व्हिडिओ पाहण्यासाठी

डावीकडे: युक्रेनचे भाऊबहीण पोलंडहून आलेलं मदतकार्यंचं साहित्यं एका गाडीत ठेवत आहेत, म्हणजे ते भाऊबहिणींमध्ये वाटलं जाईल. उजवीकडे: होस्टोमेल शहरात बॉम्बस्फोटामुळे उद्ध्‌वस्त झालेलं भावाचे घर

१३ एप्रिल २०२२
युक्रेन

रिपोर्ट #६ | युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं

रिपोर्ट #६ | युक्रेनमध्ये चालू असलेल्या संकटाच्या वेळी बंधुप्रेम दिसून आलं

आम्हाला हे सांगताना अतिशय दुःख होतय, की युक्रेनमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे आपले आणखी काही भाऊबहीण मारले गेले आहेत. आतापर्यंत एकूण २८ भाऊबहिणींना आपला जीव गमवावा लागला आहे.

आंतरराष्ट्रीय बातम्यांवरून असं दिसून येतं, की युद्धाच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत कीव्हच्या आसपासच्या शहरांमध्ये भीषण लढाई सुरू होती. या भागात जवळपास ४,९०० प्रचारक राहतात. यातल्या ३,५०० पेक्षा जास्त प्रचारकांनी पळून जाऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

खाली दिलेल्या काही अनुभवांवरून हे स्पष्ट दिसून येतं, की या कठीण परिस्थितीतही आपल्या भाऊबहिणींचा यहोवावरचा विश्‍वास किती मजबूत आहे!

ओलेक्झांद्रे नावाचे वडिल माकारीव्ह शहरातून आहेत. युद्धाच्या वेळी ते मध्य युक्रेनच्या एका सुरक्षित ठिकाणी गेले. पण त्यांच्या प्रचाराच्या गटातल्या ४ प्रचारकांशी संपर्क होत नव्हता. ओलेक्झांद्रे या भावाला त्यांची काळजी वाटू लागली, आणि ते त्यांना शोधण्यासाठी पुन्हा युद्ध चालू असलेल्या भागात गेले. ते सांगतात, “मला माहिती आहे की यहोवासाठी त्याचे सेवक खूप मौल्यवान आहेत. त्यांतल्या एका प्रचारकाच्या घरी मी जेव्हा पोहोचलो, तेव्हा त्या घरासमोर बॉम्ब टाकण्यात आल्याचं मला दिसलं. त्यांच्या तळघराचा दरवाजा बंद होता आणि वारंवार फोन करुनही कोणीही उत्तर देत नव्हतं. त्यामुळे मी खूप घाबरलो.” त्यानंतर ओलेक्झांद्रे या वडिलांनी तळघराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत शिरताच त्यांना दिसलं की काही लोक तळघरात बसलेले आहेत आणि त्यांच्याकडे बघत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या गटातले चारही प्रचारक सुखरुप होते. त्या प्रचारकांनी आणि त्यांच्यासोबत शेजारपाजारच्या काही लोकांनी त्या तळघरात आश्रय घेतला होता.

यारोस्लोव आणि त्याची पत्नी (मध्यभागी), आणि ओलेक्झांद्रे आणि त्याची पत्नी एका सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यावर एकत्र जेवत असताना

त्यांपैकी एक प्रचारक यारोस्लोव यांनी सांगितलं, की ते आठ दिवसांपासून त्या तळघरात होते. ते सांगतात, “आमच्याकडं खाण्यापिण्याच्या थोड्याफारच गोष्टी होत्या. प्रत्येकजण दरदिवशी फक्‍त काही बिस्किटं आणि एक ग्लास पाणी पिऊ शकत होता. पण आम्ही बायबल आणि आपली प्रकाशनं वाचली, एकत्र प्रार्थना केली आणि एकमेकांना प्रोत्साहन दिलं. जेव्हा मी ओलेक्झांद्रे यांना माझं नाव घेताना ऐकलं, तेव्हा वाटलं की सैनिक मला पकडायला आलेत. मला वाटलं की आज मी नक्कीच मरणार . . . [पण] ओलेक्झांद्रे यांनी आम्हा सर्वांना वाचवलं. आपल्यावर प्रेम करणारे, आपल्यासाठी प्रार्थना करणारे, आणि आम्हाला वाचण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे असे प्रेमळ भाऊबहीण दिल्याबद्दल आम्ही यहोवाचे खूप आभार मानतो.”

