व्हिडिओ पाहण्यासाठी

रामापो इथलं मोठं बांधकाम सुरू करण्यासाठी जी कामं करावी लागणार होती, त्यांपैकी एक काम म्हणजे त्या ठिकाणची झाडं कापणं

८ नोव्हेंबर २०२४
आंतरराष्ट्रीय बातम्या

रामापो इथला जागतिक मुख्यालयाचा प्रकल्प

रामापो इथे मोठं बांधकाम करण्यासाठी लागणारी परवानगी मिळाली

रामापो इथे मोठं बांधकाम करण्यासाठी लागणारी परवानगी मिळाली

६ नोव्हेंबर २०२४ ला, रामापोमधल्या शहर विकास प्राधिकरणाने बांधकाम करण्यासाठी लागणारी परवानगी दिली. याचा अर्थ आता रामापोमध्ये बांधकामाच्या मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करता येणार आहे.

रामापो इथल्या ऑफिसच्या इमारतीची झलक

जून २०२३ ला शहर विकास प्राधिकरणाकडून हा प्रकल्प सुरू करण्यासाठी काही गोष्टी करायची परवानगी मिळाली होती. या आधी ज्या परवानग्या मिळाल्या होत्या त्यामुळे बांधकामापूर्वीची काही कामं करता आली. जसं की, झाडं कापणं. पण आता मिळालेल्या परवानगीमुळे आपल्याला प्रवेशद्वाराचं आणि इमारतीचा पाया घालण्यासाठी मोठमोठे खडक फोडण्याचं काम सुरू करता येईल. यासोबतच, खोदकाम करणं आणि जमिनीखालचे पाईप किंवा इतर गोष्टी बसवणं यांसारखी इतर कामंही सुरू करता येतील.

बांधकाम प्रकल्प समितीमध्ये सेवा करणारे ब्रदर केविन पेज म्हणतात: “हे परवाने आमच्या हातात आले तेव्हा आम्ही खरंच खूप खूश झालो! आम्ही जी मेहनत घेतली आणि जो धीर धरला त्यावर यहोवाने आशीर्वाद दिलाय आणि ही गोष्ट आम्ही या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर अनुभवली आहे. या प्रकल्पाच्या बाबतीत एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकता आलं, यासाठी आम्ही त्याचे खूप आभारी आहोत. पुढेही त्याने या कामावर असाच आशीर्वाद द्यावा अशीच आमची प्रार्थना आहे.”

या कामासाठी लागणारी परवानगी मिळाल्यामुळे आम्ही यहोवाचे साक्षीदार खूप खूश आहोत. तसंच, यहोवाने या प्रकल्पावर आणि त्यावर काम करणाऱ्‍या सगळ्या भाऊबहिणींवर भरभरून आशीर्वाद द्यावा अशी आम्ही त्याला प्रार्थना करतो.—हाग्गय १:१४.