व्हिडिओ पाहण्यासाठी

हजारो जण लिहा-वाचायला शिकतात

हजारो जण लिहा-वाचायला शिकतात

सन २०११ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी ५,७०० पेक्षा अधिक लोकांना लिहा-वाचायला मदत केली.

घाना:

गेल्या २५ वर्षांदरम्यान आम्ही ९,००० पेक्षा अधिक लोकांना साक्षर होण्यास मदत केली.

झांबिया:

सन २००२ पासून जवळजवळ १२,००० लोकांना लिहा-वाचायला मदत मिळाली. ब्याऐंशी वर्षांच्या ॲग्नेस म्हणतात: “मंडळीत साक्षरतेच्या वर्गांबद्दलची घोषणा करण्यात आली तेव्हा मी लगेच माझं नाव दिलं. आणि अगदी पहिल्या वर्गाच्या वेळीच मी माझं नाव लिहायला शिकले!”

पेरू:

एक विद्यार्थिनी ५५ वर्षांची आहे. ती लिहिते: “माझ्या आईबाबांनी मला शाळेत पाठवलंच नाही. त्यामुळं, मला लिहा-वाचायला येईल, असं मी स्वप्नसुद्धा पाहू शकत नव्हते.”

मोझंबिक:

गेल्या १५ वर्षांत १९,००० पेक्षा अधिक जण लिहा-वाचायला शिकले आहेत. फेलिझार्दा नावाच्या एका विद्यार्थीनीने असे म्हटले: “मला आता इतका आनंद होतो म्हणून सांगू. पूर्वी मला जे जमत नव्हतं ते मी आत्ता करू शकते. मी बायबलमधून वचन काढून इतरांना वाचून दाखवू शकते.”

सोलोमन बेटे:

आपल्या शाखा कार्यालयाने असे लिहिले: “पूर्वी, दूरच्या क्षेत्रात राहणाऱ्‍यांना शाळांना यायला जमत नसे. शिवाय, खूप कमी मुलींना शिक्षण मिळत असे. पण साक्षरतेच्या या वर्गांमुळे आता, स्त्रियांनाही खासकरून लिहिता वाचता येऊ लागले आहे. हे शिक्षण संपल्यानंतर अनेकांचा आत्म-विश्‍वास वाढला आहे.”