वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा

तुम्ही वाचन करण्याच्या, बोलण्याच्या व शिकवण्याच्या कलेत सुधारणा करणं खूप गरजेचं आहे. या बाबतीत तुम्हाला मदत मिळावी म्हणून हे माहितीपत्रक तयार करण्यात आलं आहे.

नियमन मंडळाकडून पत्र

मानवजातीला दिल्या जात असलेल्या संदेशांपैकी सर्वात महत्त्वाच्या संदेशाविषयी आपण लोकांना शिकवत आहोत.

अभ्यास १

प्रभावी प्रस्तावना

प्रस्तावना प्रभावी असेल तर तीन गोष्टी साध्य होतील.

अभ्यास २

रोजच्या बोलण्याची शैली

संभाषण शैलीत बोलल्यामुळे श्रोते निश्‍चिंत होतील आणि तुमचा संदेश ऐकायला तयार होतील.

अभ्यास ३

प्रश्‍नांचा उपयोग

लोकांची आवड वाढवण्यासाठी व मुख्य मुद्द्‌यांवर जोर देण्यासाठी प्रश्‍नांचा उपयोग करा.

अभ्यास ४

शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय

एखादं वचन वाचण्याआधी ऐकणाऱ्‍यांचं मन कसं तयार करू शकता त्याचा विचार करा.

अभ्यास ५

अचूक वाचन

यहोवाबद्दलचं ज्ञान इतरांना देण्याचा एक अत्यावश्‍यक मार्ग म्हणजे अचूक वाचन करणे.

अभ्यास ६

शास्त्रवचन कसं लागू होतं ते स्पष्ट करा

तुम्ही वाचलेलं शास्त्रवचन आणि सांगत असलेला मुद्दा यात संबंध कसा आहे ते समजायला लोकांना मदत करा.

अभ्यास ७

अचूक आणि पटण्यासारखं

अचूक आणि खातरीलायक पुरावा तुमचं बोलणं ऐकणाऱ्‍या लोकांना योग्य निष्कर्ष काढायला मदत करेल.

अभ्यास ८

शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा

श्रोत्यांची आवड वाढवणाऱ्‍या व त्यांना महत्त्वपूर्ण मुद्दे शिकवणाऱ्‍या साध्या-सोप्या उदाहरणांचा उपयोग करून आपल्या शिकवण्याच्या कलेत सुधारणा करा.

अभ्यास ९

दृश्‍य साधनांचा योग्य वापर

मनावर कायमची छाप पाडण्यासाठी दृश्‍य साधनांचा वापर

अभ्यास १०

आवाजात चढ-उतार

लोकांच्या मनातील भावना जागृत करण्यासाठी व त्यांना कार्य करायला प्रवृत्त करण्यासाठी आवाजात चढ-उतार आणा, आवाज कमी जास्त करा, बोलण्याची गती कमी-जास्त करा.

अभ्यास ११

आवेश

तुमच्या सादरीकरणात आवेश असेल तर त्यावरून तुमच्या भावना दिसून येतील आणि श्रोते तुमचं बोलणं लक्ष देऊन ऐकतील.

अभ्यास १२

प्रेम व सहानुभूती

तुम्ही जर प्रामाणिकपणे बोलाल तर श्रोत्यांची तुम्हाला काळजी आहे हे दिसून येईल.

अभ्यास १३

व्यावहारिक फायदे स्पष्ट करा

श्रोत्यांना हे समजायला मदत करा, की तुम्ही सांगत असलेल्या विषयाचा त्यांच्या जीवनावर परिणाम कसा होऊ शकतो. आणि शिकत असलेल्या गोष्टींचा अवलंब ते आपल्या जीवनात कसा करू शकतात तेही त्यांना दाखवा.

अभ्यास १४

मुख्य मुद्द्‌यांवर जोर द्या

भाषण देता तेव्हा, श्रोत्यांनाही तुमच्यासोबत विचार करण्यास मदत करा. आणि प्रत्येक मुद्दा तुमच्या भाषणाच्या उद्देशाशी व विषयाशी कसा संबंधित आहे ते स्पष्ट करा.

अभ्यास १५

खातरीने बोला

खातरीने बोला. तुम्ही जे सांगत आहात त्यावर तुमचा विश्‍वास आहे आणि ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे हे दाखवून द्या.

अभ्यास १६

उत्तेजन देणारं आणि सकारात्मक

टीकात्मक बोलण्याऐवजी उत्तेजनकारक बोला. देवाच्या वचनात असलेल्या तजेलादायक सत्यांकडे लक्ष वेधा.

अभ्यास १७

इतरांना समजायला सोपं

तुमचा संदेश श्रोत्यांना समजण्यास मदत करा. मुख्य मुद्दे स्पष्टपणे सांगा.

अभ्यास १८

श्रोत्यांना शिकता येईल अशी माहिती

श्रोत्यांच्या विचारांना चालना द्या. त्यांना विषयावर विचार करायला लावा ज्यामुळे आपण काहीतरी महत्त्वाचं शिकलो असं त्यांना वाटेल.

अभ्यास १९

हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा

देव, त्याचं वचन बायबल यावर प्रेम करण्याचं उत्तेजन द्या.

अभ्यास २०

प्रभावी समाप्ती

भाषणाची समाप्ती प्रभावी असेल तर श्रोत्यांना, शिकलेल्या गोष्टी स्वीकारून त्या आपल्या जीवनात लागू करण्याचं उत्तेजन मिळेल.

आपल्या प्रगतीची नोंद करा

वाचन व शिकवणे याकडे लक्ष देत असताना तुम्ही केलेल्या प्रगतीची नोंद ठेवा.

तुम्हाला कदाचित हेसुद्धा पाहायला आवडेल

VIDEO SERIES

वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा​—व्हिडिओ

सर्वांसमोर वाचन करण्याचं आणि शिकवण्याचं महत्त्वपूर्ण कौशल्य विकसित करा.