व्हिडिओ पाहण्यासाठी

तुम्ही निर्मितीवाद मानता का?

तुम्ही निर्मितीवाद मानता का?

 नाही. देवानेच सर्व काही निर्माण केले असे यहोवाचे साक्षीदार मानतात. पण, निर्मितीवादाची शिकवण आम्ही मानत नाही. का नाही? कारण, निर्मितीवादातील बहुतेक शिकवणी बायबलच्या शिकवणींच्या विरोधात आहेत. याची दोन उदाहरणे खाली देण्यात आली आहेत:

  1.  १. निर्मितीच्या सहा दिवसांचा अवधी. काही निर्मितीवादांचा दावा आहे, की निर्मितीच्या सहा दिवसांचा अवधी २४ तासांचा होता. पण बायबलमध्ये उल्लेख करण्यात आलेला “दिवस” फक्‍तच २४ तासांचा नव्हे तर त्याहूनही जास्त तासांचा असू शकतो.—उत्पत्ति २:४; स्तोत्र ९०:४.

  2.  २. पृथ्वीचे वय. काही निर्मितीवाद असे शिकवतात की पृथ्वीला बनवून काही हजार वर्षेच झाली आहेत. परंतु बायबलनुसार, ही पृथ्वी आणि हे विश्‍व निर्मितीच्या सहा दिवसांच्या आधीपासूनच  अस्तित्वात होते. (उत्पत्ति १:१) त्यामुळे, ही पृथ्वी कोट्यवधी वर्षे जुनी आहे असे सूचित करणाऱ्‍या वैज्ञानिक शोधांवर यहोवाचे साक्षीदार आक्षेप घेत नाहीत.

 यहोवाच्या साक्षीदारांचा निर्मितीवर विश्‍वास असला तरी, ते विज्ञानाचा विरोध करत नाहीत. खरे विज्ञान आणि बायबल सुसंगत आहेत, असे आम्ही मानतो.