाने प्राचीन काळात आपल्या सेवकांना तणावाचा सामना करण्यासाठी कशी मदत केली यावरून आपण खूपकाही शिकू शकतो.

तणावाचा सामना करण्यासाठी इतरांना मदत करा

लोट, ईयोब आणि नामी यांनी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली. पण तरी त्यांना आपल्या जीवनात तणावपूर्ण परिस्थितींना सामोरं जावं लागलं. आपण त्यांच्या अनुभवांवरून काय शिकू शकतो?

सैतानाच्या एका पाशापासून संरक्षण कसं मिळवाल?

पोर्नोग्राफीच्या पाशात देवाचे बरेचसे सेवक अडकले आहेत. आपण या अशुद्ध गोष्टीचा प्रतिकार कसा करू शकतो?

एका प्राचीन गुंडाळीतल्या मजकुराचा खुलासा

१९७० मध्ये इस्राएलच्या एन-गेदी या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांना पार जळून गेलेली एक गुंडाळी सापडली. थ्री-डी स्कॅनिंग तंत्र याच्या साहाय्याने गुंडाळीतल्या मजकुराचा खुलासा झाला. यामुळे काय समोर आलं?