व्हिडिओ पाहण्यासाठी

डावीकडून उजवीकडे: ब्रदर बॉरिस अँड्रिये, ब्रदर ॲनाटोली ली आणि सिस्टर नतालिया शारापोवा

६ मे २०२४ | अपडेट: ११ जुलै २०२४
रशिया

अपडेट—तुरुंगवासाची शिक्षा | “सगळ्या गोष्टी यहोवाच्या नियंत्रणात आहेत”

अपडेट—तुरुंगवासाची शिक्षा | “सगळ्या गोष्टी यहोवाच्या नियंत्रणात आहेत”

१० जुलै २०२४ ला प्रिमॉरी क्षेत्रातल्या खोरोलस्की जिल्हा न्यायालयाने ब्रदर बॉरिस अँड्रिये, ब्रदर ॲनाटोली ली आणि सिस्टर नतालिया शारापोवा यांना शिक्षा सुनावली. ब्रदर बॉरिसला सहा वर्षांची, ब्रदर ॲनाटोलीला साडे सहा वर्षांची आणि सिस्टर नतालियाला तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना शिक्षा सुनावण्याआधीपासूनच ते तिघंही तुरुंगात होते आणि पुढेही त्यांना तुरुंगात राहावं लागेल.

थोडक्यात माहिती

यहोवाने बॉरिस, ॲनाटोली आणि नतालिया यांच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं. त्याच प्रकारे, आपणही खातरी बाळगू शकतो, की कठीण काळात तो आपल्याही प्रार्थनांचं उत्तरं देईल आणि आपल्याला परीक्षेत टिकून राहायचं बळ देईल.—स्तोत्र २०:१.

घटनाक्रम

  1. २८ जुलै २०२२

    गुन्ह्याचा खटला दाखल करण्यात आला

  2. ६ ऑक्टोबर २०२२

    यारोस्लावस्कीमधल्या एका गावात १२ घरांची झडती घेण्यात आली. बॉरिस आणि नतालिया यांना काही काळासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं

  3. ७ ऑक्टोबर २०२२

    बॉरिस आणि नतालिया यांना खटल्याची सुनावणी होईपर्यंत तुरुंगात टाकण्यात आलं

  4. १२ ऑक्टोबर २०२२

    ॲनाटोलीला काही काळासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं

  5. १३ ऑक्टोबर २०२२

    ॲनाटोलीला खटल्याची सुनावणी होईपर्यंत तुरुंगात टाकण्यात आलं

  6. ५ ऑक्टोबर २०२३

    खटला सुरू झाला

a b c हा लेख तयार करत असताना, ब्रदर बॉरिस अँड्रिये, ब्रदर ॲनाटोली ली आणि सिस्टर नतालिया शारापोवा हे सगळे खटल्याची सुनावणी होईपर्यंत तुरुंगात होते. म्हणून त्यांचं व्यक्‍तिगत मत घेता आलं नाही.