यहोवाच्या साक्षीदारांमध्ये स्त्रिया प्रचाराचे काम करतात का?
होय. यहोवाचे सर्वच साक्षीदार मग ते पुरुष असोत अथवा स्त्रिया प्रचाराचे काम करतात. बायबलमध्ये असे भाकीत करण्यात आले होते, की “स्त्रियांची मोठी सेना” मंगल वार्ता अर्थात सुवार्ता प्रसिद्ध करेल.—स्तोत्र ६८:११.
यहोवाच्या साक्षीदारांमधील स्त्रिया बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेल्या स्त्रियांच्या उदाहरणाचे अनुकरण करतात. (नीतिसूत्रे ३१:१०-३१) त्या मंडळीत शिकवण्याच्या बाबतीत पुढाकार घेत नसल्या तरी, प्रचार कार्यात मात्र पूर्णपणे भाग घेतात. त्या आपल्या मुलांवर बायबलचे संस्कार करतात. (नीतिसूत्रे १:८) आपल्या बोलण्याद्वारे व कृतीद्वारे या कष्टाळू स्त्रिया इतरांच्या भल्यासाठी कार्य करतात.—तीत २:३-५.