व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

JW.ORG वेबसाईट

प्रकाशन शोधा

प्रकाशन शोधा

jw.org वेबसाईटवरील ‘प्रकाशने’ या भागात शेकडो डिजिटल, ऑडिओ व व्हिडिओ प्रकाशने उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे असलेले प्रकाशन शोधण्याकरता या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्सचा उपयोग करा.

  • विशिष्ट शीर्षक टाईप करून प्रकाशन शोधा

  • एखादा विशिष्ट नियतकालिक अंक शोधा

  • एखाद्या प्रकाशनाचे उपलब्ध असलेले सर्व फॉरमॅट डिस्प्ले करा

  • एखाद्या प्रकाशनातील विशिष्ट माहिती शोधा

विशिष्ट शीर्षक टाईप करून प्रकाशन शोधा

एखाद्या प्रकाशनाचे संपूर्ण शीर्षक किंवा त्यातील काही शब्द तुम्हाला माहीत असतील तर ते प्रकाशन पटकन शोधण्याकरता खाली सुचवण्यात आलेल्या पद्धतीचा उपयोग करा.

‘प्रकाशने’ > ‘पुस्तके व माहितीपत्रके’ या भागात जा.

  • ऑल आयटम्स ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये तुम्ही शोधत असलेल्या प्रकाशनाच्या शीर्षकातील एखादा शब्द टाईप करा. उदाहरणार्थ, बायबल काय शिकवते पुस्तक तुम्ही शोधत असाल तर ‘शिकवते’ हा शब्द टाईप करा. ज्या शीर्षकांमध्ये ‘शिकवते’ हा शब्द आहे तितकीच प्रकाशने ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये दिसतील. यातून तुम्हाला हवे असलेले प्रकाशन निवडा.

  • सर्च बटणावर क्लिक करा.

एखादा विशिष्ट नियतकालिक अंक शोधा

‘प्रकाशने’ > ‘नियतकालिके’ या भागात जा.

या पेजवर तुम्हाला सावध राहा! आणि टेहळणी बुरूज (सार्वजनिक आवृत्ती) नियतकालिकांचे सर्वात नवीन चार अंक दिसतील. तसेच टेहळणी बुरूज याची अभ्यास आवृत्ती व सोपी अभ्यास आवृत्ती यांचे आठ अंक दिसतील. (काही भाषांमध्ये या सर्व आवृत्त्या उपलब्ध नाहीत.) विशिष्ट अंक शोधण्याकरता खालील सूचनांकडे लक्ष द्या:

  • ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुम्हाला हव्या असलेल्या वर्षाचे नियतकालिक निवडा.

  • सर्च बटणावर क्लिक करा.

एखाद्या प्रकाशनाचे उपलब्ध असलेले सर्व फॉरमॅट डिस्प्ले करा

प्रकाशने दोन प्रकारे डिस्प्ले होतील. एक ग्रिड व्ह्यू आणि लिस्ट व्ह्यू.

ग्रिड व्ह्यू यावर क्लिक केल्यास प्रकाशनांची संक्षिप्त यादी दिसेल. हा डिफॉल्ट व्ह्यू असतो.

ग्रिड व्ह्यू मध्ये प्रकाशनाचे मुखपृष्ठ, डाऊनलोड आयकन्स आणि प्रत्येक प्रकाशनाचे शीर्षक दिसते. त्या डाऊनलोड टाईपचे (डिजिटल किंवा ऑडिओ) उपलब्ध असलेले सर्व फाईल फॉरमॅट पाहण्यासाठी डाऊनलोड आयकनवर कर्सर न्या (किंवा मोबाईलमध्ये पाहत असाल तर त्यावर टॅप करा).

व्ह्यू बदलण्यासाठी लिस्ट व्ह्यू आयकनवर क्लिक करा.

लिस्ट व्ह्यू केल्यास, प्रत्येक प्रकाशनाचे उपलब्ध असलेले फाईल फॉरमॅट डिस्प्ले होतील.

काही प्रकाशने अतिरिक्‍त आवृत्तींमध्ये जसे की मोठ्या अक्षरांतही उपलब्ध आहेत. त्या फॉरमॅटमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व आवृत्ती (उदा. PDF) पाहण्यासाठी त्या फाईलवर क्लिक करा. क्लिक केल्यावर डायलॉग बॉक्स येईल. तुम्ही डाऊनलोड करू इच्छित असलेल्या आवृत्तीच्या लिंकवर क्लिक करा.

एखाद्या प्रकाशनातील विशिष्ट माहिती शोधा

एखादे प्रकाशन वेबपेज म्हणून ऑनलाईन वाचण्याकरता उपलब्ध असेल तर, साईट सर्च याचा उपयोग करून लेखातील विशिष्ट शब्द किंवा वाक्यांश टाईप करून तो लेख किंवा अध्याय शोधा.

सर्च आयकनवर क्लिक करा. तुम्ही शोधत असलेला शब्द किंवा वाक्यांश टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करा आणि सर्च बटणावर क्लिक करा. त्या प्रकाशनातील अनेक शब्द किंवा वाक्यांश तुम्हाला माहीत असतील तर ते सर्व टाईप करा. असे केल्यास तुम्ही शोधत असलेला लेख किंवा अध्याय पटकन सापडेल.

पुढील सूचनांचे पालन करून तुम्ही प्रकाशनांचा शोध कमी करू शकता:

  • ॲडवान्स्‌ड सर्च किंवा ॲडवान्स्‌ड ऑप्शन्स लिंक यावर क्लिक करा.

  • कॅटेगरी मथळ्याखाली, पब्लिकेशन्स चौकोनात टिक करा.

  • सर्च बटणावर क्लिक करा.