व्हिडिओ पाहण्यासाठी

खारकीव, युक्रेनमधले आपले भाऊबहीण. बॉम्बस्फोट होत असताना संरक्षणासाठी त्यांनी आश्रय घेतला आहे

३ मार्च २०२२
युक्रेन

युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं

युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं

२४ फेब्रुवारी २०२२ ला रशियाने युक्रेनवर हल्ला केला. युक्रेनमध्ये १,२९,००० पेक्षा जास्त यहोवाचे साक्षीदार त्यांच्या मुलांसोबत राहतात. आपल्या या भाऊबहिणींना मदत करायला शाखा कार्यालयाने २७ विपत्ती मदतकार्य समित्या (DRC) स्थापन केल्या. याशिवाय, या कठीण काळात इथले भाऊबहीण एकमेकांना आणि शेजाऱ्‍यांना आधार देऊन आणि शक्य तितकी मदत करून आपलं ख्रिस्ती प्रेम दाखवत आहेत.

अशा परिस्थितीतही आपले बरेचसे भाऊबहीण युक्रेनमधेच राहत आहेत. तर काहींनी देश सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. जे भाऊबहीण देश सोडून जात होते त्यांना सीमा पार करायला मोठमोठ्या रांगेत थांबावं लागलं. काही रांगा तर ३० किमी इतक्या लांब होत्या. तसंच, सीमा पार करायला त्यांना तीन ते चार दिवस लागले. स्थानिक भाऊबहिणींनी रांगेत थांबलेल्या आपल्या भाऊबहिणींना शोधलं आणि त्यांना खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि इतर मदत पुरवली. शेवटी हे भाऊबहीण जेव्हा सीमा पार करून शेजारच्या देशांमध्ये गेले, तेव्हा तिथले भाऊबहीण त्यांना मदत करायला आणि सांत्वन द्यायला jw.org चे पोस्टर्स घेऊन उभे होते.

युक्रेनमधून निघून आलेल्या भाऊबहिणींना मदत करायला पोलंडमधल्या (डावीकडे) आणि स्लोवाकियामधल्या (उजवीकडे) बहिणी

आपल्या भाऊबहिणींवर काय परिणाम झाला?

  • खारकीवमध्ये सहायक सेवक म्हणून सेवा करणारे आपले मूकबधीर भाऊ पेट्रो मोझूल यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला

    दुःखाची गोष्ट म्हणजे १ मार्च २०२२ ला, बॉम्बस्फोटांमुळे खारकीव इथल्या आपल्या एका मूकबधीर भावाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली

  • आणखी ३ बहिणी जखमी झाल्या

  • ५००० पेक्षा जास्त प्रचारकांना आपलं घर सोडून पळावं लागलं

  • २ घरं उद्ध्‌वस्त झाली

  • ३ घरांचं मोठं नुकसान झालं

  • ३५ घरांचं थोडंफार नुकसान झालं

  • २ राज्यसभागृहांचं नुकसान झालं

  • वीज, हिटर, टेलीफोन आणि पाण्याची सोय नसल्यामुळे अनेक प्रचारकांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं

मदतकार्य

  • २७ विपत्कालीन मदतकार्य समित्या (DRC) बांधवांची मदत करत आहेत

  • या समित्यांनी ८६७ प्रचारकांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे

  • या समित्या भाऊबहिणींना गरजेच्या आणि खाण्यापिण्याच्या वस्तू पुरवत आहेत

वर दिलेली आकडेवारी ही युद्धाच्या सुरवातीला मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे.

युक्रेनमधली परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. अशा परिस्थितीचा सामना करायला आपल्या भाऊबहिणींना बुद्धी आणि समजशक्‍ती मिळावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. तसंच त्यांनी एकमेकांना खरं ख्रिस्ती प्रेम दाखवत राहावं अशीही आम्ही प्रार्थना करतो.​—नीतिवचनं ९:१०; १ थेस्सलनीकाकर ४:९.