८ मार्च २०२२
युक्रेन
रिपोर्ट #१ | युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं
युक्रेनमध्ये जागोजागी बॉम्बस्फोट सुरू असल्यामुळे मारियुपूल, खारकीव, होस्टोमेल आणि इतर शहरांमधल्या आपल्या भाऊबहिणींना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. काहींना जवळपास आठवड्याभरापासून आपलं तळघर किंवा राहत असलेलं ठिकाण सोडता आलं नाही. अन्नधान्याचा पुरवठा कमी पडत आहे आणि इंटरनेट, टेलिफोन तसंच वीजपुरवठा सुरळीत चालू नसल्यामुळे भाऊबहिणींशी संपर्क करायला अवघड जात आहे.
दुःखाची गोष्ट म्हणजे, मिरनोराद इथल्या २८ वर्षांचे भाऊ दिमित्रो रोझडोरस्की यांनी चुकून सुरुंगावर पाय ठेवला, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे आणि ज्या भागात जोरदार बॉम्बस्फोट झाले आहेत अशा भागातल्या आपल्या भाऊबहिणींसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.—२ थेस्सलनीकाकर ३:१.
७ मार्च २०२२ पर्यंत युक्रेनमधून खालील माहिती मिळाली आहे:
आपल्या भाऊबहिणींवर काय परिणाम झाला?
२ प्रचारकांचा मृत्यू झाला आहे
८ प्रचारकांना दुखापत झाली आहे
२०,६१७ प्रचारकांना आपलं घर सोडून पळावं लागलं आणि युक्रेनमध्येच इतर सुरक्षित ठिकाणी जावं लागलं
२५ घरं उद्ध्वस्त झाली
२९ घरांचं मोठं नुकसान झालं
१७३ घरांचं थोडंफार नुकसान झालं
५ राज्यसभागृहांचं नुकसान झालं
मदत कार्य
युक्रेनमध्ये २७ विपत्कालीन मदत समित्या (DRC) बांधवांची मदत करत आहेत
या समित्यांनी ६,५४८ प्रचारकांची सुरक्षित ठिकाणी राहायची व्यवस्था केली
७,००८ प्रचारकांना इतर देशात जावं लागलं आणि तिथले बांधव त्यांची मदत करत आहेत
पश्चिम युक्रेनच्या चेर्निवत्सी, इव्हानो-फ्रान्सिएव्हस्क, लव्हीव आणि ट्रान्सकारपॅथियन अशा काही भागांत शरणार्थ्यांना आश्रय घेता यावा म्हणून १ संमेलनगृह आणि सुमारे ३० राज्यसभागृहांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.