व्हिडिओ पाहण्यासाठी

भारत

भारतात ऐतिहासिक ठरलेल्या घटना

भारतात ऐतिहासिक ठरलेल्या घटना
  1. २७ जानेवारी २०१४—कर्नाटकातल्या मानवाधिकार आयोगाने मान्य केलं, की यहोवाच्या साक्षीदारांच्या कायदेशीर हक्कांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे साक्षीदारांना याबद्दल मोबदला मिळावा असं आयोगाने सांगितलं

  2. मार्च २००२—वाढलेल्या कामामुळे आणि मोठ्या जागेची गरज असल्यामुळे साक्षीदारांनी आपलं शाखा कार्यालय बेंगलूरु या ठिकाणी हलवलं

  3. २००२—यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध होणाऱ्‍या जमाव हिंसाचारात वाढ

  4. ११ ऑगस्ट १९८६—भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने बिजू इमॅन्यूएल विरुद्ध केरळ राज्य या खटल्यात एक ऐतिहासिक निर्णय सुनावला. या निर्णयामुळे साक्षीदारांच्या भाषण स्वातंत्र्याच्या अधिकाराला बळकटी मिळाली

    या खटल्याबद्दल आणखी वाचा

  5. ७ मार्च १९७८—यहोवाच्या साक्षीदारांनी ‘द वॉचटॉवर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची भारतात कायदेशीर नोंदणी केली

  6. २६ जानेवारी १९५०—भारताने स्वतंत्र देश म्हणून स्वतःची नवीन राज्यघटना (संविधान) स्वीकारली

  7. ९ डिसेंबर १९४४—सरकारने यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांवर असलेली बंदी उठवली

  8. १४ जून १९४१—सरकारने यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांवर बंदी घातली

  9. १९२६—साक्षीदारांनी मुंबई (त्या काळातलं बॉम्बे) या ठिकाणी आपलं कार्यालय स्थापन केलं

  10. १९०५—यहोवाच्या साक्षीदारांचा पहिला गट उपासनेसाठी एकत्र आला