तुम्ही तुमच्या सभास्थानाला “यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य सभागृह” का म्हणता?
अनेक उचित कारणांसाठी:
ही इमारत एक सभागृह आहे जेथे आम्ही एकत्र जमतो.
येथे आम्ही बायबलमध्ये ज्याचा उल्लेख केला आहे त्या देवाची अर्थात यहोवाची उपासना करायला, त्याच्याबद्दलची साक्ष द्यायला एकत्र जमतो.—स्तोत्र ८३:१८, तळटीप; यशया ४३:१२.
येशू पृथ्वीवर होता तेव्हा बहुतेक करून ज्याच्याविषयी बोलला त्या देवाच्या राज्याबद्दल आणखी गोष्टी शिकण्यासाठीसुद्धा आम्ही येथे एकत्र जमतो.—मत्तय ६:९, १०; २४:१४; लूक ४:४३.
तुम्हाला जवळ पडणाऱ्या एखाद्या राज्य सभागृहात येऊन यहोवाचे साक्षीदार त्यांच्या सभा कशा चालवतात हे पाहायचे आम्ही तुम्हाला आमंत्रण देत आहोत.