यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती आहेत का?
होय, आम्ही ख्रिस्ती आहोत कारण:
आम्ही होता होईल तितका येशू ख्रिस्ताच्या शिकवणींचे पालन करण्याचा आणि त्याच्या आचरणाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो.—१ पेत्र २:२१.
“आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.” त्यामुळे येशू ख्रिस्तामुळेच तारण शक्य आहे असा आम्ही विश्वास करतो.—प्रेषितांची कृत्ये ४:१२.
यहोवाचा साक्षीदार बनण्यासाठी एका व्यक्तीला येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेणे जरुरीचे आहे.—मत्तय २८:१८, १९.
आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो.—योहान १५:१६.
येशू मस्तक आहे म्हणजे त्याला प्रत्येक पुरुषावर अधिकार गाजवण्याचा हक्क देण्यात आला आहे असे आम्ही मानतो.—१ करिंथकर ११:३.
असे असले तरी, स्वतःला ख्रिस्ती म्हणवणाऱ्या इतर धार्मिक गटांपेक्षा आम्ही अनेक मार्गांनी वेगळे आहोत. उदाहरणार्थ, येशू त्रैक्याचा भाग आहे हे आम्ही मानत नाही; कारण तो देवाचा पुत्र आहे असे बायबल शिकवते. (मार्क १२:२९) तसेच, देव लोकांना नरकात छळतो, आत्मा अमर आहे ही बायबलची शिकवण आहे हेसुद्धा आम्ही मानत नाही. याशिवाय, धार्मिक विधीत पुढाकार घेणाऱ्यांना विशिष्ट पदव्या देण्यात याव्यात हेही आम्ही मानत नाही.—उपदेशक ९:५; यहेज्केल १८:४; मत्तय २३:८-१०.