पाहू या सोबती
१. डोळे मिटूनी पाहिले,
दिसे शांती आनंद, प्रेम जगी.
या तुम्ही,
पाहू ती सोबती.
२. ना हे स्वप्न, ना ही कल्पना,
दिले याहाने वचन आम्हा,
आहे पक्की,
आशा ती आपली.
(कोरस)
पाहा तो—
वाहे आनंद साऱ्या जगी
मिळे ही—
आशा मला त्याच्या शब्दातूनी.
३. होते स्मरणी जे याहाच्या,
आतूर आहो पुन्हा त्या भेटण्या.
या तुम्ही,
भेटू त्या प्रियांना.
४. गेले दुःखाचे सरून धुके,
पुन्हा ना अश्रू, गेले कायमचे.
या तुम्ही,
पाहू ते सोबती.
(कोरस)
पाहा तो—
वाहे आनंद साऱ्या जगी.
मिळे ही—
आशा मला त्याच्या शब्दातूनी.
५. याहाचा शब्द पुरे आम्हा,
रंगवू आशा जगाची त्या.
(जोडणाऱ्या ओळी)
पाहू वाट धीराने,
शब्द खरे,
होतील ते लवकर पुरे,
पाहू—
६. चित्र हे डोळ्यापुढे
हे प्रेम, आनंद, शांती जगी.
या तुम्ही,
पाहू या सोबती.