व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

ब्राझील

टूर्सबद्दल माहिती

टूर्स बुक करा

रिझर्वेशनबद्दल माहिती पाहा किंवा बदल करा

टूरचे माहितीपत्रक डाऊनलोड करा

प्रदर्शनं

बायबल—पुस्तक आणि त्याचा लेखक. हे प्रदर्शन बायबलचा लेखक, यहोवा देव याला गौरवीत करतं आणि बायबलच्या मूळ विषयावर, म्हणजे देवाच्या राज्यावर जोर देतं. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्‍यांना हे पाहता येईल, की विरोधकांनी बायबलला नष्ट करण्याचा प्रयत्न करूनही ते आज आपल्या काळापर्यंत कसं टिकून राहिलं आणि यहोवाने त्यातला मूळ संदेश कसा सुरक्षित ठेवला.

ऐतिहासिक प्रदर्शन. मागच्या १२० वर्षांत यहोवाने ब्राझीलमध्ये प्रचाराच्या कामावर कसा आशीर्वाद राहू दिला आहे हे या प्रदर्शनात दाखवण्यात आलं आहे. तसंच, नुकत्याच केलेल्या संशोधनातून जी नवीन माहिती समोर आली आहे तीसुद्धा प्रदर्शनाला भेट देणारे पाहू शकतात. विरोध आणि छळ होत असतानाही ब्राझीलमध्ये देवाच्या राज्याचं काम कसं सुरू झालं आणि ते कसं वाढत गेलं हे या प्रदर्शनात दाखवण्यात आलं आहे.

पत्ता आणि फोन नंबर

मार्ग शोधा