आमचाच धर्म खरा आहे असे यहोवाच्या साक्षीदारांना वाटते का?
आपण जो धर्म पाळतो तो देवाच्या आणि येशूच्या नजरेत स्वीकृत आहे की नाही याचे आपण परीक्षण केले पाहिजे.
अनेक जण जे म्हणतात की सगळेच धर्म, सगळेच मार्ग शेवटी एकाच देवाकडे जातात तसे येशू ख्रिस्ताने मानले नाही. उलट त्याने म्हटले: “जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१४) हा मार्ग आपल्याला सापडला आहे असा यहोवाच्या साक्षीदारांचा पक्का विश्वास आहे. आणि त्यामुळेच ते आपल्या धर्माबाबत संतुष्ट आहेत.