१ एप्रिल, २०२२
युक्रेन
रिपोर्ट #५ | युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं
दुःखाची गोष्ट म्हणजे, २९ मार्च २०२२ ला मारियुपोल शहरात आपल्या आणखी सात भाऊबहिणींचा मृत्यू झाला. आतापर्यंत, एकूण १७ भाऊबहिणींनी आपला जीव गमावला.
युक्रेनमध्ये विपत्ती मदतकार्य समितीतले (DRC) बांधव आपल्या भाऊबहिणींना मदत पुरवायला खूप मेहनत घेत आहेत. युद्ध झालेल्या ठिकाणी आपल्या भाऊबहिणींना शोधायला ते आपला जीवसुद्धा धोक्यात घालत आहेत.
उदाहरणार्थ, खारकीव, क्रामातोर्स्क आणि मारियुपोलसारख्या शहरांत खूप नुकसान झालं. विपत्ती मदतकार्य समितीतल्या (DRC) बांधवांनी या शहरातल्या भाऊबहिणींना खाण्यापिण्याच्या गोष्टी, औषधं आणि इतर गरजेच्या गोष्टी पुरवल्या. DRC मधला एक भाऊ रोज जवळपास २,७०० प्रचारकांना अन्न आणि औषधं पुरवतो. यासाठी त्याला ५०० पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास करून अनेक लष्करी तपासणी नाकेही पार करावे लागतात.
DRC मधल्या भावांनी युद्धाच्या ठिकाणाहून आपल्या भाऊबहिणींना बाहेर काढायला गाड्यांची व्यवस्था केली. चेर्निहीव विपत्ती मदतकार्य समितीतल्या एका भावाने असं म्हटलं: “जिथे लोक राहतात अशा ठिकाणी जेव्हा सैनिकांनी बाँब टाकायला सुरवात केली, तेव्हा आम्हाला समजलं की या शहरात राहणं सुरक्षित नाहीए. बाँबस्फोट होत असताना वीज नव्हती, इंटरनेटही चालत नव्हतं आणि भाऊबहिण सुरक्षेसाठी तळघरामध्ये लपले होते. तसंच, त्यांच्याशी संपर्क करणं कठीण जातं होतं, म्हणून वडील लगेच तिथे गेले आणि त्यांना सांगितलं की या शहरातून बाहेर निघायला गाड्यांची व्यवस्था केलीए.”
यासाठी ट्रान्सर्पोटेशनचा बिजनेस असणारा एक माणूस त्याच्या गाड्या वापरायला तयार झाला. आणि चेर्निहीवमधून आपल्या २५४ भाऊबहिणींना बाहेर काढायला त्याने नऊ चकरा मारल्या. एकदा तर गाड्या तिथून जाता याव्यात म्हणून त्याने मोठमोठ्या मशीनी वापरून रस्त्याची दुरूस्ती केली. या मदतीची भाऊबहिणींनी खूप कदर केली.
या युद्धात ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावलंय त्याचं आम्हाला फार वाईट वाटतंय. देवाच्या वचनात म्हणजेच बायबलमध्ये, मरण आणि दुःख राहणार नाही याबद्दल जी आशा दिलीए ती पूर्ण व्हायची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत.—प्रकटीकरण २१:३, ४.
युक्रेनमधून मिळालेले पुढील रिपोर्ट २९ मार्च २०२२ पर्यंतचे आहेत. स्थानिक भावांकडून मिळालेली ही माहिती पक्की आहे. पण हे आकडे कदाचित जास्त असू शकतात, कारण देशाच्या प्रत्येक ठिकाणातल्या भाऊबहिणींशी संपर्क करणं कठीण आहे.
आपल्या भाऊबहिणींवर काय परिणाम झाला?
१७ प्रचारकांचा मृत्यू झाला
३५ प्रचारक जखमी झाले
३६,३१३ पेक्षा जास्त प्रचारकांना आपलं घर सोडून पळावं लागलं
११४ घरं उद्ध्वस्त झाली
१४४ घरांचं मोठं नुकसान झालं
६१२ घरांचं थोडंफार नुकसान झालं
१ राज्यसभागृहाचं नुकसान झालं
७ राज्यसभागृहांचं मोठं नुकसान झालं
२३ राज्यसभागृहांचं थोडंफार नुकसान झालं
मदतकार्य
२७ विपत्कालीन मदतकार्य समित्या (DRC) बांधवांची मदत करत आहेत
या समित्यांनी ३४,७३९ प्रचारकांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे
१६,१७५ प्रचारकांना दुसऱ्या देशात निघून जावं लागलं आणि तिथल्या भाऊबहिणींनी त्यांना मदत केली