यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यासाठी पैसा कुठून मिळतो?
जगभरात चाललेलं आमचं काम यहोवाच्या साक्षीदारांनी a स्वेच्छेने दिलेल्या दानावर चालतं. आमच्या सभांमध्ये दानपेट्या ठेवलेल्या असतात, आणि इतर कोणत्या मार्गांनी दान दिलं जाऊ शकतं, याबद्दल आमच्या वेबसाईटच्या ‘दान’ या पेजवर सांगितलं आहे. इथे वेगवेगळे पर्याय दिले आहेत. त्या पर्यायांपैकी ते एक किंवा त्यापेक्षा जास्त पर्याय निवडून, जगभरातल्या कार्यासाठी किंवा स्थानिक खर्चासाठी दान देऊ शकतात.
यहोवाच्या साक्षीदारांनी दशांश किंवा आपल्या पगारातून ठराविक रक्कम दान म्हणून द्यावी अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जात नाही. (२ करिंथकर ९:७) आम्ही आमच्या सभेत कधीच दान गोळा करत नाही किंवा प्रवेश फी घेत नाही. मंडळीत सेवा करणारे आमचे बांधव बाप्तिस्म्यासाठी, दफनविधीसाठी, लग्नसोहळ्यांसाठी किंवा इतर कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांसाठी पैसे घेत नाहीत. खाद्य पदार्थ विकून, बाजार भरवून, बिंगो गेम सारख्या आकड्यांच्या जुगाराचे खेळ भरवून, कार्निवल उत्सवांचे आयोजन करून, मेजवानीचे कार्यक्रम, लकी ड्रॉ स्पर्धा किंवा यासारख्या इतर कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करून आम्ही दान गोळा करत नाही. किंवा दान देण्यासाठी आम्ही कोणालाही विनंती करत नाही. दान देणाऱ्या व्यक्तीची माहिती पूर्णतः गुप्त ठेवली जाते. (मत्तय ६:२-४) पैसे मिळवण्याच्या उद्देशाने आमच्या प्रकाशनांमध्ये किंवा वेबसाईटवर कोणत्याही जाहिरातीचा समावेश केला जात नाही.
यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व मंडळ्यांमध्ये दर महिन्याला सभांच्या वेळी जमा खर्च अहवाल पुरवला जातो. आणि तो सर्वांना पाहता येतो. मिळालेल्या दानाचा योग्य वापर होत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्रत्येक मंडळीचा जमा खर्च अहवाल नियमितपणे तपासला जातो.—२ करिंथकर ८:२०, २१.
दान देण्याच्या पद्धती
दान पेट्या: तुम्हाला पैशाच्या किंवा चेकच्या स्वरूपात दान द्यायचं असेल, तर राज्यसभागृहात, संमेलनगृहात किंवा जिथे सभा भरतात अशा ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दान पेट्यांमध्ये तुम्ही ते टाकू शकता.
ऑनलाईट दान देण्याची सुविधा: बऱ्याच देशांमध्ये, तुम्ही आमच्या वेबसाईटवर असलेल्या “यहोवा के साक्षियों को दान दीजिए” या पेजवर ऑनलाईन सुविधेचा वापर करून दान देऊ शकता. या तरतुदीचा वापर करून तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा b वापर करून दान देऊ शकतो. या तरतुदींचा वापर करून, काही यहोवाचे साक्षीदार दर महिन्याला एक ठराविक रक्कम नियमितपणे देता यावी म्हणून बँकमध्ये असलेल्या विशिष्ट योजनेचा वापर करतात. आणि दर महिन्याला ‘काही रक्कम बाजूला काढून ठेवतात.’—१ करिंथकर १६:२.
योजनाबद्ध दान: दान देण्याच्या काही पद्धतींचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आधीच तयारी करावी लागते आणि/किंवा कायदेशीर सल्लासुद्धा घ्यावा लागतो. अशा योजनांमुळे तुमच्या देशात कराची रक्कम भरताना मिळणाऱ्या फायद्यांचा लाभसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. आपल्या जीवनकाळात किंवा मृत्यूनंतर दान करता येतील अशा धर्मादाय देणग्यांबद्दल आधीच माहिती घेतल्यामुळेसुद्धा बऱ्याच जणांना याबाबतीत फायदा झाला आहे. याबदद्ल जास्त माहिती मिळवण्यासाठी तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक शाखाकार्यालयाशी संपर्क साधू शकता. या मार्गाने दान देण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा वापर करू शकता:
बँक खातं
विमा आणि निवृत्ती योजना
स्थावर मिळकत
स्टॉक आणि करारपत्र
मृत्यूपत्र आणि ट्रस्ट
तुमच्या भागात यातल्या कोणत्या पद्धतीने दान दिलं जाऊ शकतं हे समजून घेण्यासाठी, आमच्या वेबसाईटवर “यहोवा के साक्षियों को दान दीजिए” या पेजवर दिलेली माहिती पाहा.
a साक्षीदार नसलेल्यांपैकी काही जणसुद्धा आमच्या कामासाठी स्वच्छेने दान देतात.
b याबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी ऑनलाईन दान कसं द्यावं हा व्हिडिओ पाहा.