व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

केनिया

टुअरबद्दल माहिती

तुम्ही टुअरचं बुकींग आधी करणं गरजेचं आहे का? हो. सगळ्यांना टुअरचा आनंद घेता यावा आणि अनावश्‍यक गर्दी टाळता यावी म्हणून आम्ही ही विनंती करतो की तुम्ही आधीच टुअरचं बुकींग करावं, मग ग्रुप कितीही लहान असला तरी.

तुम्ही टुअरचं बुकींग आधी केलं नसेल तर तुम्हाला टुअरचा आनंद घेता येईल का? जर तुम्ही आधीच बुकींग केलं नसेल तर तुमच्यासाठी टुअरची सोय करणं शक्य होणार नाही. कारण जागा मर्यादित असल्यामुळे दररोज फक्‍त ठराविक लोकच टुअरचा आनंद घेऊ शकतात.

टुअरसाठी तुम्ही कधी आलं पाहिजे? अनावश्‍यक गर्दी होऊ नये म्हणून तुम्ही ठरलेल्या वेळेच्या जास्तीत जास्त एक तास आधी येऊ शकता.

टुअर बुक कशी करावी? “बुकींग” या टॅबवर क्लिक करा.

तुम्ही तुमच्या टुअरच्या बुकींगची वेळ बदलू किंवा कॅन्सल करू शकता का? हो, त्यासाठी “बुकींग पाहा किंवा बदला” या टॅबवर क्लिक करा.

तुम्हाला हव्या असणाऱ्‍या तारखेला बुकींग उपलब्ध नसेल, तर काय? वेबसाईटवर चेक करत राहा. एखादं बुकींग बदललं किंवा कॅन्सल झालं तर तुम्हाला त्या जागी बुकींग मिळू शकतं.

बुकींग करा

टुअरचं माहितीपत्रक डाऊनलोड करा

Address and Phone Number

Elgeyo Marakwet Rd

Kilimani area near Adams Arcade

NAIROBI

KENYA

+254 20-5141500

मार्ग शोधा