पिलीप

आणखी एका अनुभवावर लक्ष द्या. पिलीप आणि एका भावाने भाऊबहिणींना जेवण देण्यासाठी बोरोडियांका या शहरात जाण्याचं ठरवलं. १७ मार्चला ते शहराच्या दिशेने जात असताना सैनिकांनी पिलीपची गाडी अडवून त्यांच्याकडचं सगळं जेवण घेतलं. त्यानंतर त्यांनी दोन्ही भावांना अटक केली. हातकड्या घालून आणि डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना खालच्या तळघरातल्या एका छोट्याश्‍या खोलीत नेण्यात आलं. तिथे आणखी सात जण कैद होते. दोन दिवसांनंतर, काही सुरक्षारक्षकांनी या भावांना तुरुंगात नेलं आणि रात्री त्यांना बेदम मारहाण केली. पिलीप सांगतो, ”‏मी जिवंत राहीन की नाही हे मला माहीत नव्हतं. मी यहोवाला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रार्थना केली.”

एकदा पिलीपला मारहाण होत असताना तो जोरजोरात प्रार्थना करायला लागला. प्रार्थनेत तो त्या वयस्कर बहिणींना आठवू लागला ज्यांच्याकडे खाण्यापिण्याच्या वस्तू नव्हत्या. त्याने आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. तसंच अनेक वर्षं आनंदाने यहोवाची सेवा करता आली यासाठीही त्याने यहोवाचे आभार मानले. त्यानंतर सुरक्षारक्षक त्याला पुन्हा खोलीत घेऊन गेले. तिथे पिलीप त्या सैनिकांसाठी प्रार्थना करू लागला. म्हणजे त्या सैनिकांना समजेल की त्यांना या भावांकडून कोणताही धोका नाही. दोन्ही भाऊ सुरक्षारक्षकांना साक्ष देऊ लागले. पुढच्या दोन दिवसापर्यंत ते कामावर येणार्‌या वेगवेगळ्या सुरक्षारक्षकांना साक्ष देत राहिले. त्या वेळी त्यांच्यासोबत खोलीमध्ये बंदी असलेल्या एका व्यक्‍तीने बायबलच्या संदेशात आवड दाखवली. आणि भावांचे आभार मानले. २७ मार्चला दोन्ही भावांची आणि त्या व्यक्‍तीची कैदेतून सुटका करण्यात आली.

स्वितलाना नावाची एक अविवाहित बहीण बूका शहरात राहत होती आणि तिथे जोरदार युद्ध सुरू होतं. त्यामुळे ती दोन आठवडे तिथेच अडकून राहिली. ती सांगते, “त्या काळात यहोवाकडून जी शांती असते, ती काय असते हे मला आणखी चांगल्या प्रकारे समजलं. या शांतीचा अर्थ असा नाही की आपल्याला काय करायचंय हे आपल्याला नेहमीच माहीत असेल. पण, बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसला तरी आपण शांत राहू शकतो, कारण आपला यहोवावर पूर्ण भरवसा असतो.”

मग स्वितलाना युक्रेनमधल्या एका सुरक्षित ठिकाणी जात असताना वाटेत तिने एका महिलेला आणि त्या महिलेच्या पुतण्याला साक्ष दिली. ते जेव्हा एका सुरक्षित ठिकाणी पोहोचले तेव्हा एका साक्षीदार कुटुंबाने त्यांचं स्वागत केलं. त्या कुटुंबाने स्वितलानासोबत त्या महिलेला आणि तिच्या पुतण्याला एका रात्रीसाठी आपल्या घरी थांबवलं. दुसर्‌या दिवशी ती महिला म्हणाली की तिला यहोवाच्या साक्षीदारांच्या सभेला यायचंय आणि तिला बायबल आणि काही मासिकंसुद्धा हवी आहेत. स्वितलाना अजूनही त्या महिलेच्या संपर्कात आहे.

१२ एप्रिल २०२२ पर्यंत युक्रेनमधून खालील माहिती मिळाली आहे. स्थानिक भावांकडून मिळालेली ही माहिती पक्की आहे. पण हे आकडे कदाचित जास्त असू शकतात, कारण देशाच्या प्रत्येक ठिकाणातल्या भाऊबहिणींशी संपर्क करणं कठीण आहे.

आपल्या भाऊबहिणींवर काय परिणाम झाला?

  • २८ प्रचारकांचा मृत्यू झाला

  • ४८ प्रचारकांना दुखापत झाली

  • ४०,७७८ प्रचारकांना आपलं घर सोडून पळावं लागलं आणि इतर सुरक्षित ठिकाणी जावं लागलं

  • २७८ घरं उद्ध्‌वस्त झाली

  • २६८ घरांचं मोठं नुकसान झालं

  • ७४६ घरांचं थोडंफार नुकसान झालं

  • १ राज्यसभागृह उद्ध्‌वस्त झालं

  • ९ राज्यसभागृहांचं मोठं नुकसान झालं

  • २६ राज्यसभागृहांचं थोडंफार नुकसान झालं

मदतकार्य

  • २७ विपत्कालीन मदतकार्य समित्या (DRC) बांधवांची मदत करत आहेत

  • या समित्यांनी ४१,९७४ प्रचारकांची सुरक्षित ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे

  • १८,०९७ प्रचारकांना इतर देशात जावं लागलं आणि तिथले बांधव त्यांची मदत करत आहेत